
आमदार ओवरआर्म क्रीकेट स्पर्धेचा शानदार समारोप:जे.एस-११ विजेती चमू: दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचे पटकावले रोख पारितोषिक
सॅमसुई-११ ठरली द्वितीय विजेती:१ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले
छत्रपती-११ तृतीय स्थानी: रोख ५५ हजार ५५५ रुपये रोख पारितोषिकाची ठरली मानकरी
महालक्ष्मी फाऊंडेशनच्या युवा चमूचे कार्य उत्कृष्ट:आमदार विकास ठाकरे
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमुळे नागपूरातील युवा प्रतिभांना मिळाली संधी:माजी खासदार विलास मुत्तेमवार
समाजात एकोपा निर्माण करण्याचे काम करतेय यूवा चमू: सज्यजित तांबे यांचे गौरवोद्गार
नागपूर,ता.२२ मे २०२२: महालक्ष्मी फाऊंडेशनच्या युवा चमूने अथक प्रयत्नातून ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.अगदी सुरवातीचा संघर्ष किवा परिश्रमाचा उल्लेख करायचा असल्यास बिशप कॉटनच्या ज्या मैदानात ही क्रीडा स्पर्धा पार पडली ते संपूर्ण मैदान आम्हाला आधी स्वच्छ करुन स्पर्धा खेळण्यायोग्य तयार करावे लागले.एवढं मोठं यश हे संस्थेच्या व पश्चिम नागपूर काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय मिळूच शकले नसते.ही स्पर्धा फक्त आठच दिवसांची असल्यामुळे आम्हाला स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छिणा-या शेकडो चमूंना परत पाठवावे लागले ही खंत मनात राहून गेली आहे.अनेक चमू व खेळाडू हे निराश झाले होते त्यांचे नैराश्य बघून आम्हा आयोजकांनाही बरे वाटले नाही.वेळेचे बंधन होते म्हणून आम्ही त्यांना संधी देऊ शकलो नाही मात्र यंदा हा शब्द देतो की पुढील स्पर्धेत आधी त्यांना संधी दिली जाईल इतकंच नव्हे तर ३२ वरुन ६४ चमूंपर्यंत ही स्पर्धा विस्तारली जाईल,असे महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांनी सांगितले.ते सदर येथील बिशप कॉटन मैदानात अायोजित आमदार ओवरआर्म क्रीकेट स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.याप्रसंगी बोलताना,ही पहीली वेळ आहे एवढ्या भव्य प्रमाणात क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची असे सांगून ,काही चूका राहून गेल्या असतील तर त्यात नक्कीच सुधारणा करु असे सांगत ‘प्रयत्नांती परमेश्वर’या उक्तीप्रमाणे कार्य करीत राहील्यानेच चूका लक्षात येतात,यश प्राप्त होतं,अनुभव प्राप्त होतो आणि कार्यसिद्धी तडीस नेता येते,असे अनुभवाचे बोल त्याने सांगितले.याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.माजी खासदार विलास मुत्तेमवार,काँग्रेसच्या सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व इतर नेतेगण,पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार विकस ठाकरे म्हणाले,की महालक्ष्मी फाऊंडेशनच्या युवा शक्तीसाठी ही आमदार चषक स्पर्धा म्हणजे परिश्रमाचा काळ होता.मागच्या शनिवारी या चषक स्पर्धेचे उद् घाटन झाले व बघता-बघता आज समारोपाची वेळ आली.समारोपाला या युवा शक्तीला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांची उपस्थिती युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.तांबे यांनी प्रत्येक जिल्ह्यात,गावा-गावात युवा काँग्रेस पोहोचवली.राज्यात पक्षाला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केले.युवक काँग्रेसच्या निवडणूकीत त्यांनी अनेक बैठका घेतल्या व यशस्वीपणे नव्या नेतृत्वाकडे जबाबदारीही सोपवली असे ठाकरे म्हणाले.आमदार चषर्क क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हा एक कौटूंबिक साेहळा असल्याचे सांगून १९८७ साली स्थापित झालेल्या महालक्ष्मी फाऊंडेशनची त्यांनी सविस्तर माहिती याप्रसंगी दिली.१९८७ साली नागपूरातील युवकांनी मिळून ही संस्था स्थापित केली होती.महालक्ष्मी फाऊंडेशन स्थापित करण्याचा एकच उद्देश्य होता समाजातील सामाजिक,धार्मिक क्षेत्रात युवकांना जोडून काम करने,तरुणाई ही जीवनातील अशी अवस्था असते ज्यात युवकांना जो मार्ग मिळाला त्यावर त्याचा प्रवास सुरु असतो.आम्ही पण आमच्या तरुणपणी ती मळवाट चोखाळली.१९९८ हे वर्ष महालक्ष्मी फाऊंडेशनसाठी विशेष ठरले कारण नागपूरचे तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते शरद पवार यांना या संस्थेच्या एका उपक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून अाणले.त्यांनी देखील तरुणाईच्या या संस्थेचे विशेष कौतूक केले होते.यामुळे संस्थेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.प्रत्येक वर्षी लाेकं जुळत गेले आणि बघता-बघता संस्था ही वटवृक्ष झाली.
