Homeनागपूर न्यूजक्षमा बडन को चाहीये....

क्षमा बडन को चाहीये….

Advertisements

ज्वाला धोटे यांचे शरद पवारांवर शरसंधान

केतकीवर राज्यातील ११ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याबद्दल राज्य महिला आयोगावर प्रश्‍नचिन्ह

राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची राज्यपालांकडे करणार मागणी

नागपूर,ता.१८ मे २०२२: राष्ट्रवादीचे मागच्या दारातून आलेले विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतेच एका जाहीर सभेत पौराेहित्य करणा-या वर्गावर उपहासात्मक शेरेबाजी केली.संविधानाची शपथ घेणारे हे आमदार कोणत्याही धर्म,भाषा,पंथ इत्यादी आधारे नागरिकांमध्ये भेदभाव करणार नसल्याची शपथ घेत असतात.राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील ब्राम्हण वर्गाचे मन दुखावल्याबद्दल आपल्याच पक्षाच्या आमदाराला समज दिली नाही,यावर मलम लावण्याची नामी संधी केतकी चितळे या अनुभवहीन अभिनेत्रीच्या बाबतीत घडलेल्या घटनेनी दिली होती मात्र घडले विपरीत!एका नादान मुलीने कोणाची तरी पवार यांच्यावरील एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली त्याची एवढी मोठी शिक्षा तिला या सत्ताधा-यांनी द्यावी?राज्यातील ११-११ पोलिस ठाण्यात तिच्या विरुद्ध तक्रार नोंदविली जाते?शरद पवार यांचे वय व राजकारणातील त्यांचा अनुभव बघता खरेच त्यांनी मोठ्या मनाने तिच्या त्या बालिश विडंबन काव्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते,संत कबीर म्हणूनच गेलेत ना ‘क्षमा बडन को चाहीये,छोटन को उत्पात’.शरद पवार यांनीच आता आत्मचिंतन करावे ते जर सत्ताधारी नसते,सत्तेच नसते,गृहखाते त्यांच्या पक्षाकडे नसते तर केतकी चितळेसोबत या पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं आणि जे घडतंय ते घडलं असतं का?

एखाद्या दहशतवादीसारखा व्यवहार या तरुण व बालिश,बाळबुद्धि असणा-या अभिनेत्रीसोबत करण्यात येत आहे.ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस तिला फक्त एका फेसबुक पोस्टसाठी अटक करतात,संस्कारांचा आव आणना-या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता ती पोलिसांच्या अटकेत असताना तिला मारहाणीचा प्रयत्न करतात,तिच्यावर अंडी फेकतात,शाईने तिचे तोंड काळे करतात,यावरही प्रचार माध्यमे केतकी चितळे तरीही हसत होती म्हणून तिलाच अपराधी ठरवत असतील तर आघाडी सरकारच्या काळात सुसंस्कृत महाराष्ट्राचा ‘बिहार’झाल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.पवारांनी खूप उदार मनाने तिला क्षमा केली असती किंवा या अनुभवहीन अभिनेत्रीच्या विचारांना इतकं महत्वच दिलं नसतं तर महाराष्ट्रातला जो ब्राम्हण वर्ग त्यांच्यापासून आधीच दुरावला आहे त्यांच्या मनात किमान पवार यांच्याविषयी आदर तरी वाढला असता मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात आता जेव्हा कधी आघाडी सरकारचा कार्यभार लिहला जाईल त्यात ‘केतकी चितळे’ प्रकरणाचे एक ‘काळे पान’ कायमचे जोडले गेले आहे,हे पवारांनी विसरु नये,असा संताप ‘अन्याय निवारण समितीच्या’ अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

