

फडणवीस यांचा वाढदिवस परिसरात साजरा:बाबा ताजुद्दीनच्या विशवस्तांमध्येही खदखद
प्यारेखान यांनी तरी ‘अराजकीय’पायंडा पाडावा:बाबांच्या भक्तांना अपेक्ष्ा
धार्मिक स्थळी राजकीय उपक्रम नकोच:भक्तगणांची मागणी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journlist)
नागपूर,ता. २४ जुलै: ‘प्यारे खान’ नागपूरात तर बस ‘नाम ही काफी है’असे व्यक्तिमत्व आहे,‘ऑक्सीजन मॅन‘ आणि कोविडकाळातील ‘देवदूत‘म्हणून ओळखले गेलेले प्यारेखान हे प्रसिद्धी माध्यमात झळकले आणि गडकरींच्या गुड बूकमध्ये ही आले.गडकरींच्या पुढाकाराने नागपूर शहरात त्यांनी आॅक्सिजन आणले.त्यांची किर्ती चहु दिशांनी पसरली.प्रचार प्रसार माध्यमांत प्रसिद्धी ही भरपूर मिळाली. मुळात गरीबीतून वर आलेला हा अवलिया एकेकाळी आॅटो ड्रायवर होता.आज ट्रांसपोर्ट क्षेत्रातला बाप माणूस म्हणून ओळखले जातात, रग्गड पैसा,मेहनतीने उभारलेले साम्राज्य,गडकरींनी हाथ दिला आणि सध्या ते बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे विशवस्त ही आहेत मात्र २२ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रस्टच्या परिसरात एक ‘राजकीय’ सोहळा पार पडला अाणि अनेकांची नाराजी सोशल मिडीयावर उमटली.

बाबा ताजुद्दीन हे एक पवित्र असे धार्मिक स्थळ आहे,त्या ठिकाणची पवित्रता ही टिकून राहीली पाहिजे.हा परिसर ‘सर्व धर्म समभाव’पाळणारा व मानणारा आहे,भाजपची विचारसरणी अशी आहे का?असा सवाल समाज माध्यमांवर उमटला.
संस्थानाच्या माध्यमातून हा परिसर आणि हे धार्मिक स्थळ आणखी समृद्ध झाले पाहिजे,यात उत्तरोत्तर सुधार झाले पाहिजे,अशी अपेक्ष्ा विशवस्त म्हणून प्यारे खान यांच्याकडून ठेवली जात आहे.मात्र असा राजकीय उपक्रम आयोजित करुन या पवित्र स्थळी प्यारेखान सारख्या सहह्दयी माणसाने उगाच ‘राजकारण’घूसवले,अशी टिका समाज माध्यमात उमटली आहे.
भारतीय जनता पक्ष् हा प्यारे खान सारख्या सरळ मार्गी व सहह्दयी माणसाचा ’राजकीय’वापर करीत असल्याची शंका देखील अनेकांनी व्यक्त केली.या पूर्वीचे देखील विशवस्त हे थोडे फार राजकीय बाजूने झूकले होते हे मान्य करीत निदान प्यारेखान यांच्यासारख्या ‘अराजकीय’विशवस्ताने तरी हा चूकीचा पायंडा बदलावा,अशी अपेक्ष्ा देखील व्यक्त करण्यात आली.