संस्थेने अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवले मग त्यात रुग्णसेवा असो गरजूंसाठीची मदत असो,अडचणीत असणा-यांसाठी मदतीचा हात असो,शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रातील कामगिरी असो महालक्षमी फाऊंडेशनने उल्लेखनीय कार्य केले.आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सामुहिक विवाह सोहळे असो किवा जागतिक महामारीचा करोनाचा काळ,या संस्थेने दररोज हजारो गरजूंच्या भूकेची जबाबदारी स्वीकारली,यासाठी सलग दोन वर्षे कम्यूनिटी किचनचा उपक्रम राबवला.आता मात्र ही संस्था नव्या पिढीच्या तरुणांच्या हातात सोपविली आहे.महालक्ष्मी फाऊंडेशने जे ३० ते ३५ वर्षात आपल्या सामाजिक जबाबदारीतून नावलौकिक कमावले तेच नावलौकिक आता या नव्या दमाच्या तरुणाईने राखावे,अशी अपेक्षा याप्रसंगी विकास ठाकरे यांनी व्यक्त केली.
तरुणाईने ही आमदार चषक स्पर्धा यशस्वीपणे आयोजिक करुन त्यांच्यातील हे कर्तृत्व सिद्ध ही केले आहे.सध्या आयपीएल सुरु असल्याने आम्हाला ही स्पर्धा हिवाळ्यात अायोजित करायची होती मात्र त्यांना ही स्पर्धा नागपूरच्या ४६ डिग्री तापमानातच आयोजित करायची होती आणि त्यांनी ते आव्हान यशस्वीपणे पेलले,याचा विशेष आनंद आहे.त्यांची ही जिद्द बघून माझा ही उत्साह दुणावला.नागपूरातील खेळ प्रतिभेला समोर आणून त्यांना प्रेरित करण्याचे माझे कर्तव्य होते.अश्या क्रीडा स्पर्धांमधूनच एक चमू निर्माण होते.सामुहिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होत असते.कुठल्याही क्षेत्रात मग ते राजकारणाचे क्षेत्र असले तरी चमू महत्वाचीच असते.युवकांनी सामुहिक भावनेतून काम करावे,त्यांच्यातील चमूमध्ये कर्तृत्व असणा-यांना समोर आणने,संधी देने हे या शहराचा एक आमदार म्हणून माझी जबाबदारी अाहे,असे ठाकरे हे म्हणाले.
