

नागपूर,ता. १२ जून:काेविड नियमांचा भंग केला म्हणून माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासह खामगाव व शेगावमधील काँग्रेस पदाधिका-यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्राच्या उपराजधानीत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष् दुनेश्वर पेठे यांनी देखील आज शनिवार दि.११ जून रोजी आपल्या पहील्याच पत्र परिषदेदरम्यान आपले शक्तीप्रदर्शन घडवून आणले.सायंकाळी ५ वा.पार पडलेल्या पत्र परिषदेला त्यांचे ७० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित असल्याने कोविड नियमांचा पार फज्जा उडाला एवढंच नव्हे तर वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांचा देखील जीव धोक्यात आला!
अमरावती विभागाच्या दौ-यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले बुधवारी बुलडाणा जिल्ह्यात आले.या दौ-यावर असताना मेहकर,चिखली,बुलडाणा,खामगाव व शेगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेली लावली.या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते जमल्याने गर्दी वाढली व संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाले.सामान्यांना नियम,मग यांच्यासाठी वेगळ्या नियमांची काही तरतूद आहे का?असा सवाल करीत आमदार आकाश फूंडकर यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.गेल्या आठवड्यात भाजपकडून ओबीसी आरक्ष् णासंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधी आंदोलन करण्यात आले होते,यात करोनासंबधी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहे.
सध्या राज्यातच नव्हे तर देशात साथरोग कायदा लागू आहे.राज्य सरकारने देखील अद्याप अनेक निर्बंध घातले आहे.५ वा.नंतर जमावबंदी नागपूरात लागू आहे. ५ पेक्ष्ा अधिक लोकं एकसाथ,एका ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही,मात्र राष्ट्रवादी पक्ष् स्वत:सत्तेत असताना त्याच पक्ष्ाचे शहराध्यक्ष् हे सर्रास नियमांचे उल्लंघन करताना आढळतात.
प्रेस क्लब येथे आपल्या पहील्याच पत्र परिषदेत कोविडसंबंधी सर्व नियम धाब्यावर बसवून दुनेश्वर पेठे यांनी शक्ती प्रदर्शन केले मात्र त्यांच्या या धाडसामुळे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांच्या जिवितालाच धोका निर्माण झाला.हे सभागृह पेठे यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने अक्ष् रश:भरुन गेले होते.भरगच्च गर्दीत एक जरी करोना बाधित असल्यास आज अनेकांना संसर्गाची शक्यता बळावली आहे.
पेठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीचे हसून समर्थन करताना ‘सॉरी’आज गर्दी झाली व करोना नियमाचे पालन होऊ शकले नाही,असे हसत सांगितले मात्र कराेना विषाणूला पेठे यांचा ‘सॉरी‘कळतो का?गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहूना करोनाच्या पहील्या लाटेत देखील अनेक पत्रकार हे करोनाने संसर्गित झाले आहेत.
पत्रकारांच्या कामाचा भाग म्हणून वार्तांकन करण्याचे कर्तव्य बजावतानाच शहरातील अनेक पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे.एवढंच नव्हे तर हा संसर्ग त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांपर्यंत,पत्नी,मुले,वृद्ध आई-वडील यांच्यापर्यंत पोहोचला.अनेक संकटातून मार्ग काढत पत्रकार वर्ग जोखिमेचे कर्तव्य बजावत आहेत तरी देखील फक्त आपला बडेजाव मिरवण्याकरीता दुनेश्वर पेठे सारखे राजकारणी हे शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी पत्र परिषदेत मिरवित असतील तर ती अतिशय निशेधार्ह्य बाब ठरत नाही का?
पेठे यांच्या मंचावर देखील पाय ठेवायला जागा नव्हती.२० च्या वर मान्यवर दाटीवाटीने मंचावर बसवण्यात आली होती!अापले म्हणले ५ पदाधिकारी व ५ कार्यकर्त्यांना घेