Homeनागपूर न्यूजओबीसी आरक्ष् ण न टिकवण्याचे पाप आघाडी सरकारचे:आशिष शेलार

ओबीसी आरक्ष् ण न टिकवण्याचे पाप आघाडी सरकारचे:आशिष शेलार

Advertisements

याचिकाकर्ते विकास गवळी,रमेश डांगरे कोण आहेत?

संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत पंधरा महिने आघाडी सरकार झोपले होते का?

नागपूर,ता. १८ जून: महाविकासआघाडी सरकारमधील विजय वडेट्टीवार,नाना पटोले व छगन भुजबळ हे तिन्ही कद्दावर नेते जे स्वत:ला ओबीसींचे नेते म्हणून समाजात मिरवतात,मात्र तिन्ही पक्ष्ाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वेगळे तर बाहेर काही वेगळे रंग दाखवतात,मागच्या फडणवीस सरकारने जो अध्यादेश काढून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्ष् ण लागू केलं होतं ते आरक्ष् ण न टिकवण्याचे पाप या नेत्यांनी व आघाडी सरकारने केले असल्याची खरमरीत टिका भाजपचे माजी मंत्री आशीष शेलार यांनी केली.ते आज शुक्रवार दि. १८ मे रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.

शेलार हे सध्या पक्ष्ाच्या संघटनात्मक दौ-यावर असून भंडारा,वर्धा जिल्ह्यातील दौ-यानंतर ते आज नागपूरात उपस्याथित होते. पत्र परिषदेत आमदार व शहर अध्यक्ष प्रवीण दटके,आ.कृषणा खोपड़े, आ.गिरीश व्यास,आ.विकास कुंभारे,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,माजी महापौर अर्चना डेहनकर,चंदन गोस्वामी, सुनील मित्रा आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना आशीष शेलार म्हणाले,की पटोले,भूजबळ व वडेट्टीवार यांची स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींच्या आरक्ष् णाबाबत ‘हेराफेरी’वफिर हेराफेरी’सुरु आहे.

ओबीसींच्या आरक्ष् णाबाबत सुरवातीलाच याचिकबाबत काँग्रेसने ‘हेराफेरी’केली यानंतर महाविकास आघाडीने ‘फिर हेराफेरी’केली.यातील बाबू भैया,राजू व शाम काैन याचे उत्तर त्यांनीच स्पष्ट करावे.मूळात या आरक्ष् णाला घेऊन ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली ते विकास गवळी व रमेश डांगरे काेण आहेत?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्ष् णाबाबत ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली ते विकास गवळी वाशिमच्या काँग्रेसच्या माजी आमदाराचे सुपुत्र आहे तर रमेश डांगरे हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील माजी अध्यक्ष् असल्याचा खुलासा त्यांनी केला.यातील आणखी एक याचिकाकर्ता हे देखील नाना पटोले यांच्या जवळचे असल्याचे सांगून, स्वत:च याचिका दाखल करायला लावायची मग केंद्राकडे बोट दाखवायचे,हीच ‘हेराफेरी’ यात असल्याची टिका शेलार यांनी केली.

फडणवीस यांनी काढलेला अध्यादेश व्यपगत कसा झाला?या तिघांनी या प्रश्‍नाचं उत्तर द्यावं.या प्रसंगी काही प्रश्‍ने उपस्थित करत ओबीसींचा इंपरिकल डाटा न्यायालयाने १५ महिन्यांपूर्वीच मागितला असता तो डाटा गोळा करण्यासाठी आघाडी सरकाने काय केले?किवा कोणती व्यवस्था निर्माण केली?

आता आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली,हा आयोग स्थापन करण्यासाठी १४ ते १५ महिन्यांचा वेळ का लागला?१५ महिने या याचिकेवर सुनावणी सुरु होती १५ महिने ८ वेळा कोणतीही ठोस बहस न करता वेळ का मागत राहीले?माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:अधिवेशनात वारंवार ओबीसींच्या आरक्ष् णाबाबत बजावलं,ही कार्यपद्धती अंमलात अाणा म्हणून पत्र ही लिहले मात्र त्या पत्रालाही आघाडी सरकारने केराची टोपली का दाखवली?

विकास गवळी व रमेश डांगरे यांचा कोणाशी संबंध आहे?स्पष्ट करा अन्यथा त्यांच्यासोबतच्या बैठकींचे पुरावे आम्ही देऊ,असा इशारा त्यांनी दिला.जे याचिकाकर्ते ओबीसी आरक्ष् णासाठी न्यायालयात लढत आहेत त्यांना पक्ष्ात मानाचे स्थान का दिले जात नाही?याचं उत्तर द्यावं.