महाराष्ट्रातील ’लोकशाही’ लोप पावली असून आघाडी सरकारच्या काळात ‘मोगलशाहीचे’ पुनरागम झाले असल्याचेच आता म्हणावे लागेल कारण सूडबुद्धि,द्वेष आणि तिरस्काराचाच सर्वदूर कारभार सुरु असल्याचे दिसून पडतेय अशी जळजळीत टिका त्यांनी केली.ठाणे गुन्हे शाखेचे १२ अधिकारी केतकी चितळे या अतिशय सर्वसामान्य,मध्यमवर्गीय असणा-या अभिनेत्रीच्या घरी धाड टाकतात,तिच्या संगणक,मोबाई,लॅपटॉपमध्ये काही तरी ‘संशयास्पद’ शोधतात,एकाने तिला मुद्दामुन फोन करुन तिचा फोन टॅप केला त्यात तिने छत्रपतींचा उल्लेख फक्त छत्रपती असे न करता ‘शिवाजी महाराज’असा केला,हे देखील माध्यमे वारंवार दाखवित आहे की पहा हिने छत्रपतींना छत्रपती न म्हणता फक्त शिवाजी महारज म्हटले! हा सर्व प्रकार अतिशय तिटकारा आणि संताप आणनाराच आहे.ती राज्याची एक नागरिक आहे.त्यातही ती मराठी भाषिक आहे मात्र फक्त ती ब्राम्हण असल्यानेच पवार यांची ‘सेना’तिच्यावर तुटून पडली आहे,तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली,आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी तिला जामिन मिळू नये म्हणून राज्यात ११-११ पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या!तिला आयुष्यभर तुरुंगात डांबूनही तुमच्या मनातली धग शमणार आहे का?असा प्रश्‍न धोटे यांनी उपस्थित केला.

केतकीच्या त्या विडंबनात्मक काव्याचं कोणीही समर्थन करीत नाही मात्र ज्या शिवछत्रपतींचं नाव तुम्ही घेता ते स्वत: ‘गो,ब्राम्हण प्रतिपालक होते,हे तुम्ही सोयीस्करपणे कसे विसरता?शिवरायांचा काळ याच धोरणासाठी ओळखल्या जात असतो.तुमची धाेरणे मात्र ‘ओठी नाव शिवछत्रपतींचे कर्म मात्र सूडबुद्धिचे’ असे विरोधाभासी असल्याचा टोला ज्वाला धोटे यांनी लगावला.
ब्राम्हण समाजासोबत आघाडी सरकारच्या काळात जे काही घडतंय ते आघाडी सरकारसाठी ‘धोक्याची घंटा’ असल्याचा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.पवार यांनी आपल्या ज्येष्ठतेचा विचार करुन निदान आता तरी ‘आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण’ करण्याचा सल्ला धोटे यांनी दिला.

ज्या सदानंद खोत यांनी माध्यमांसमोर केतकी हिच्या विधानाचा विरोध केला पण त्याच वेळी तिच्यासोबत जे घडले त्यावर प्रखर टिका केली त्या खोतांच्याही छायाचित्राला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चपलांचा हार घातला?चपला-जोडे मारले?याचा अर्थ केतकी हिच्यावरील अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रात कोणीही बालू नये आणि माध्यमांनी देखील फक्त पवारांच्याच बाजूने वृत्त प्रसारित करावे,हीच लोकशाहीची गळचेपी पवारांना अपेक्षीत आहे का?सध्या तर महाराष्ट्रात विरोधकांना वीस फूट खड्ड्यात गाढण्याचा उघडपणे इशारा दिला जातो!पोलिस यंत्रणा ही देखील संपूर्णत:राजकीय दबावात काम करताना दिसतेय.केतकीला अटक करुन नेताना पोलिसांच्या समक्ष तिला थोबाडीत मारल्या जातं,शाई फेकली जाते,हाच का फूले
शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र?का नाही राष्ट्रवादीच्या त्या महिला कार्यकर्ता व पदाधिका-यांना शरद पवार यांनी परखड शब्दात खडसावले की हे योग्य नाही,कायदा आपले काम करेल.

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष् आहेत, का नाही त्यांना केतकी चितळेच्या आईचे संवैधानिक अधिकार आणि आत्मसन्मानाचे हनन होत आहे हे दिसत नाही?जर केतकी हिच्या आईने चाकणकर यांच्याकडे माझ्या मुलीसोबत पोलिसांच्या समक्ष दुव्यर्वहार होत असल्याची तक्रार केली तर चाकणकर याची दखल घेतील का?आपल्या पदाप्रतिच्या कर्तव्याला जागतील का?राज्य महिला आयोग हा ’राष्ट्रवादी‘ महिला आयोग नाही हे चाकणकर यांनीच आता सिद्ध करावे,असे आवाहन धोटे यांनी दिले.