एका नेटकरीने तर ‘गुळाला मुंगळे चिकटावे तसे प्यारे खानला भाजपचे स्थानिक नेते चिकटले‘अशी जळजळीत टिका केली.शहराध्यक्षापासून ते दक्षिण नागपूर आमदारांपर्यंत, सर्वांना अचानक प्यारेखानसोबत मैत्री ठेवण्याचा ‘मोह’आवरता येत नाही. अनेक भाजपावाल्यांना तर प्यारेखान यांच्या रुपाने आयता ‘फायनांसर’ मिळाला!असा देखील सूर माध्यमात उमटला आहे.भाजपच्या तर अनेक नेत्यांनी प्यारेखान यांनी दान म्हणून दिलेले आॅक्सिजन सिलेंडरच आपल्या नावाने खासगी रुग्णालयात वाटले!प्यारेखान मुळात प्यारा भोळा माणूस,एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेला. त्यामुळे सवय लागलेली….!
बाबा ताजूद्दीन ट्रस्टवर चेअरमन म्हणून नियुक्ती,पुन्हा गडकरींचा आशीर्वाद,सर्वधर्म समभावाचे ट्रस्ट असतानाही प्यारेखान यांचा झुकाव भाजपकडेच असल्याची टिका ही झाली. ट्रस्टच्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांचे होर्डिंग लागल्याने व ट्रस्टच्या माध्यमातून फडणविसांचा वाढदिवस साजरा झाल्याने अनेकांची नाराजी ओढवली.
ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून सर्वच विश्वस्तांची प्यारेखान यांना मान्यता मिळाली.त्यामागे ताजबागचे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती व आहे पण प्यारेखान यांचे लक्ष ताजबागपेक्षा भाजपमध्येच अधिक!प्यारेखान यांना एका मोठ्या नेत्याने विधानपरिषद (एमएलसी) आॅफर केल्याची चर्चा ही समाज माध्यमात रंगली!
एका नेटीझनने तर ‘चाटूकारिता से ट्रस्ट की जगह तो पा लोगे प्यारे..लेकीन शहंशा की रहमत कभी तुम पर ना होगी!असा संताप व्यक्त केला आहे.

सर्वांचा एकच संताप आहे, ताजबागचा राजकीय वापर का? आजपर्यंत जे झाले नाही ते आज का घडतंय? मुस्लीम समाज व बाबांच्या भक्तांमध्ये यामुळे चिंता पसरली आणि ती चिंता समाज माध्यमावर उमटली.
प्यारेखानने समाजसेवा करावी, मोठ्या नशीबाने मिळालेले बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे काम नेटाने पुढे न्यावे. ताजबागचे रुप पालटावे, आदर्श संस्थान तयार करावे. ताजबागचा सर्वधर्म समभाव वृद्धींगत करावा. हे सर्व करतांना प्यारे खानने आपली प्रतिमा जपावी. भाजपच्या गोटात न शिरता स्वतंत्रपणे काम करावे. कारण प्यारे खान माणूस म्हणून संवेदनशील, गरीबी जाणणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा, होतकरु आहे,असा ही सूर समाज माध्यमात उमटला

मी राजकीय नेत्यांच्या मागे नाही तर चांगल्या लोकांच्या सोबत:प्यारे खान
समाज माध्यमात प्यारेखान यांच्या विषयी उमटलेल्या वादंगाबाबत ‘सत्ताधीश’ने प्यारेखान यांच्यासोबत संवाद साधला असता मी ‘अराजकीयच‘ माणूस आहे,फडणवीस हे चांगले व्यक्ती आहे आणि मी चांगल्या व्यक्तींसोबत आहे.प्रत्येक पक्ष्ात चांगली माणसे आहेत,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही चांगली माणसे आहेत,मी पक्ष् बघत नाही,माणसांमधील चांगूलपणा बघतो.माझी अशी संकुचित विचारसरणी नाही.
मूळात फडणवीस यांचा वाढदिवस मी ट्रस्टच्या पैशाने नव्हे तर माझ्या पैशाने साजरा केला.फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजू मुलांना मोबाईलचे वाटप करण्यात आले,याचा फायदा समाजाला नाही झाला का?
बाबा ताजुद्दीन यांच्या परिसरात पोस्टर आणि बॅनर लागले मात्र ते ‘राजकीय’नव्हते.चांगली माणसे ही राजकारणात आहेत त्यात त्यांचा काय दोष?

आमचे चॅनल subscribe करा