केंद्रानी जनगणना केली नाही अशी आवई आघाडी सरकार उठवते मात्र राज्याने केलेल्या ओबीसींच्या जनगणनेच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्ष् ण टिकणार होतं,जे गुजरात व कर्नाटकसारख्या राज्याल जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवारांनी इंपरिकल डाटा केंद्र देत नसल्याचा आरोप केला आहे याबाबत प्रश्‍न विचारला असता हा डाटा केंद्राने देण्याचा विषय आहे का?असा सवाल शेलार यांनी केला व हा डेटा देण्याचे राज्य मागार्सवर्गीय आयोगाचे काम असल्याचे सांगितले.राज्याच्या डेटालाही इंपेरिकल डाटाच म्हणतात ना? वडेट्टीवार हे असत्य पसरविण्याचे काम करीत असल्याची टिका शेलार यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी सरकार हे चार वॉर्ड मिळून एक प्रभागाची रचना बदलून आता एक सदस्यीय प्रभाग करणार आहे का?यावर बोलताना आघाडी सरकार स्वत:निवडून येण्यासाठी जे-जे काही करावे लागेल तेच करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका करीत महाआघाडीचे धूरीण वॉर्ड,प्रभाग काहीही करतील तरी जे ‘पंढरपूर’मध्ये झाले तेच मनपा निवडणूकांमध्ये घडणार असल्याचे ते म्हणाले.

दोन पक्ष्ांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आघाडी होणार असल्याचे नुकतेच नाना पटोले म्हणाले,त्यांच्या या विधानाकडे शेलार यांचे लक्ष् वेधले असता आघाडीत तीन पक्ष् असताना दोन पक्ष् आघाडी करतील व एका पक्ष्ाला लाथ घालतील याचा अर्थ आघाडीतील तीन पक्ष् च एकत्रित नाही हेच चित्र ते राज्याच्या जनतेसमोर मांडत असतील तर जनतेचा रोष ही दिसले व याचा तोटा त्यांनाच होणार आहे,असे ते म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांचेच विधान आहे शिवसेना ही ‘सर्टिफाईड गूंडांचा पक्ष् ’आहे,त्यांच्या या विधानाकडे शेलार यांचे लक्ष् वेधले असता असे बोलून ते स्वत: आभूषण चढवून घेत आहेत,शिवसेना प्रमुखांनी याबाबत बोललं पाहिजे खरं काय ते, शिवसेनेच्या गुंडगर्दी चा बिमोड भारतीय जनता पक्ष्ानेच केला असून दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्यापासून त्याची सुरवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना भवनासमोर भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो अभूतपूर्व असा राडा झाला व जो अवघ्या महाराष्ट्राना पाहीला,या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांची पाठ थोपटली,मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबाबत विचारले असता,मुख्यमंत्र्यांनी अश्‍या कृतीपासून स्वत:ला अलिप्त ठेवलं पाहीजे,असे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.उलट हे आम्ही आमचं यश मानतो की गेल्या दीड वर्षांपासून ज्या शिवसेना भवनात सामान्य शिवसैनिकांना प्रवेश मिळत नव्हता तो या निमित्ताने मिळाला.आतापर्यंत सचिन वाझे व त्यांच्यासारख्यांनाच शिवसेना भवना प्रवेश मिळत असल्याची खरमरीत टिका त्यांनी केली.

विधान सभेच्या अध्यक्ष्ांची निवडणूक या प्रश्‍नासंबधी बोलताना याबाबतीत आघाडी का होत नाही?त्यांना विश्‍वास वाटत नाही की जिंकण्याची शाश्‍वती नाही?ते संभ्रमावस्थेत असून आम्ही मात्र दोन हात करायला तयार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

बीडमधील आरोग्य कर्मचा-यांवर लाठीमारचा निषेध-
याप्रसंगी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौ-याप्रसंगी कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांवर जो लाठीमार झाला त्याचा मी तीव्र निषेध करीत असल्याचे शेलार म्हणाले.या आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्या अगदी रास्त होत्या ज्या सहज मान्य करण्यासारख्या होत्या.भत्ते,पगार,सुविधा मागत असतानाच अनेक जिल्ह्यात अद्याप कोविडची परिस्थिती सुधारली नसताना अनेक आरोग्य कर्मचा-यांना नारळ देण्यात आला अर्थात घरी बसवण्यात आले,या विरोधात आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाठीमार करणे अत्यंत निषेधार्ह्या बाब असल्याचे शेलार म्हणाले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रॅश कोर्स जाहीर करुन एक लाख लोकांना आरोग्य सेवक ,आरोग्य मदतनीस म्हणून कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला,सगळ्या गोष्टींसाठी केंद्राकडे बोट दाखवणा-या आघाडी सरकारने मग हा आदर्श का घेतला नाही?असा सवाल त्यांनी केला.

या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी,बैठक बोलवावी,आरोग्य कर्मचा-यांच्या सेवेचा उपयोग घेण्याची मागणी त्यांनी केली.

Latest बातम्या