
ॲड.धर्मपाल मेश्राम यांची टिका
दिल्लीवरुन येणा-यांमुळेच नागपूरात करोनाचा प्रसार वेगाने:राऊत यांचे विधान
नागपूर,ता.६ जून २०२२: दिल्लीवरुन येणा-या प्रवाश्यांमुळे नागपूरात करोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नुकतेच हे विधान केले होते,त्यांचे हे विधान प्रादेशिकवादाला खतपाणी घालणारे असल्याची घणाघाती टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.
संपूर्ण करोना काळात पालकमंत्री हे एवढ्या मोठ्या संकटात जिल्ह्याला पारखे करुन गायबच राहीले होते तेच आता माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना सांगतात की दिल्लीवरुन येणा-या प्रवाश्यांच्यामुळे नागपूर शहरात करोना वेगाने पसरतोय,त्यांचे हे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद असल्याची टिका मेश्राम यांनी केली.
कदाचित त्यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे वारंवार दिल्लीला जाऊन पालकमंत्र्यांचे मंत्रीपद बळकावू इच्छितात, पटोले यांच्या याच प्रयत्नांच्या विरोधात पालकमंत्र्यांनी हे वक्तव्य केले असावे,अशी उपरोधिक टिकाही मेश्राम यांनी केली.
पालकमंत्री म्हणून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी व प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी ज्या काही सूचना प्रशासनाला करने अपेक्ष्ीत होते, त्यासंबंधी एक अवाक्षरही पालकमंत्र्यांनी काढले नाही.याशिवाय नागपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना करोनापासून सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांनी कोणकोणती पाऊले उचलली त्याबद्दल देखील पालकमंत्री एक शब्दही बोलले नाहीत.
या उलट दिल्लीवरुन येणा-या प्रवाश्यांवरच करोना प्रसाराची जवाबदारी ढकलण्याचे त्यांचे विधान अत्यंत हास्यास्पद असून, अश्याप्रकारचे वक्तव्य करने म्हणजे नव्या पद्धतीचा ‘प्रादेशिकवाद’जन्माला घालणे असल्याची टिका करीत,देशातील एक राष्ट्रवादाच्या तत्वाला हे हरताळ फासण्यासारखेच असल्याचे सांगून ॲड. मेश्राम यांनी तीव्र शब्दात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या या विधानाचा निषेध नोंदवला.

आमचे चॅनल subscribe करा