आपल्या नातीच्या वयाच्या एका मुलीवर फक्त ती ब्राम्हण असल्याने इतका पराकोटीचा दुर्व्यवहार होत असेल,सूडबुद्धितून तिला आयुष्यातून उठवण्याचा कट रचल्या जात असेल,ती कारागृहातून सूटूच नये कारण तिने शरद पवार यांच्यासारख्या एका आराध्य दैवतेचा अपमान करण्याचे महाघोर पाप तिने केले आहे,असे जर राष्ट्रवादीच्या धुरिणांना फक्त एका फेसबुक पोस्टमुळे वाटत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी फार मोठी शोकांतिका आहे,अशी खंत धोटे यांनी व्यक्त केली.

एक वयोवृद्ध मराठी अभिनेत्रीने तर केतकीने जर पवार यांची माफी मागितली नाही तर कारागृहाच्या बाहेर आल्यावर तिचे मुंडके धरुन तिला पवारांच्या पायांवर लोळवणार असल्याची धक्कादायक प्रतिक्रिया माध्यमांसमाेर दिली,त्या अभिनेत्रीने तरी आपले मोठेपण कुठे जपले?उलट शुद्रतेचा परिचय दिला असं माझं असं ठाम मत आहे.माझ्या विरोधकांनी मला कितीही शिवीगाळ केली,अपमानास्पद टिका केली,कितीही फेसबुकवर पोस्ट टाकल्या तरी लाळघोटेपणातून मी माझ्या कोणत्याही विरोधकांसाठी असे विचार व्यक्त करणार नाही कारण प्रत्येकाला आत्मसन्मान असतो त्याहीपेक्षा म्हत्वाचं म्हणजे हा देश तुमच्या लाळघोटेपणातून नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला लागू केलेल्या संविधानाप्रमाणे चालतो हे कोणत्याही सत्ताधा-यांनी आणि राजकीय पक्षांनी विसरु नये कारण निवडणूकीत जनता सगळं लक्षात ठेवत असते,असा इशारा त्यांनी दिला.

आघाडी सरकारमधील तर दोन-दोन मंत्री ते ही राष्ट्रवादीचेच तुरुंगात आहेत याबद्दल मात्र पवार यांची बोलती बंद आहे.त्यांचा सर्व जोर ब्राम्हण वर्गाच्या एका अनुभवहीन व बालिश बुद्धिच्या व नातीच्या वयाच्या मुलीचा सूड घेण्यावर केंद्रित आहे.प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल आहे.केतकीने अशी राजकीय पोस्ट टाकायला नको होती.तिच्या पोस्टचा मी निषेधच करते मात्र केतकी प्रकरणावरुन महाराष्ट्रात जे काही घडलं ते महाराष्ट्राची देशात उरली-सुरली प्रतिमा घालवणारी व डागाळणारीच असल्याची टिका ज्वाला धोटे यांनी केली.

हीच आघाडी सरकार कोणत्या तोंडाने मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘हूकूमशहा’ म्हणते?केंद्रिय मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पुण्यातील बाल गंधर्व सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चाल करुन जातात?मुद्दा काय तर महागाई की राहूल गांधी यांचा अमेठीमधला पराजय!खासदारनवनीत राणा या पूर्वी अभिनेत्री होत्या,त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या छोट्या कपड्यावरील पोस्ट व्हायरल केली जात आहेत?यावरुन सत्ताधा-यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे?आज नवनीत राणा सार्वजनिक जीवनात वावरताना साडीशिवाय इतर परिधानात आढळत नाहीत,त्याचे काय?

तुम्ही राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा बेदिक्कतपणे ‘टरबुजा’असा उपहासात्मक उल्लेख करता,ते तुम्हाला चालतं!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही शेलके टोमणे मारता,त्यांचा पूर्व राजकीय इतिहासा सांगता,काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचा उल्लेख ‘इटालियन’किवा ’पांढरी पाल’असा करता,एकीकडे हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता व आपल्याच भावाला ’मुन्नाभाई‘ म्हणता?एकाला एक न्याय आणि दुस-याल दूसरा न्याय हे महाराष्ट्रात खपवून घेणार नाही,अन्याय निवारण समिती सनदशीर मार्गाने आता हा लढा लढणार असून लवकरच केतकी चितळे हिच्या आईची भेट घेणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.राज्यपालांना देखील भेटणार असून महाराष्ट्रात लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लावावे व महिलांना तुरुंगात डांबणारा हा अनागोंदी कारभार थांबविण्याची मागणी करणार आहे,असे त्या म्हणाल्या.

Latest बातम्या