Homeनागपूर न्यूजज्वाला धोटे पैसे घेेेेेेेेेेऊन करतात आंदोलन!भाजप नगरसेवकांचा धक्कादायक आरोप

ज्वाला धोटे पैसे घेेेेेेेेेेऊन करतात आंदोलन!भाजप नगरसेवकांचा धक्कादायक आरोप

Advertisements

गंगा-जमुना वस्ती स्थानांतरित झालीच पाहीजे:पोलीस आयुक्तांच्या कारवाईचे पत्र परिषदेत अभिनंदन

नागपूर,ता. २१ ऑगस्ट २०२१: शहरातील बदनाम अशी गंगा-जमुना वस्ती ही स्थानांतरित झालीच पाहीजे,या साठीच आम्ही तेथील भाजपचे नगरसेवक प्रयत्नरत आहोत,या ठिकाणी इतर प्रांतातून अल्पवयीन मुली आणून तळघरात लपवून ठेवल्या जातात,त्यांच्याकडून धंदा करुन घेतला जातो,तडीपार गुंड्यांची या ठिकाणी सतत वर्दळ असते,रहीवाश्‍यांच्या घरांसमोरच ते गाड्या ठेवतात,वाद घालतात, तेथील रहीवाश्‍यांना या वस्तीचा अतिशय त्रास असून ज्वाला धोटे या ठिकाणी वारंवार आंदोलन करतात मात्र त्यांनी एकदाही येथील स्थानिक रहीवाश्‍यांची बाजू समजून घेतली नाही,त्या पैसे घेऊन आंदोलन करीत असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे प्रभाग क्र.२२ चे नगरसेवक मनोज चाफले,वंदना इंगटवार तसेच माजी नगरसेवक राजू धकाते यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना चाफले म्हणाले,की ज्वाला धोटे यांना या भागाची कोणतीही माहिती नाही,जवळपास १५-२० छूप्या गल्ली-बोळे या ठिकाणी असून पर प्रांतातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलींना येथील दलाल आधी नागपूरातच वाठोडा,मानेवाडा इ.आऊटर भागात घेऊन ठेवलेल्या घरात डांबून ठेवतात,योग्य संधी व ग्राहक मिळताच त्यांना मध्यरात्री वस्तीत आणून तळघरात डांबून ठेवल्या जातं,या मुली १३-१४ वर्षांच्याही नसतात मात्र त्यांना हारमोन चेंजेसचे इंजेक्शन टोचून लवकर वयात आणण्याचे कृत्य येथील दलाल करतात.आतापर्यंत अनेक तक्रारी केल्या पण कारवाई झाली नाही,आम्ही ११ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे जेव्हा तक्रार नोंदवली तेव्हा त्यांनी त्वरित कारवाई करीत ही वस्ती सील केली,यासाठी आम्ही तेथील नगरसेवक त्यांचे खूप अभिंनदन करतो त्यांनी अशी कारवाई करीत तेथील स्थानिक महिलांना मोकळा श्‍वास घेऊ दिला.

आम्हाला तेथे येणा-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा अतिशय त्रास असून घरा समोरच गाड्या लावत असल्यामुळे विरोध करताच चाकू दाखवतात,अश्‍लील शिवीगाळ करतात,तेरे बाप की जगह है क्या?अशी अरेरावी करतात,धमकी देतात,सर्वात दूर्देवाची बाब म्हणजे एक स्थानिक महिला आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवत असताना तीन मुलांनी तिच्या जवळ येऊन ‘तेरा रेट क्या है’असा धक्कादायक प्रश्‍न तिला विचारला!

आमच्या येथील महिला गॅलरीतसुद्धा उभ्या राहू शकत नाहीत,आमच्या येथील मुलींचे लग्न जुळत नाही कारण सभ्य समाज आम्ही गंगा-जमुना वस्तीजवळ राहत असल्याचे कळताच आम्हाला ही त्याच नजरेने बघत असल्याची तक्रार मनोज चाफले यांनी याप्रसंगी मांडली.
वंदना इंगटवार यांनी आम्ही लहान असतानापासून ही वस्ती बघत आलो असल्याचे सांगितले मात्र आता या महिला वस्ती बाहेर येऊन रस्त्यावर उभ्या राहून धंदा करीत आहेत,याचा स्थानिक रहीवाश्‍यांना खूपच त्रास होतो,महिला म्हणून मला या महिलांची सगळी दू:खे कळतात त्यामुळेच त्यांनी या अश्‍या व्यवसायातून बाहेर पडून दूसरा रोजगार करावा,असा आमचा प्रयत्न आहे.यासाठी त्यांना केंद्राच्या योजनेतून राेजगार उपलब्ध करुन देण्यात येईल असा देखील पर्याय त्यांच्या समोर ठेवला असता त्यांची हा धंदा सोडण्याची मनस्थितीचनसल्याचे इंगटवार यांनी सांगितले.

ज्वाला धोटे मात्र या एका हाताने टाळी वाजवित आहेत त्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवावी,त्यांनी स्थानिक रहीवाश्‍यांच्या समस्या देखील समजून घ्यावा.स्थानिक रहीवाश्‍यांना देखील लहान मुले आहेत,त्यांचे देखील भविष्य आहे, ज्वाला धोटे या तर १० मिनिटांचे आंदोलन करुन निघून जातात,पैसे घरी पोहोचल्यानंतर आंदोलन संपवूनही टाकतात,आमच्या भागात मुलींना बघायला मुलाकडची मंडळी येते तेव्हा मुलींच्या कुटुंबियांच्या मनात धास्तीच असते.या ठिकाणी व्यापारांना देखील या वस्तीचा खूप त्रास आहे.

त्यांनाही या वारांगणा ब्लॅकमेल करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.या वारांगणा लोकांचे घर उधवस्त करतात,अाम्ही त्यांना आता या पुढे हा देहविक्रीचा धंदा करु देणार नाही,वेळप्रसंगी आम्हीच आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करु,असा इशारा इंगटवार यांनी दिला.आम्ही येथील वारांगणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ,पैसे मिळवून देऊ,असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना भाजपचे माजी नगरसेवक राजू धकाते म्हणाले,की माझे घर तर या वस्तीच्या १५-२० मीटर अंतरावरच आहे.७० टक्के या वस्तीतील घर मालकीणी या मरण पावल्या आहेत.पैश्‍यांच्या बळावर येथील वारांगणांनी ९० टक्के घरे विकत घेतली आहेत.त्यांचे आता वर्चस्व वाढले,विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील एखाद-दोन अपवाद सोडता सर्व वारांगणा या परप्रांतीयच आहेत.बदनामपूरा,मध्यप्रदेश,राजस्थानमधून अल्पवयीन मुली पळवून आणल्या जातात,त्यांना जबरीने धंद्याला बसवले जाते, पोलीसांनी वेळोवेळी छापा मारुन ११ अल्पवयीन मुलींना या वस्तीतून सोडवले व त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

याच वस्तीत दवाखाना असल्याने अल्पवयीन मुलींना उपचारासाठी दवाखान्यात आणले जाते मात्र त्यावेळी तिच्यासोबत ३-४ दलाल तिच्या आजूबाजूला असतात.या ठिकाणी चार सरकारी शाळा होत्या,त्या देखील वारांगणांच्या वस्तीमुळेच बंद पडल्या कारण चांगल्या घरचे पालक या वस्तीत आपल्या मुलांना शिक्ष् णासाठी पाठविण्यास तयार नसल्याचे त्या शाळा संचालकांनीच सांगितले.

या ठिकाणी सकाळी ६ ते रात्री १२ वा.पर्यंंत भयाचं वातावरण असतं.महत्वाचे म्हणजे ग्राहकांना १००-२०० रुपयांची बाेली करुन दलाल आत नेतात व खोलीत जाताच बाहेरुन कडी घालतात,ग्राहकांचे मोबाईल हिसकले जातात,मोबाईलमधील बायकोचा नंबर घेतला जातो,धमकी दिली जाते,त्यांना ब्लॅकमेल केले जाते,पाकीटातले संपूर्ण पैसे लृटतात,अनेक ग्राहक हे तर आमच्याच घरासमोर रडत-भूकत बसतात.
पोलीस आयुक्तांनी आमच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन वस्ती सील केली याचा आम्हाला विशेष आंनद आहे.मागच्या १० दिवसांपासून येथील स्थानिक रहीवाशी ३५ वर्षांनंतर मोकळा श्‍वास घेतोय.

