

(छायाचित्र-चार मजली निमार्णाधीन पार्कींग प्लेस)
फूटाळा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर…..!
शहरातील पर्यावरणप्रेमींनी स्वीकारली हार!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १८ जुलै: एका सुप्रसिद्ध कविंनी शहरातील नष्ट होणा-या तलावांच्या संदर्भात ‘संघर्षो से भरी है मेरी कहानी,सुनोगे तो आएगा आँखो में पानी’अशी शब्द सुमनांजली वाहीली आहे.नागपूर शहराचा विचार करता या शहराला निसर्गाने एकेकाळी एक-दोन नव्हे तर ११ तलाव व नद्यांची देणगी दिली होती,हे शहर त्यांच्या अस्तित्वाने समृद्ध होतं मात्र सतत वाढत्या लोकसंख्येचा ताण,नोकरशाहीचा असंवेदनशील दृष्टिकोण,राजकारण्यांची विकासाची ‘अदूरदृष्टि’बिल्डर्सची निसर्गाचा सत्यानाश करण्याची पराकोटीची भूक,प्रशासनाचा कामचुकारपणा,नागपूरकरांचा अापमतलबीपणा आणि अलिप्तपणा इ.अश्या अनेक कारणांमुळे या शहरातील अनेक तलाव व नद्या या ‘मृतप्राय’झाल्या असून त्यातील असाच एक तलाव म्हणजे ‘लव्ह बर्डस ची डेस्टेनी’समजला जाणारा ‘फूटाळा तलाव’ हा आहे…….!
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे या तलावाला घेऊन फार मोठी स्वप्नं आहेत. हैदराबादच्या धर्तीवर या तलावात ही ’लेझर शो’ सुरु व्हावा,यासाठी व्यूअर्स गॅलरीचे काम सध्या फूटाळा तलावाच्या बंधा-यांवर ‘जोरशोरसे‘ सुरु आहे तर रस्ताच्या खाली ९ मजली पार्कींग प्लाझाचे बांधकामही सुरु असल्यामुळे या तलावाच्या मूळ स्ट्रकचरला फार मोठा धक्का बसला आहे.तलावाच्या बंधा-याला अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन फूट पाणी हे खाली गेले आहे.

(छायाचित्र-४ हजार प्रेक्ष् कांसाठी निर्माणाधीन प्रेक्ष् क गॅलरी)
सहसा पावसाळ्यात तुडूंब पाण्याने भरलेल्या या तलावात पाण्याची पातळी खोल गेली आहे.मात्र काहीही करुन या शहराच्या काही ‘भाग्यविधात्यांना’विकास साधायचाच असल्यामुळे नदी,तलाव,जगंल,पशु पक्ष्यांवर निरपेक्ष् प्रेम करणा-या अनेक पर्यावरणप्रेमींनी म्हणूनच फूटाळा तलावाची दूर्दशा बघता या विकासाला ‘विकासाची गुंडागर्दी’असे नाव दिले आहे…….!
नागपूर शहराचे संपूर्ण तलाव आणि नद्या या पश्चिमेकडू पूर्वेकडे वाहणा-या आहेत म्हणजे उतारावर त्यांचे पाणी उतरत असतं.फूटाळा तलावाची निर्मिती ज्ञानोजी भोसले यांनी १७९९ साली केली होती.त्यांच्या अश्वांना पाणी पिण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतीला याचा लाभ व्हावा यासाठी या नितांत सुंदर,मनमोहक तलावाची निर्मिती झाली होती.
छायाचित्र- वाडी परिसरात पंजाबराव कृषी विद्यापीठ अधीन हाच तो ३५ हेक्टर जंगल परिसरातील फुटाळा तलावाचे कॅशमेंट क्षेत्र आणि बांधकामाचा कचरा!)
आज या तलावाचे आयुष्य २२२ वर्षाचे झाले मात्र..….!पहील्यांदा या तलावाच्या अस्तित्वालाच जबर धक्का बसला….!१९७२ साली पहील्यांदा या तलावाची भिंत पडली होती.पाटबंधारे विभागाने ती बांधून दिली.यानंतर पुन्हा १९९६ साली या तलावी भिंत पडली होती.
हा तलाव पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अधीन होता त्यांनी मासेमारीसाठी फिशरीत विभागाला तो लीजवर दिला.१९९५-९६ पासून या तलावामध्ये मनुष्यप्राण्यांचा हस्तक्ष्ेप वाढला…..!१९९९ मध्ये पंजाबराव कृषि विद्यापीठाने १ कोटी ८० लाख रुपये खर्च करुन या तलावाचे जुज्बी सौंदर्यीकरण केले.
यानंतर या तलावात गणपती विसर्जन तसेच फूटाळा तलावा मार्गे छिंदवाडाला जाण्यासाठी हेवी ट्राफिक सुरु झाले.यामुळे या तलावाच्या
भिंतीला तडे जाऊ लागले.हा तलाव वाचवण्यासाठी न्यायालयात काही पर्यावरणप्रेमींनी पीआयएल देखील दाखल केल्या.त्यामुळे हा तलाव अस्त्विात आहे मात्र आता या तलावाच्या मूळावरच विकासाचे खाेलवर घाव बसताना आढळून येत आहे…..!

(छायाचित्र- तलावाचे पाणी असे कमी झाले)
हा तलाव ऐतिहासिक वारसामध्ये मोडतो,नियमाप्रमाणे तलावाच्या बंधा-यांवर,भिंतीवर कोणतेही बांधकाम करता येत नाही मात्र सध्या या तलावाच्या भिंतीवरच घाव घालून प्रेक्ष् क गॅलरीचे निर्माण कार्य जोमोने सुरु आहे,हॅरिटेज समिती महाभारतकालीन धृतराष्ट्राच्या भूमिकेत शिरली असल्याचा पर्यावररणप्रेमींचा आक्रोश आहे…..!
२२२ वर्ष प्राचीन असलेला हा तलाव आणखी पुढे एक हजार वर्ष कसा टिकेल यावर हॅरिटेज समितीच्या कार्यपद्धतीचा भर असायला हवा होतो मात्र….कलियुग आहे……कलियुगात सर्वच काही नष्ट होणार आहे,आज नागपूर शहरातील या नैसर्गिक धरोहर नष्ट होत आहेत नंतर पशु पक्ष्ी जलचरांचा क्रमांक लागणार आहे पुढे मानव प्राण्याला विकास नावाच्या भकास संकल्पनेत नेस्तनाबुत होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नसल्याची व्यथा या शहरातील पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात….!
हे पण वाचा…..
फूटाळा: भरण टाकून काँग्रेसच्या नगरसेवकाने बांधला अनाधिकृत लॉन!(भाग-२)
आता आम्हाला हा तलाव वाचवण्यासाठी नाही लढायचे,काय मिळाले एवढी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढून?पदरातला पैसा खर्ची घातला,कुटुंबियांचा रोष ओढवून घेतला,जीव तोडून प्रेम केलं या धरोहरांवर,आज स्वर्गातून ज्ञानोजी भोसले या तलावाची अशी विकासात्मक दशा पाहत असतील तर रडत असतील…..आम्ही देखील मरत नाही म्हणून जगत आहोत…..हा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे…..एक दिवस नागपूरच्या इतिहासात याची नोंद निश्चित होणार,व्हेरायटी चौकापर्यंत जाे हरीत पट्टा आहे तो वाळत जाणार आहे…….!
हा देश कधीही अमेरिका,युरोप होऊ शकत नाही,तिथे पर्यावरणाला हानि न पोहोचवता शाश्वत विकास साधला जातो,नागपूरात तलावाचे स्कट्रर देखील बांधकामापूर्वी ऑडीट करण्यात आले नाही,कोणाला पडली आहे या सर्व उठाठेवी करण्यास?
कोणतेही स्कट्रचरल ऑडीट न करता डायरेक्ट फूटाळ्यावर बांधकामाला सुरवात झाली.शेवटी निवडणूका या दर ५ वर्षानंतर येतातच,त्यावेळी मत मागायला ‘विकास ’नको का दाखवायला?नागपूरकर जनतेला!पाणी खालच्या खाली बंधा-याला खालून तडे गेल्यामुळे झिरपत आहे एक दिवस हा तलाव पूर्ण रिकामा होईल,मात्र नागपूरकर हे प्रेक्ष् क दीर्घामध्ये बसून लेझर शोचा आनंद घेत राहतील……!
सध्या गाई म्हशी येथे सुरक्ष्ा भिंत नसल्याने आरामात पोहतात,त्या म्हशींची आंघोळ ही ४ हजार प्रेक्षक एक साथ एडीशनल आनंद म्हणून बघू शकतात…….! नुकतेच येथे सुरक्ष्ा भिंत नसल्यामुळे एका युवकाने मोटरसायकलसहीत तलावात उडी घेतली…नेमका तलावाचा हा मोकळा भाग आत्महत्या पॉईंट ठरला आहे पण?असलेल्या भिंतींना तडे देणारा विकास साधला जात असताना नसलेल्या जागेवर सुरक्ष्ा भिंत बांधण्यास कोण पैसा खर्च करणार आहे?याला विकासाचा दृष्टिकाेण मग कोण म्हणेल?
