Homeनागपूर न्यूजबावणकुळेंची पोलिस आयुक्त कार्यालयात पत्र परिषद नाही तर फक्त संवाद

बावणकुळेंची पोलिस आयुक्त कार्यालयात पत्र परिषद नाही तर फक्त संवाद

Advertisements


भाजप प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा दावा
नागपूर,ता.१८ जून २०२२ : भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी काल पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात कोणतीही पत्र परिषद घेतली नाही. ते फक्त निवेदन सोपविण्यास गेले होते,त्यावेळी कॉन्फरेंस हॉलमध्ये उपस्थित पत्रकारांच्या प्रश्‍नांना फक्त बावणकुळे यांनी उत्तरे दिली,ती पत्र परिषद नव्हती,असा खुलासा भाजपचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून केला.

काल १७ जून रोजी दुपारी ३ वाजता बावणकुळे यांच्यासह भाजपचे आमदार कृष्णा खोपडे,माजी आ.सुधाकर देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,बाल्या बोरकर अादी मंडळी काँग्रेसच्या शेख हुसेन यांच्यावर कठोर कलमा लावण्याची मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन सिव्हिल लाईन्स येथील पोलिस आयुक्तलयात गेली असता,निवेदन सोपवल्यानंतर त्याच सभागृहात बावणकुळे यांनी पोलिस आयुक्तांची खूर्ची बाजूला सारुन दुस-या खूर्चीवर बसून त्याच ठिकाणी पत्रकार परिषद भरवल्याने चांगलेच वादंग निर्माण झाले होते.

आयुक्तांचे कार्यलय,कक्ष किवा सभागृह ही सर्वतोपरी शासकीय जागा असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी किवा खासगी संस्थांना त्या ठिकाणी पत्र परिषद भरवणे हे सर्वथा अयोग्य असल्याने या विरोधात अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी आज शनिवार दि.१८ जून रोजी दुपारी १ वाजता आयुक्तांच्या कक्षात निवेदन सोपविल्यावर त्याच सभागृहात पत्र परिषद घेण्याचे आव्हान दिले होते.

या पार्श्वभूमीवर ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी खुलासा करीत,बावणकुळे यांनी आयुक्त कार्यालयात पत्र परिषद भरविली नसल्याचे सांगून, या उलट काँग्रेसच्या शेख हुसेन यांनी ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे खालच्या स्तराचे आपत्तीजनक विधान केले,त्या विरोधात बावणकुळे व शिष्टमंडळ आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले असल्याचे सांगितले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बावणकुळे व शिष्टमंडळाला कॉन्फरेन्स हॉलमध्ये बसण्यासाठी सांगून त्याच ठिकाणी त्यांचे निवेदन स्वीकारले.यानंतर आयुक्त निघून गेले. त्यानंतर नागपूर शहरातील पत्रकारांनी गर्दी करुन नेमकी काय चर्चा पोलिस आयुक्तांसोबत झाली याची विचारणा बावणकुळेंना केली.

त्यावेळी बावणकुळे यांनी आयुक्त भेटीबाबत व चर्चेबाबतची माहिती पत्रकारांना दिली.पत्र परिषद हा वादाचा विषय होऊच शकत नाही.हा ‘राजकीय‘ वादाचा विषय असून,मूळ मुद्दापासून लक्ष विचलीत करण्यासाठी हा राजकारण्यांचा राजकीय डाव असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.

राजकारण्यांचा हा प्रयत्न भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तो कोणत्याही पद्धतीने सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.शेख हुसेन यांनी ज्या पद्धतीची भाषा देशाच्या पंतप्रधानासाठी केली त्याचे गांर्भीर्य पोलिस विभागाला कळायला हवे.

एका महिलेने सत्ताधा-यांच्या विरोधात एक फेसबुक पोस्ट व्हायरल केल्याने तिला महिनो ना महिने तुरुंगात डांबल्या गेलं,अनेक पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात शेकडो तक्रारी दाखल केल्या जातात,तिची पोलिस कोठडी घेतली जाते,कारागृहात डांबल्या जातं,परंतु देशाच्या पंतप्रधानाबद्दल अश्‍या लज्जास्पद विधानानंतर देखील शेख हुसेनला,त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत असल्याकारणानेच, कठोर कलमा न लावता,जामिनपात्र व जुज्बी कलमा लावून लगेच पोलिस ठाण्यातूनच जामिन ही मिळतो,हा सर्व प्रकार म्हणजे पोलिसांवर सत्ताधा-यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पत्र परिषद घेण्याचा मुद्दा म्हणजे शेख हुसेन यांचा मुद्दा भरकटवण्यासाठीचा डाव असल्याचा आरोप करुन हुसेन यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

Latest बातम्या