संजय वर्मा या युवा नेत्याने अश्याच युवा चमूमधून आपले कर्तृत्व सिद्ध करुन राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.सर्वांनी मिळून समाजासाठी काम करावे.ज्याप्रमाणे या युवा चमूने क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले तसेच यश त्यांनी सामाजिक क्षेत्रातही प्राप्त करावे अशी शुभेच्छा व्यक्त करीत, येणा-या दिवसात अश्याच पद्धतीचे आणखी सामने नागपूरकर प्रतिभावंत खेळाडूंसाठी आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.या वर्षी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यास १५० संघ आली होती मात्र वेळेचे बंधन लक्षात घेऊन त्यातील फक्त ३५ संघांनाच या वर्षी स्पर्धेत सहभाग नोंदवता आला.पुढील वर्षी किमान ७० संघांना संधी देण्याचे नियोजन युवा कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन ठाकरे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना सज्यजित तांबे म्हणाले,की महालक्ष्मी फाऊंडेशन सामाजिक उपक्रमांसाठी महाविद्यालयीन जिवनात असताना तरुणाईने एकत्रित्र येऊन निर्माण केलेली संस्था आहे..आज नवी पिढी या संस्थेची धूरा कुशलतेने सांभाळत आहे.केतन ठाकरे व त्याचे सहकारी अतिशय उत्तम कार्य करीत आहेत.आज क्रिकेट हा खेळ आपल्या देशात तरी फक्त विरुंगळा राहीला नाही तर तरुणाईच्या मना-मनात तयार होणारी एकोप्याची भावना या खेळातून निर्माण होत असते.खेळात वेगवेगळ्या जाती,धर्माचे लोक ही एक चमू म्हणून खेळत असतात.आपला संघ जिंकला पाहिजे ही एक सामुहिक प्रेरणा अश्या खेळभावनेतूनच निर्माण होत असते.याच भावनेची ख-या अर्थाने आज समाजाला गरज आहे.समाजात एकोपा निर्माण करण्याचे काम महालक्ष्मी संस्था करीत आहे.विकास ठाकरे हे तसेही एक ‘दमदार’ आमदार आहेत.कुठलीही गोष्ट त्यांनी एकदा हातात घेतली तर ते मार्गी लागेपर्यंत त्याच्या पिच्छा सोडत नाहीत.आमदार विकास ठाकरे यांच्या स्वभावातील द्रष्टेपणा,नियोजितपणाचे उदाहरण सांगताना तांबे म्हणाले,की नुकतेच मुंबईतील गांधी भवनात पक्षाची बैठक सुरु असताना पालघर मधून एक व्यक्ती त्या ठिकाणी आला.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही आतमध्ये बैठकीत व्यस्त होते.पालघर मधून आलेल्या व्यक्तीने आपली पिडा विकास ठाकरेंसमोरच मांडली,त्यांनी त्वरित पालघरमधील त्या अधिका-याचा नंबर घेऊन त्याला फोन लावला व फोन स्पीकरवर टाकला.त्यांच्या एका फोनवर त्या गरजू व्यक्तीचे काम झाले.नागपूरातील जरी ते पक्षाचे आमदार असले तरी पक्षाच्या संघटनेचे काम फक्त नागपूरच नव्हे तर जिल्ह्यात देखील त्यांच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
केतन ठाकरे हा प्रदेश युवा काँग्रेसचा सरचिटणीस झाला आणि ठाकरे कुटूंबातील आणखी एका प्रतिभेचा प्रत्यय आला.माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी खरं आहे विकास ठाकरे यांच्या रुपाने एक ‘हिरा’च शोधून काढला आहे.ते नेहमी सांगतात ‘माझ्याकडे विकास आहे विकासाची चमू आहे‘.खरं आहे प्रत्येक राजकीय नेत्याकडे आमदार विकास ठाकरे सारखी माणसे असली पाहिजे.पक्षाच्या मजबूत संघटनेसाठी अश्याच माणसांची पक्षाला गरज असल्याचे तांबे यांनी सांगितले.विकास ठाकरे यांच्या नेृत्वात संघटन आणखी वाढत राहील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना पक्षाचे सोशल मिडीयाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी अशी क्रीडा स्पर्धा आयोजित करुन महाराष्ट्र युवा काँग्रसने अतिशय चांगली कामगिरी केली असल्याचे सांगितले.माझे वडील माजी खासदार विलास मुत्तेमवार हे देखील यूथ काँग्रेसचे अध्यक्ष होते,अशी अाठवण त्यांनी शेअर केली.एखादा क्रीडा संघ जेव्हा बनतो तेव्हा वेगवेगळ्या जाती-धर्माचे खेळाडू एकत्रित येऊन एकाच उद्देश्यासाठी संघभावनेतून खेळत असतात.या युवा चमूने हे सामने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले,सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवले.खेळाची कंमेंट्री तर अतिशय उत्कृष्ट होती व प्रेक्षकांना बांधून ठेवणारी होती.या पूर्वी नागपूरात या दर्जाची अशी खेळ स्पर्धा झाली नाही.आता दर वर्षी स्पर्धक चमूंची संख्या महालक्ष्मी फाऊंडेशनने वाढवत न्यावी.ही संस्था या युवा चमूच्या नेतृत्वात आणखी नावलौकिक प्राप्त करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेतून नव्या दमाचे प्रतिभावान खेळाडू मिळाले:विलास मुत्तेमवार(काँग्रेसचे माजी खासदार)
याप्रसंगी बोलताना माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले,की युवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे याने गेल्या ९ दिवसांपासून नागपूरातील या बिशप कॉटनच्या मैदानावर जे ३२ उत्कंठावर्धक सामने रंगवले ते खरेच कौतुकास्पद आहे.अश्या सामन्यांची आज फार गरज देखील आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी १८० संघ इच्छूक होते मात्र ३२ स्पर्धांमध्येच प्रेक्षकांना समाधान मानावे लागले.सध्या तर आयपीएल देखील सुरु आहे,आजच हैदराबाद विरुद्ध पंजाबचा सामना रंगला आहे.आयपीएल सुरु असताना आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत खरे सांगायचे तर माझ्या मनात शंकाच होती मात्र ज्या संख्येने तरुणाईने या मैदानावर गर्दी केली ते बघता या खेळावर प्रेम करणा-या नागपूरकरांना ही दाद दिलीच पाहिजे.
