

निवडणूकीसाठी प्राप्त २५ लाखांचा धनादेश परत!
बँकेचे व्यवहार सुरु: मंडळाच्या लेखी बँक शाखा ब्लॉक!
मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र: बँक मॅनेजरवर फौजदारी गुन्हा करणार दाखल
नागपूर,ता. १ जुलै:वर्धा रोड मार्गावरील साईमंदिराच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला विद्यमान संचालक मंडळाकडून खीळ घातली जात असून निवडणूक झालीच तर भाजप प्रणीत पॅनल तयार करुन मंदिर पुन्हा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा धक्कादायक आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत केला.विद्यमान संचालकांवर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली.
निवडणूक प्रक्रियेसाठी साई संस्थानकडून धर्मादाय आयुक्तांना २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.तो यूको बँकेने धर्मादाय आयुक्तांना परत केल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साईबाबा सेवा मंडळ या संस्थेच्या धनादेशावर अध्यक्ष् ओमप्रकाश यादव व उपाध्यक्ष् अविनाश शेगावकर यांच्या स्वाक्ष् री आहेत.धनादेश परत करण्याचे कारण ‘बँक-ब्रांच ब्लॉक्ड’ असे देण्यात आले आहे.असे असताना याच बँकेतून याच खात्यातून ७ जून २०२१ रोजी पगाराचा धनादेश वठला.९ जून २०२१ रोजी फूलवाल्यांची रक्कम देण्यात आली तर २ जून २०२१ रोजी भविष्य निर्वाह निधीचे पैसे देण्यात आले.याच खात्यात ३१ लाख रुपये हे शिल्लक दाखवल्या गेले.
याचा अर्थ बँक,बँकेची शाखा, खाते सर्व सुरु असताना फक्त साई सेवा मंडळाच्या लेखी ते ब्लॉक होते का?असा प्रश्न प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.याशिवाय कोणत्याही धनादेशावर व्हॅल्यू लिहली जाते ती देखील या धनादेशवार लिहल्या गेली नाही.याचा अर्थ हेतूपुरस्सर निवडणूक प्रक्रिया थांबली पाहिजे व परत जुने संचालक मंडळ चालू ठेवले पाहीजे,हा भाजपचा डाव असल्याचा आरोप पवार यांनी केला.
हा संपूर्ण पैसा साई-भक्तांचा आहे,यात घोटाळा झाला तर जवाबदार कोण?धर्मादाय आयुक्तांनी प्रशासक नेमलाच नाही.मग या संपूर्ण घोटाळ्यात धर्मादाय आयुक्त हे देखील सहभागी आहेत का?असा सवाल पवार यांनी केला.सह धर्मादाय आयुक्तांचे डोळे देखील बंद आहेत याचा अर्थ त्यांना ही रसद मिळते का?एकीकडे बँक ब्रांच ब्लॉक दाखवायचे दूसरीकडे त्याच बँकेतून त्याच खात्यातून सर्व आर्थिक व्यवहार करायचे,हे कोणत्या नियमात बसतं?
कायद्याप्रमाणे कोणतीही बँक ही मर्ज झाली तर जुन्या बँकांचे चेकबूक रद्द करुन नवीन बँकेचे चेकबूक इश्यू होतात. मात्र येथे तर ‘बँक ब्रांच ब्लॉक’ असे कारण सांगून त्याच बँकेचे धनादेश वठवले जात आहेत,त्यामुळे हा संपूर्ण कारभारच संशयास्पद असून याकडे डोळेझाक करणा-या सह धर्मादाय आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे,अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली त्याच वेळी धर्मादाय आयुक्तांनी संचालक मंडळ बर्खास्त करायला हवे होते मात्र ते त्यांनी केले नाही.यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री व गृहमंत्री यांना या संपूर्ण व्यवहाराच्या चौकशीबाबत पत्र देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
मूळात जानेवारी महिन्यातच संपूर्ण वर्षाचा टॅन्यूअर संपला असताना आज ७ महिने उलटून गेले मात्र संचालक मंडळ बर्खास्त करुन प्रशासक नेमून कार्यभार घेण्यात आला नाही.आता निवडणूक मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली आहे.मतदार यादीवर आक्ष्े प मागवण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे.
भाजप पक्ष्ाने धर्मादाय आयुक्तांना हाताशी धरुन हा संपूर्ण घोळ केला असल्याचा आरोप करीत यात यूकाे बँक ही देखील बरोबरीने दोषी आहे. विवेकानंद नगर येथील यूको बँकेच्या मॅनेजरवर देखील फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे,असे ते म्हणाले.त्यांनी धनादेश का जमा केला नाही?असा सवाल त्यांनी केला.बँक ब्रांच ब्लॉक असताना त्यांनी धनादेश इश्यू कसा केला?
‘जय जवान जय किसान संघटनेने’निवडणूक अधिकारी यांच्याकडे या संपूर्ण घोटाळ्याची तक्रार केली असून लवकरच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल,असे ते म्हणाले.
पत्र परिषदेला रवींद्र इटकेलवार,मिलिंद महादेवकर,दिनेश तिरमारे,संजय गुप्ता, रामनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा