Homeनागपूर न्यूजव्हेरायटी चौकात हजारोंचे आंदोलन!होणा-या मृत्यूंची जवाबदारी भाजप घेणार का?

व्हेरायटी चौकात हजारोंचे आंदोलन!होणा-या मृत्यूंची जवाबदारी भाजप घेणार का?

Advertisements

महाराष्ट्राचा ‘मृत्यराष्ट्र‘ करणार का?समाज माध्यमात उमटली तीव्र प्रतिक्रिया

‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या इशाराही वा-यावर!

ओबीसी,सवर्ण,मराठा ‘जात’ करोनाला कळते का?सत्तेसाठी जनतेचा जीव वेठीस

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २६ जून: देशात शुक्रवार अखेर म्हणजे काल दि. २५ जून रोजी ‘डेल्टा प्लस’या प्रकाराने बाधित असलेल्यांची संख्या ४८ वर पोहोचली त्यातील सर्वाधिक म्हणजे २० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत,अशी माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली.सध्या देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ९० टक्के रुग्ण करोनाच्या ‘डेल्टा’प्रकाराच्या(बी.१.६१७.२)विषाणूने बाधित आहेत.हा विषाणू ‘चिंताजनक’वर्गवारीतील असून,३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १७४ जिल्ह्यांमध्ये त्याचा फैलाव असून देशात १० मे पर्यंत डेल्टा विषाणूच्या संसर्गाचे एकूण सक्रिय रुग्णसंख्येशी प्रमाण १०.३१ टक्के होते,ते २० जूनपर्यंत ५१ टक्क्यांपर्यंत वाढले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली.का वाढले प्रमाण?आज नागपूरात म्हणजे महाराष्ट्राच्या उपराजधानीत भारतीय जनता पक्ष्ातर्फे ओबीसींच्या आरक्ष् णाच्या प्रश्‍नावर जे ‘अभूतपूर्व’शक्तीप्रदर्शन करण्यात आले त्यात आणि यासारख्या अनेक ‘ राजकीय इव्हेंट्स’मध्ये याचे मूळ कारण दडले आहे.

भाजपने आज ‘जेलभरो आंदोलन’ देखील ‘उरकला!’स्वत: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे पोलिसांच्या गाडीत चढले व त्यांच्या मागोमाग इतर नेत्यांनी स्वत:ला पोलिसांच्या गाडीत रपेट मारुन येण्यासाठी ‘कोंबले’ते देखील ‘अभूतपूर्व’असेच होते.आजच्या आंदोलनाचा मुद्दा हा अतिशय ‘संवेदनशील’जरी असला तरी ज्याप्रमाणे भाजपने ओबीसींच्या न्याय हक्काच्या नावाखाली ‘बिन पैशांचा तमाशा’केला तो नक्कीच करोनाचा नवा अवतार व अतिशय गतीने संक्रमण करणा-या ‘डेल्टा प्लस’ला आमंत्रित करणाराच ठरला.आरक्ष् णाची मागणी योग्य असली तरी वेळ चुकलेली होती.राजकारण आणि सत्तेपेक्ष्ा आज जास्त गरज होती ती कराेनाच्या तिस-या लाटेपासून नागपूरकरांचे संरक्ष् ण करण्याची,न की त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याची!

‘करोनाची तिसरी लाट धडकणारच’ हा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी ६ मे २०२१ रोजीच दिला होता.महराष्ट्रसह देशातील ५ राज्यांमध्ये मृत्यूदर ही अद्याप सर्वाधिक असल्याची चिंता केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी ही व्यक्त केली होती.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारीक जासेरेविक यांनी भारतात करोनामुळे सुरु असणारे मृत्यूचे थैमान बघून ‘गर्दीमुळेच भारतात कराेना वाढला’असल्याचा निर्वाळा दिला होता.यातूनही केंद्रीय सत्ताधारी असणा-या व करोनाकाळात भारतावर राज्य करणा-या राजकीय पक्ष्ाने काहीच बोध घेतला नसल्याचेच आजचे हे आंदोलन द्योतक नाही का?गर्दी,नव्या रुपातील विषाणू व लसीकरणाचा अल्प वेग यामुळे कोणत्याही देशात संसर्गाचे वादळ येणार हे उघड असल्याचेही तारीक जासरेवीक यांनी सांगितले होते.

तारीक जासरेवीक यांचे जाऊ द्या पण राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंचालक मोहन भागवत हे स्वत: एप्रिल महिन्यात करोनामुळे मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर पडण्याचा अनुभवातून ‘बेफिकिरीमुळेच दूसरी लाट‘असे सांगत नागरिकांनी सकारात्मक राहूनच या संकटाचा सामना करण्याचा सल्ला १५ मे रोजी संघाच्या दिल्ली शाखेतर्फे आयोजित‘ हम जितेंगे:पॉझिटीव्ह अनलिमिटेड’या ऑनलाईन कार्यक्रमात दिला होता.जनता बेफिकिर झाली होती त्यामुळे कराेचाही दूसरी लाट एवढ्या तीव्रतेने धडकली असे सांगत पहील्या लाटेनंतर शासन,प्रशासन आणि जनता सगळेच बेपर्वाईने वागल्याचे त्यांनी सांगितले.आज त्यांच्याच बालेकिल्ल्यातील शहरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी एखाद्या राजकीय मुद्दाला घेऊन करोनासारख्या महाभयंकर संकटाच्या महामारीच्या काळात शेकडोंची गर्दी एखादा राजकीय पक्ष् जमवतो…….यासाठी आता ते कोणते शब्द वापरतील?

करोना हे मानवतेसमाेरील संकट आहे. आपल्याला या संकटाचा सामना करुन जगासमोर उदाहरण निर्माण करायचे आहे,एकमेकांचे गुणदोष काढण्यापेक्ष्ा एक टीम म्हणून करोनाविरुद्ध काम केले पाहीजे,असा अतिशय मोलाचा सल्ला ही भागवतांनी दिला होता,भाजप मात्र हा सल्ला देखील आज विसरली व महाविकासआघाडी सरकारमुळेच ओबीसींचे आरक्ष् ण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून संपुष्टात आले असा आरोप करीत,शेकडो लोकांची गर्दी जमवून सर्वांचाच जीव अक्ष् र: धोक्यात टाकला,याला काय म्हणावे?

नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिस-या लाटेत संसर्गितांची संख्या महाराष्ट्रात ५० लाख पर्यंत जाईल त्यात २० लाख हे लहान मुले असू शकतील,असा धोक्याचा इशारा दिला.खरंच असे दूर्देव महाराष्ट्रावर कोसळले तर याला जवाबदार कोण असणार?तिस-या लाटेतही दुस-या लाटेप्रमाणेच मृत्यूंची संख्या राहील तर राजकीय पक्ष् आपापली जवाबादारी त्यात उचलतील का?सामाजिक प्रश्‍नासाठी आरोग्याचा प्रश्‍न वेठीस धरला जात आहे,जो सर्वसामान्य नागरिकांच्या,आपल्याच पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूस देखील कारणीभूत ठरु शकतो,याचे भान ही या राजकीय पक्ष्ांना असू नये?

काय करतोय मनपाचा उपद्रव शोध पथक आता?स्वत:महापौर हे सर्रास करोनासंबंधीचे नियम अश्‍या राजकीय आंदोलनात धुडकवातना दिसतात तेव्हा कोणत्या तोंडाने ते नागरिकांना करोनाचे नियम पाळा म्हणून सूचना देणार आहेत?ऐरवीतेरवी लहान लहान नियम मोडले तरी लाखोंचा दंड मनपाच्या उपद्रव शोध पथकांद्वारे दूकाने,मॉल्स,मंगल कार्यालयांकडून वसूल केला जातो,मग आज ऐन वर्दळीच्या ठिकाणी स्वत:महापौर हे असंख्य गर्दी जमवून होते,अजूनही राज्यात जमावबंदी लागू आहे,आता काय करतील मनपाच्या या समस्त सत्ताधा-यावर आयुक्त राधाकृष्णन बी कारवाई?

पोलिस घेतील का दखल सर्वत्र व्हायरल झालेल्या आजच्या या आंदोलनाच्या व्हीडीयोंची ?फक्त राजकारण करायचं सत्ता द्या,चार महिन्यात आरक्ष् ण देऊ,सत्तेसाठी जीव गेलेत तरी बेहत्तर,असा अर्थ जर नसेल तर कशाला रचला मृत्यूच सापळा?काेरोनामुळे अनेक कुटुंब उधवस्त झाले सध्या स्वत:ला सांभाळा,असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवतांनी दिला असताना सध्या नागपूरकर जनतेचे आरोग्याचे प्रश्‍न तातडीने सोडवणे हे गरजेचे आहे की आरक्ष् ण?माणूस जिवंत राहीला तरच आरक्ष् णाचा लाभ घेऊ शकेल ना?

राज्यातील बहूतांश जिल्ह्यातील बंधने आता शिथिल करण्यात आली आहेत त्यामुळे सार्वजनिक स्थळी गर्दी वाढू लागली आहे,ही गर्दी बघता पुढील दोन ते चार आठवड्यात काेरोनाची तिसरी लाट येऊ शकते,असा धोक्याचा इशारा महाराष्ट्र टास्क फोर्सने नुकताच १७ जून रोजी दिला आहे.टास्क फोर्सच्या अंदाजानुसार तिस-या लाटेदरम्यान बाधितांची संख्या ही दुस-या लाटेतील संख्येच्या दुप्पट होऊ शकते,बुधवारी राज्यात १ लाख ४ हजार सक्रिय बाधितांची नोंद करण्यात आली होती.हा आकडा ८ लाखांपर्यंत जाऊ शकतो असे सांगून तिस-या लाटेतील १० टक्के बाधित हे ० ते १८ वर्षे वयोगटातील मुले असू शकतात,असा धोक्याचा इशारा असतानाही अशी तूफान गर्दी एखाद्या राजकीय पक्ष्ाला जमवणे कोणत्या तत्वात बसत होती?

युकेमध्ये दुस-या लाटेच्या चार आठवड्यानंतरच तिसरी लाट येऊन धडकली,ही स्थिती आपलीही होऊ शकते असा इशारा देत कराेनाशी निगडीत आवश्‍यक ती सर्व काळजी घेण्याची सूचना देेखील टास्क फोर्सने दिली.जगभरातील साथरोग तज्ज्ञांनुसार सहसा दोन लाटांच्या पीकमध्ये १०० दिवसांचे अंतर राहणे अपेक्ष्ि त असते,असे असताना भाजपसारख्या राजकीय पक्ष्ांना ‘आपली राजकारणाची पोळी शेकायला’१०० दिवसांचा देखील धीर धरवत नाही का?पहिल्या लाटेत राज्यात १९ लाख तर दुस-या लाटेत ४० लाख बाधितांची नोंद झाली,हीच संख्या तिस-या लाटेत दुस-या लाटेच्या दुप्पट असणार असल्याचा इशारा देत तिसरी लाट निम्न मध्यवर्गीयांसाठी जास्त धोकादायक असल्याचे देखील सांगण्यात आले.

पहील्या दोन लाटेत हा वर्ग प्रादुर्भावापासून दूर राहिला त्यामुळे त्यांच्यातील ॲन्टीबॉडिजचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे टास्क फाेर्सने चेतावनी दिली असता मग या निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या जिविताच्या सुरक्ष्े ची काळजी कोण वाहणार?जातीच्या नावावर आंदोलने करुन त्यांचा जीव वाचणार आहे का?

करोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना जास्त प्रमाणात संसर्गाची शक्यता वर्तवत टास्क फोर्सने प्रौढ रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये रेमडिसिवीर तसेच इतर ज्या औषधांचा वापर केला तो करता येणार नाही तसेच प्रतिजैविकांचाही सर्रास वापरही मुलांमध्ये करता येणार नाही,अश्‍या सूचना टास्क फोर्समधील निष्णात बालरोगतज्ज्ञांनी १८ मे रोजीच दिली असताना हे राजकीय पक्ष् मुलांचे जीव वाचवण्यासाठी कोणते युद्ध पातळीवरील उपाय करीत आहेत?

हवेतून पसरणा-या विषाणूंमुळे महामारीच्या काळात संसर्गाच्या लाटा येत असतात,हा विषाणू ‘संक्रमित लोकसंख्या’ वाढली की या लाटा वाढतात,विषाणूंमधील बदलांमुळेही संसर्गाची लाट येत असते तसेच कधी ‘मानवी वर्तन’ त्यास कारणीभूत ठरतात,अशी स्पष्टोक्ती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे(एम्स)चे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी ८ जून २०२१ रोजी दिली होती तर अमेरिकेचे ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष् ज्यो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ.अँथनी फाउची यांनी देशव्यापी लॉकडाऊन करण्याची सूचना, ही दुस-या लाटेचा कहर भारतात सुरु असतानाच ४ मे २०२१ रोजी केली होती.अन्य देशांनी भारतात केवळ वैद्यकीय सामग्रीच नव्हे तर वैद्यकीय आरोग्यकर्मीही पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.काय केले दोन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा राजकीय पक्ष्ांनी वैद्यकीय सामग्रींची जुळवाजुळव करण्यासाठी?

ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे कुणालाही जीव गमवावा लागू नये यासाठी नागपूर जिल्ह्यात २५ ऑक्सीजन प्लान्ट उभारण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र,या घोषनेला १० दिवसांचाही कालावधी लोटत नाही तर तोच प्लान्टची संख्या २५ वरुन १३ करण्यात आली,मग कसा करणार आहे प्रशासन तिस-या लाटेचा सामना?हीच का त्यांची तयारी?प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी राजकीय पक्ष्ांना का नाही वेळ?अश्‍या प्रश्‍नांसाठी का ‘अरण्यरुदन’होत नाही त्यांच्याकडून?बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच २५ मे रोजी केली होती.हे सुसज्ज रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती अश्‍या रेशीम बागजवळच्या जागेत व साेयीच्या ठिकाणी असावे असा पर्याय मनपा आयुक्तांनी सूचवला होता,उभारले गेले का हे रुग्णालय?किती काळ लागेल?दहन घाटांवर मृतकांची संख्या वाढवल्यावर?अश्‍या उपाययोजनांसाठी का नाही फडणवीस आग्रही?यातून सत्ता मिळवता येत नाही म्हणून?

बालरोग अतिदक्ष् ता विभागात लहान मुलांसाठी व्हेंटिलेर्टससह सर्व आवश्‍यक उपकरणे तयार ठेवण्याची सूचना टास्क फोर्सने केली होती.मेडीकल व मेयोमध्ये लहान बालकांसाठी २०० तर एम्समध्ये १०० खाटा तयार ठेवण्याचा सूचना होत्या.याशिवाय इतर विशवस्त व मनपाच्या रुग्णालयातही उपचारोपयोगी जागा राखीव ठेवण्याचा सूचना करण्यात आल्या होत्या.

शांत बसू नका,तिस-या लाटेची तयारी करा’असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १२ मे २०२१ रोजीच दिला होता. प्रशासनाने ठिकठिकाणी बालरोग उपचार विभाग,जम्बो आणि अस्थायी इस्पितळांची निर्मिती करावी,त्यासाठी गरज भासल्यास कस्तूरचंद पार्क,मानकापूर स्टेडियमसारख्या ठिकाणांचा वापर करावा असे निर्देश न्या.सुनील शुक्रे आणि न्या.अविनाश घरोटे यांनी दिले होते.न्यायालयाने प्रशासनाला सर्तक राहण्याची सूचना केली होती,केवळ नागपूर शहरच नव्हे तर जिल्हा,तहसील व ग्रामपंचायतस्तरावर सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

