
पालकमंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांना दिली माहिती
दोन लस घेणा-यांनाही डेल्टा प्लसची लागण!
नागपूर,ता. ९ सप्टेंबर: याच वर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील करोनाच्या अतिशय भयावह अश्या दुस-या लाटेनंतर गेल्या तीन-चार महिन्यात नागपूर ग्रामीण व शहरी भागाने थोडा मुक्ततेचा श्वास घेतला होता मात्र गेल्या ८ दिवसांपासून नागपूरात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून दुस-या लाटेच्या अनुभवातून शहाणे होत या वेळी मायबाप सरकार व प्रशासन कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नसून आज विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आज पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की नागपूरात डेल्टा प्लसचा संसर्ग दुहेरी आकड्यात पोहोचला असून काल रविवार संसर्गितांची संख्या १० होती ती एका दिवसात १३ झाली आहे,काळजीची बाब म्हणजे या १३ जणांमध्ये एक लहान मूल आहे.त्यामुळे सरकार व प्रशासन दुस-या लाटेचा विदारक अनुभव बघता कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही.आज ७८ नमुने हे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत.त्यात आणखी किती बाधित निघतात हे येत्या काही दिवसात कळेल.
नागपूरात डेल्टा प्लस संसर्गाचा धोका बघता पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून दूकाने ही पुन्हा फक्त दुपारी ४ वाजेपर्यंत उघडी राहतील,रेस्टॉरेंट,हाॅटेल्स इ.यांची ही वेळ रात्री ८ पर्यंत केली जाईल तर पुन्हा शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहील.येता काळ हा सण आणि उत्सवाचा असल्याने बाजारात होणारी गर्दी बघता डेल्टा प्लसचा उद्रेग टाळण्यासाठी व नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे अत्यावश्यक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला अावाहन करताना सांगितले ‘उत्सवापेक्ष्ा सरकारसाठी नागरिकांचा जीव महत्वाचा आहे’लवकरच हॉटेल व रस्टॉरेंट व दूकानदारांच्या संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनाही जी परिस्थिती नागपूरात उद् भवली आहे त्याबाबत अवगत करु,असे ते म्हणाले.दुसरी लाट नागपूरात आली तो काळ ही सण-उत्सवाचा होता,व्यापारी वर्गाने निर्बंधांना तेव्हा विरोध केला होता,त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आली होती मात्र त्याचे गंभीर परिणाम दिसून पडले.अशी परिस्थिती पुन्हा नागरिकांवर ओढे नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जाईल.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन लस घेणा-यांनाही डेल्टा प्लसचा संसर्ग झाला असून,ही बाब गंभीर आहे.त्यामुळे आपण लस घेतल्या आहेत,आपल्याला डेल्टा प्लसचा धोका नाही,अश्या भ्रमात नागरिकांनी राहू नये,अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
यावेळी हॉस्पीटल्स,ऑक्सीजन,बेड्स,वेंटिलेर्ट्स अशी पुरेशी तयारी आहे का?असे विचारले असता या सर्व बार्बीची पुरेशी उपलब्धता असून डॉक्टर वर्ग जे दिवस-रात्र सेवा देऊन मानिकसरित्या दमले होते ते देखील या तिस-या लाटेला रोखण्यासाठी सज्ज झाले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला.आढावा बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर व कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने आवश्यकता नसताना घराबाहेर पडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे. असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली.
सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा