Homeनागपूर न्यूजविदर्भवाद्यांनी अभिजित वंजारी यांचा केला प्रचार:रोंघे यांचा आरोप

विदर्भवाद्यांनी अभिजित वंजारी यांचा केला प्रचार:रोंघे यांचा आरोप

Advertisements

मी सुज्ञ विदर्भवादी आंदोलक: रस्त्यांवरच्या आंदोलनापेक्षा कोगदोपत्री व्यवहाराला देतो महत्व:नितीन रोंघे यांची भूमिका

आमचा कधीही रोंघेंना पाठींबा नव्हताच:राम नेवले

नागपूर,ता. ३० सप्टेंबर:पदवीधर निवडणूकीत मी वामनराव चटप यांच्या घरी समर्थन मागायला गेलो होतो.त्या निवडणूकीत माझ्या वर्गमित्रांनी पैसे गोळा करुन प्रचार केला मात्र मला विदर्भवाद्यांचे समर्थन मला मिळाले नाही,या मागील कारण म्हणजे विदर्भवादी नेत्यांना ‘हा पोरगा पुढे नाही गेला पाहिजे’असं वाटत होतं.उलट वामनराव चटप यांनी राजु-यात,मोरेश्‍वर टेंभूर्णे यांनी वरोरा तर राम नेवले यांनी मोवाड,नरखेड व काटोलमध्ये अभिजित वंजारी यांचा प्रचार केला,मग हेच का त्यांचे विदर्भप्रेम?विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक लढविणा-या पदवीधराला त्यांचे समर्थन का नव्हते?याचा विदर्भवादी जनतेनेच विचार करावा.राम नेवले यांनी तर २००९ मध्ये ही काँग्रेस ही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या विरोधात असताना आशिष देखमुख यांचा प्रचार केला होता,असा उघड आरोप पदवीधर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार नितीन रोंघे यांनी केला.

स्वतंत्र विदर्भ हा गेल्या अनेक दशकांपासून विदर्भवादी जनतेसाठी एक स्वप्नवत राज्य राहीले आहे मात्र त्यांच्या जिव्हाळ्याच्या भावनेशी सर्वच पक्षातील मुरलेल्या राजकारण्यांनी जो विश्‍वासघात केला, ते बघता स्वतंत्र विदर्भाची आशाच जनतेने कायमची सोडून दिली आहे.मात्र तरीही राम नेवले यांच्या नेतृत्वात होणारे व ही मना-मनात पार विझलेली धग आंदोलनाचा मार्ग पत्करुन ,हा विषय तापत ठेवण्याचा प्रयत्न होत असतो.माध्यमात त्यांच्या आंदोलनाला चांगला कवरेज ही मिळतो,विदर्भवादी वाचक ही ते वृत्त नजरेखालून घालत असतात पण या पलीकडे काहीही घडत नाही.

अशातच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढलेले विदर्भवादी उमेदवार नितीन रोंघे हे मात्र कोणत्याही आंदोलनात दिसत नाहीत जेणेकरुन त्यांनीच आपल्या प्रचारादरम्यान गेल्या दहा वर्षांपासून मी सातत्याने विदर्भवाद्यांच्या आंदोलनाचा एक भाग राहीलो असल्याचा प्रचार केला होता, शिवाय निवडणूकीनंतर ते राजकीय पटलावरुनच पार गायब झालेत यावर विदर्भप्रेमींध्ये बरीच चर्चा रंगत हाती.‘सत्ताधीश’ने यावर रोंघे यांना बोलते केले.

रोंघे यांच्या मताप्रमाणे, मी सुज्ञ विदर्भवादी आंदोलक असून मी सरकारसोबत कागदोपत्री व्यवहराला महत्व देतो.नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विदर्भातील नक्षलग्रस्त भागासाठी १२०० कोटींची मदत मागितली आहे,त्यांना अशी मदत मिळाल्यास त्यातील विदर्भावर किती खर्च राज्य सरकार वास्तविकपणे करणार आहे?हा माझा त्यांना प्रश्‍न असून नुकतेच मुख्यमंत्र्यांना मी मेल पाठवला असल्याचे ते म्हणाले.

दूसरी बाब म्हणजे २ ऑक्टोबर रोजी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे सेवाग्राममध्ये जात असत.मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत दरवर्षी सेवाग्रामला जात असतो.तिसरी बाब म्हणजे राम नेवले यांच्या २८ सप्टेंबरच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन झाले.मी कायदा मोडणारा माणूस नाही तर कायदाचा सन्मान करणारा आणि कायद्यांचे पालन करणारा विदर्भवादी आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे सध्या करोनाचा प्रादुर्भाव पूर्णरित्या संपुष्टात आला नसून अद्याप तिस-या लाटेची संभावना केंद्र व राज्यांच्या टास्क़ फोर्सने देखील व्यक्त केली आहे.अश्‍या वेळी गर्दी टाळणे हेच कोणत्याही नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्यच ठरतं,माझ्या मागे कुटुंबिय आहेत,लहान मुले आहेत,त्यांना काही झालं तर मी ठामपणे त्यांना कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यास समर्थ आहे मात्र मला करोनाचा प्रादुर्भाव झाला तर वृद्ध आई-वडील,पत्नी,बहीण,आत्या,लहान दोन मुले हे खचून जातील त्यामुळे विदर्भ हा माझ्या मनात आहे पण त्यासाठी मी उगीचंच कुटुंबियांना संकटात टाकू इच्छित नाही.