गणपती विसर्जनानंतर या तलावातील गाळच काढला गेला नाही,त्यामुळे तलावाचे पाणीच ‘मृत’झाले आहे,ऑक्सीजन नसल्यामुळे मासे देखील जिवंत नाही,फक्त हौशी शिकारी गाळ टाकून वेळ घालवत असतात…….!फूटाळा वस्तीतील संपूर्ण ड्रेनेज याच तलावाची ‘शुद्धता’करातो!तर बॉटनिकल गार्डनचे संपूर्ण सिवरेज देखील याच तलावात सोडण्यात आले आहे…..!
हा तलाव २०० हेक्टरच्या जागेवर वसला आहे.पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अधीन येणा-या १७५ हेक्टर जागेवर या तलावाचे नैसर्गिक स्त्रोत आहेत.मात्र दूर्देवाने त्या प्रचंड हिरव्यागार जंगलाला सुरक्ष्ा भिंतच नसल्याने वाडीबहूल भागातून बांधकामाचा संपूर्ण कचरा या जंगलाच्या बाजूने रात्रीच्या वेळी ढकलला जातो…..!
सर्वात मोठा धोका याच ठिकाणी आहे…….!
पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अधीन असणा-या या जंगलाला भिंत बांधण्यासाठी अकोला येथील मुख्य कार्यालयाला २०१२ साली प्रस्ताव पाठवण्यात आला.तेथून तो मुंबईच्या मंत्रालयात धूळ खात पडला आहे मात्र ४-५ कोटींचा खर्च कोणत्याही सत्ताधारी राजकीय पक्ष्ाला ‘पेलवला’गेल्या नसल्याने हा संपूर्ण भाग प्रंचड अतिक्रमणाच्या धोक्यात आला आहे.….!वाडी ग्रामपंचायतीची जेपीसी येते आणि….हा संपूर्ण बांधकामाचा कचरा भिंत नसलेल्या या जंगलात ढकलून निघून जाते……!
नुकतेच या भागात अनाधिकृत दरगाह निर्माण करण्यात आली होती,न्यायालयाच्या आदेशाने ते पाडण्यात आले मात्र अवैध गतिविधींसाठी अद्यापही संपूर्ण परिसर खुला आहे… मोकळा आहे……!आगी देखील लावण्यात येतात…….!शहराच्या मध्यभागी असणा-या या मोक्याच्या हिरवळीवर अनेकांची ‘नजर’आहे…..!
मात्र पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने या संपूर्ण वाडी परिसरातील ३५ हेक्टरचे जंगल व फूटाळाचे कॅशमॅट वाचवण्यासाठी कोणताही ‘विकासपुरुष‘समोर येत नाही....!हे जंगल नष्ट झाले त्या दिवशी फूटाळा तलावाचा मूळ स्त्रोत ही नष्ट होणार…..!मग लेझर शोमध्ये प्रेक्ष् क फक्त आभासी पाणी बघू शकतील आणि आनंद घेऊ शकतील….!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तलावाची मालकी पाटबंधारे विभागाकडे हवी तर ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे,ज्या विभागाला बांधकामाशिवाय कोणतीही दूरदृष्टि नाही!!या विभागाकडे तो व्हिजनच नाही,असता तर हा तलाव असा नष्ट होण्याच्या मार्गावर असता का?असा प्रश्न पर्यावरणप्रेमी करतात…..!
नागपूरकरांना त्यांच्याकडे असणा-या वैभवाची किंमतच नाही तर पर्यावरणप्रेमी तरी किती आणि कुणाकुणाशी लढा देणार?असा आर्त प्रश्न पर्यावरणप्रेमींचा आहे…….!
नागपूरकांनी एकदा तरी फूटाळाला जावे आणि डी.पी.जैन कंट्रक्शनचे डोळे दिपवून टाकणा-या बांधकामाच्या प्रगतीचे वैभव डोळ्याने टिपावे,अशी अपेक्ष्ा करीत हे काही वेडे पर्यावरणप्रेमी आसवे भरलेल्या डोळ्यांनी ‘फूटाळा‘नावाच्या या तलावाच्या पार्थिवावर अश्रू ढाळीत परतीची वाट धरतात……!

आमचे चॅनल subscribe करा