

संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वपक्ष्ीय रिपब्लिकन संयुक्त मोर्चा
नागपुर,३० ऑगस्ट : आंबाझरी तलाव जवळील भारतरत्न डाॅ. आंबेडकर भवनाची निर्मिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या जागेवर विकास कामे होवु देणार नाही,असा एल्गार आज सर्व पक्ष्ीय रिपब्लीकन संयुक्त मोर्चा काढून आंबेडकरी जनतेने पुकारला. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा देत याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचा व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. नागपूर शहराचे पालकमंत्री गप्प का?असा सवाल आंबेडकरी जनतेने उपस्थित केला तसेच राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने आंबेडरी जनतेच्या भावनेकडे लक्ष न दिल्यास नागपुर हिवाळी अघिवेशन राज्य सरकारला जड़ जाणार असा इशारा देण्यात आला.
लोकशाही मार्गाने आंबेडकर भवनाच्या पुर्ननिर्मितीसाठी रस्ता रोको, जेल भरो आंदोलन चालु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

आंबेडकरी पक्ष, संघटनेच्यावतीनेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे आज दि.३० ऑगस्ट रोजी संविधान चाैकातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन
मोर्च्याला सुरवात झाली. प्रचंड घोषणा देत हातात निळे झेंडे, मागणी फलक घेवुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघाला.
वाहतुक विभाग कार्यालयाजवळ मोर्च्याला अडवण्यात आले. परिणामी आंदोलनकर्त्यांचा रोष वाढला. आम्हाला पुढे जावु द्या,म्हणून आंदोलनकर्त्यांनी मागणी रेटून धरली. पुढा-यांच्या हस्तक्षेपामुळे त्याच ठिकाणी सभेला सुरवात झाली.जोरदार पावसाने हजेरी लाऊनसुध्दा जनता विचलित झाली नाही.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितित आरडीसी कातकर यांना निवेदन दिले.
माेर्च्यात रिपाई, पिरिपा,रिपाई (आठवले)रिपाई (खोरिपा) समता सैनिक दल, भिम पँथर,(सा.स.) भिमराज की बेटी(सा.स) पश्र्चिम नागपुर भोजनदान समिती. रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, साहित्यिक, वकील मंडळी, महीला, कार्यकर्ते, विध्दार्थी,भा. बॊध्द महासभा पदाधिकारी प्रमुख्याने सहभागी होते.
निवेदनात एसआयटीमार्फत चौकशी करुन भवन उध्वस्त करणा-यांवर कठोर कार्यवाही करावी तसेच
पुर्वीच्याच जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्च्यात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेचा सहभाग होता.

प्रा. जोगेन्द्र कवाडे, उपेंन्द्र शेंडे, भुपेश थुलकर, जयदिप कवाडे,बाळु घरडे, मनोज बंन्सोड, अरुण गजभिये,सरदार, कर्नलसींग, तारिक भाई, विस्वास पाटील, साहित्यिक धनराज प्रकाश कुंभे,, इ.मो. नारनवरे, गोविन्द वाघमारे,अॅड. सोनिया गजभिये, बाळुमामा कोसमकर, कैलाश बॊंबले, राजा भाऊ नगराळे,प्रफुल बाराहाते, अनिल मेश्राम, अमूत गजभिये, दिनेश गोडघाटे, प्रेम गजभिये, यशत तेलंग, राजनीति वाघमारे, संजय जिवने, निरंजन वासनिक,रमेश घरडे, अजय चव्हाण, अॅड. स्मिता कांबळे, डाॅ. मनोज मेश्राम, अमन मेश्राम, धर्मपाल गजभिये, वर्षा मानवटकर, वनिता रामटेके, शोभा घरडे,इ. प्रामुख्याने सहभागी होते.
मोर्चा यशस्वी करण्यास बाळु घरडे, मनोज बंन्सोड, अरुण गजभिये, विस्वास पाटील,बाळुमामा कोसमकर,कैलाश बॊंबले, ओमकार अंबादे, शुभम घरडे, अमन मेश्राम, इ. अथक परिश्रम घेतले.

आमचे चॅनल subscribe करा