यावेळी बिल्डर लॉबीबाबत प्रश्‍न विचारला असता चाफले यांनी ९० टक्के घरे वारांगणांच्या मालकीची असल्याने बिल्डर लॉबीचा प्रश्‍नच उद् भवत नसल्याचे सांगितले.ही फक्त अफवाह निर्माण करण्यात आली आहे,वारांगणा त्यांची घरे विकणारच नाही तर बिल्डर लॉबीचा प्रश्‍न येतोच कुठे?असे त्यांनी सांगितले.

ही वस्ती सील झाली व प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा देखील १० सप्टेंबर २०१५ रोजीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या ठिकाणी वारांगणांना घर मालक असल्याने राहता येईल मात्र व्यवसाय करता येणार नसल्याचा निकाल दिला होता,असा खुलासा चाफले यांनी केला.

वारांगणांच्या वस्तीच्या मधोमध पोलीस चौकी असताना अवैध धंदे चालतात किवा अल्पवयीन मुलींकडून व्यवसाय करुन कसा घेतला जाऊ शकतो?या प्रश्‍नाबाबत बोलताना,या ठिकाणी अनेक जुनी घरे आहेत,त्यात तळघरे आहेत,पोलीस छापा टाकतात मात्र अनेकदा त्यांनाही छूपे अड्डे सापडत नाही पण असे असले तरी पोलीसांनी या वस्तीतून ११ अल्पवयीन मुलींची सुटका केली असल्याचे चाफले हे म्हणाले.रात्रीच्या अंधारातच मुलींना इकडून तिकडे पाठवले,लपवले जाते.

करोना काळात आम्ही अन्नधान्याचे किट या वस्तीत वाटले,संघाने देखील या वस्तीत अन्नधान्याचा किट वाटल्या,घरोघरी जाऊन आम्ही मोबाईल क्रमांक घेतले,त्यांना मदत दिली मात्र आता या वस्तीचा त्रास खूपच वाढला असल्यामुळे आम्हाला ही वस्ती या ठिकाणी नको आहे,त्यांच्या उत्थानासाठी आम्ही वाटल्यास केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही जाऊ,मदत मागू,गृहउद्योग,बचतगट इ.सारखे अर्थाजनाचे साधन त्यांना उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी असल्याचे वंदना इंगटवार यांनी सांगितले.

आजच दूपारी ३ वाजता एसीपी,लकडगंजचे पोलीस आयुक्त,सामाजिक संस्था आदींनी वारांगणांसोबत वस्तीतच बैठक घेतली,त्यांच्या समस्या विचारल्या,अनैतिक धंदा सोडून इतर रोजगार करणार का याविषयी विचारले मात्र एका ही उपस्थित वारांगणांनी या प्रस्तावाला होकार दिला नसल्याचे इंगटवार यांनी सांगितले.

ही वस्ती या ठिकाणाहून हूसकवली तर अनैतिक देह विक्रीचे हे लोन संपूर्ण शहरात नाही पसरणार का?या प्रश्‍नावर बोलताना,या वस्तीतील वारांगणा आज ही शहरातील अनेक हॉटेल्समध्ये जातातच,असे इंगटवार यांनी सांगितले. या ठिकाणी मुख्य सिमेंट रस्ता स्थानिकांसाठी तसेच गंगा-जमुनातील वारांगणांसाठी उपयोगात येत असल्याने आता प्रत्येक महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोणच बदलला अाहे.आधीचा काळ संपला आता या वारांगणा अगदी आमच्या घरांसमोर येऊन आणि रस्त्यावर बसून धंदा करु लागल्या आहेत.बाजारहाट करताना आम्हाला ही त्यातीलच एक समजल्या जात आहे,त्यामुळे पाणी आता डोक्यावरुन गेल्यानेच ही वस्ती आम्हाला या ठिकाणी नको,असा निर्धार इंगटवार यांनी व्यक्त केला.

माजी महापौर संदीप जोशी हे उद्या गंगा-जमुना वस्तीत राखी पोर्णिमा साजरी करणार आहेत,त्यांना अन्नधान्याच्या किट्स वाटणार आहेत तर दूसरीकडे त्यांच्याच भाजप पक्ष्ाचे नगरसेवक वस्तीला विरोध करीत आहे हा विरोधाभास कसा?या प्रश्‍नावर बोलताना संदीप जोशी हे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणार आहेत,त्यांचा या उपक्रमाचा पक्ष्ाशी काहीही संबंध नसल्याचे इंगटवार म्हणाल्या.

Latest बातम्या