आज या स्पर्धेतून आपल्या नागपूरच्या मातीतून नवीन प्रतिभावान खेळाडू आपल्याला प्राप्त झाले.एका खेळाडूने ८७ रन ठाेकले तर एका खेळाडूने १० चेंडूंमध्ये १८० पर्यंत मजल मारली.असे प्रतिभावान खेळाडू शोधून दिल्याबद्दल मी आमदार विकास ठाकरे व प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे या दोघांचेही अभिनंदन करतो.अश्या स्पर्धा आता थांबवू नका.ही त्यांची पहीलीच क्रीडा स्पर्धा आहे.यावेळी ज्या कहाी चूका राहून गेल्या असतील त्या दूर करुन पुढील वेळी आणखी चांगले आयोजन करा असे शुभेच्छापर मनोगत त्यांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे आपल्या नागपूरातील क्रीडा स्पर्धांच्या प्रक्षेपणाकडे जास्त लक्ष केंद्रित करा असा सल्ला देत बीसीसीआयने नुकतेच २०२२ ते २०२६ च्या आयपीएल स्पर्धांसाठी ६८ हजार कोटींपर्यंत निकष ठेवला आहे यावरुन प्रक्षेपणाचे महत्व अधोरेखित होतं.आयपीएलमुळेच क्रिकेटसारख्या खेळातील खेळाडूंचा ‘भाव‘लक्षात आला.ज्यांना यंदा यश मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुढील स्पर्धेत यश मिळवावे,असे आर्शिवचन त्यांनी दिले.
जे.एस-११ ठरली आमदार चषकाची मानकरी-
९ दिवस चाललेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ चमूंपैकी अंतिम फेरी जे.एस-११ व सॅमसुई-११ या चमूंनी गाठली.आज रविवार दिनांक २२ मे रोजी सदर येथील बिशप कॉटन मैदानात पार पडलेल्या अंतिम सामन्यात जे.एस-११ या चमूने विजेतेपद प्राप्त करुन रोख २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षीस पटकावले,सॅमसुई-११ द्वितीय विजेती चमू ठरली या चमूने १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले तर छत्रपती-११ या चमूने तृतीय स्थान पटकावले, ही चमू रोख ५५ हजार ५५५ रुपयांची मानकरी ठरली.याप्रसंगी सामन्यांचे उत्कृष्ट समालोचन करणारे मनीष पाटील व अमोल शेंडे यांचा ही सत्कार करण्यात आला.पंच सलीम व अजय यांचा ही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार पार पडला.

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक केतन ठाकरे यांचा ब्लॉक अध्यक्ष पंकज निघाटे व पंकज थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मॅन ऑफ द सिरीजसाठी ११ हजार १११,सर्वोकृष्ट फलंदाजसाठी ५ हजार ५५५,सर्वोकृष्ट गोलंदाजसाठी ५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेचे उद् घाटन दिनांक १४ मे रोजी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार व माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते पार पडले होते.
याप्रसंगी मंचावर उपस्थित महासचिव राजाभाऊ तिडके,गिरीश पांडव,माजी नगरसेवक प्रशांत धवड,योगेश तिवारी,संजय महाक़ाळकर,रश्मी उईके,दिपक वानखेडे,माजी शहर उपाध्यक्ष संजय भांगे,माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी,नागपूर शहर काँग्रेस कोषाध्यक्ष मनोज गोलावार,ऋषि कारांडे, माजी आमदार विक्टर प्रेटर्स आदींचा नागपूरी गमछा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आमचे चॅनल subscribe करा