याशिवाय अर्थाजण ही सर्वात महत्वाची बाब आहे.मी एक अतिशय लहानसा व्यवसायिक असून माझ्यावर इतर १४ कुटुंबे निर्भर आहेत.माझ्यासह १५ कुटुंबांच्या अर्थाजणांचा प्रश्‍न मला करोना काळात सोडवणे अतिशय जड जात असताना मी सध्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही.

मात्र आजपर्यंत जेवढ्या ही निवडणूका झाल्या मी विदर्भवाद्यांनाच मत दिलं आहे.स्वत: राम नेवले हे २०१९ मधील विधानसभेच्या निवडणूकीत उभे होते तेव्हा सुयोग नगरच्या हरीभाऊ वानखेडे शाळेच्या ३०१ क्रमांकाच्या बुथवर मी नेवले यांना मतदान केले.नेवले यांना त्या निवडणूकीत जी ३ मते पडली होती त्यातील एक मत माझं होतं.

याशिवाय विदर्भवादी नेते हे वैधानिक विकास मंडळाचाच विरोध करतात,मंडळ बर्खास्त करा व विदर्भ द्या,अशी त्यांची मागणी आहे मात्र संविधानाने ती विदर्भासाठी केलेली अतिशय महत्वाची व्यवस्था आहे,विदर्भ वेगळा होईल तेव्हा होईल मात्र अशी मागणी करुन ते विदर्भाचे नुकसानच करीत आहेत.वैैदर्भिय विकास महामंडळ हे ‘लास्ट लाईन ऑफ डिफेन्स’ आहे ज्याप्रमाणे बीएसएनएल टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये ‘फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स’ आहे अगदी त्याच प्रकारे या वैधानिक विकास महमंडळाचे महत्व विदर्भासाठी आहे.कलम ३०२ हे हत्येसाठी असतं तरीही हत्या होते तर कलम ३०२ काढून टाकण्याची मागणी केली जाते का?

माझा आदर्श मामा किंमतकर हे आहेत.जे काही मागायचे ते कायदेशीररित्या मागायचे.२०१९ मध्ये राम नेवले यांनी निवडणूक लढवली तेव्हा बीआरएसपीचे सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.मुकेश समर्थ यांच्या घरी संपूर्ण विदर्भवाद्यांची बैठक झाली होती,त्यावेळी राम नेवले यांना त्यांचे निवडणूक चिन्ह कोणते हे देखील माहिती नव्हते?मी त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह सांगितले आणि त्यांचा सीरीयल नंबर १० असल्याची माहिती दिली.

२०१४ मध्ये वामनराव चटप निवडणूक लढले तेव्हा सर्वात आधी विदर्भाच्या मुद्दावर त्यांच्या घरी पैश्‍यांची मदत पाेहोचवणारा नितीन रोंघेच होता मात्र मी पदवीधर साठी समर्थन मागायला गेलो तर याच सर्व विदर्भवाद्यांनी मला समर्थन देण्यास नकार दिला!
माझा खुला आराेप आहे विदर्भवादी नेत्यांनी माजी प्राचार्य अरविंद देशमुख यांच्या ३७ लक्ष रुपयांचा अपहार केला,ते जग सोडून गेल्यावर त्यांचे पैसे देखील त्यांनी परत केले नाही.एक माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे सोडलेत तर माझा विदर्भाच्या बाबतीत कोणावरही विश्‍वास नाही.

रोंघे यांच्या उमेदवारीमुळे विदर्भवाद्यांविषयी चुकीचे मत:राम नेवले (अध्यक्ष,विदर्भ आंदोलन समिती)
आमचा सुरवातीपासून नितीन रोंघे यांच्या उमेदवारीला विरोध होता कारण पदवीधर मतदारसंघ हा खूप व्यापक असतो,विदर्भाच्या नावावर निवडणूकीत उभे राहील्यास व कमी मते मिळाल्यास विदर्भातील जनतेचाच विदर्भाच्या मुद्दाला पाठींबा नाही असा समज पसरतो आणि तेच घडले.रोंघे यांना अवघे काही शे मते पडली व हीच चर्चा घडली की विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक लढविणा-यांना विदर्भवादीच मते देत नाहीत,त्यामुळेच आम्ही पत्र परिषद घेऊन रोंघे यांना आमच्या समितीचा पाठींबा नसल्याचे जाहीर केले होते.

Latest बातम्या