हीच आहे का प्रशासनाची सर्तकता?आंदोलनाच्या नावाखाली शेकडोंची गर्दी डोळ्यादेखत जमली असताना कोणतीही कारवाई न करता गप्प बसणे?हेच आहेत का न्यायालयाच्या निर्देशांचे पालन?तिसरी लाट अधिक भयावह असण्याची शक्यता वर्तवून न्यायालयाने यात २ ते १८ व १८ ते ४५ वयोगटातील तरुणाई बाधित होण्याची शक्यता लक्ष्ात घेऊन एवढा मोलाचा सल्ला दिला होता.कोण करतंय त्यांचे पालन?कोणी घेतलंय गांर्भीयाने?करोना संसर्ग महत्वाचा नसून आरक्ष् णाचा प्रश्‍न हा जास्त महत्वाचा भाजपसाठी असल्याची टिका मग समाजमाध्यमांवर उमटली तर यात वावगे काय?

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका,असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मे रोजी केले होते.मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे देखील लक्ष् देण्याची सूचना बाल रोगतज्ज्ञांच्या कृतीदलाच्या बैठकीत झाली,संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात(पीएचसी)मध्ये १० खाटांचे चाइल्ड कोविड केअर सेंटर(सीसीसी)पुरेसे ठरणार आहेत का?

सीसीसीमध्ये केवळ सौम्य व मध्यम लक्ष् णे असलेल्याच लहान मुलांना भरती करण्यात येऊ शकेल,तीव्र व गंभीर स्वरुपाच्या मुलांवरील उपचारासाठी शहरातच धाव घ्यावी लागेल,यासाठी आरोग्य यंत्रणा,पुरेसे मनुष्यबळ,यंत्रसामुग्री,औषध पुरवठा यात स्वयंपूर्ण होण्याचे हे दिवस आहेत की आंदोलनाचे?असा प्रश्‍न भाजप व इतर ‘आंदोलनजीवी’राजकीय पक्ष्ांना समाज माध्यमांवर विचारला जात आहे,आहे का काही उत्तर?

करोनानंतर पहील्या व दुस-या लाटेत ती लहान मुले संसर्गित झाली त्यांच्यात पोस्ट कोविडनंतर मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आजार होत असल्याचे पुढे आले.मेडीकलमध्ये तर ६ महिन्यांच्या एका बालकाला हा आजार आढळून आला!अश्‍या ३० हून अधिक मुलांवर उपचार करण्यात आले.त्यातील एक ८ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला.परंतु त्याल ब्रेन ट्यूमर होता.प्रथमच या आजाराच्या तीन मुलांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत हे रुग्ण वाढले होते,मग तिस-या लाटेत काय होणार?करोना उपचारदरम्यान स्ट्रिराईडचा अतिवापर झालेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढला.नागपूरात २३ जून पर्यंत १४३ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला होता!जिल्ह्यात १६० जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे.काय आहे राजकीय पक्ष्ांकडे या रोगांवर मात करण्यासाठी आतातरी प्रभावी उपाययोजना?

विदर्भात मनुष्यबळांच्या रिक्त पदांची संख्या ही सर्वाधिक आहे,का नाही होत आंदोलने तिस-या लाटेपूर्वी या अति महत्वाच्या प्रश्‍नावर?

साेमवारपासून शहरात पुन्हा करोनासंबधींचे र्निबंध कठोर करण्यात आले आहे.प्रश्‍न आहे तो जे निर्बंध घालतात तेच प्रशासन हे ‘कागदोपत्री’ कठोर र्निबंधांचे पालन करवून घेते का?आजच्या आंदोलनावरुन तर हेच सिद्ध हाेतं,हे र्निबंध ‘आंदोलनजीवींसाठी’नाहीच,ते फक्त सर्वसामान्यांसाठीच असतात,यामुळेच समाज माध्यमांवर आज प्रशासन व भाजप हा नेटीझन्सच्या टिकेच्या चांगलाच धनी झाला.

Latest बातम्या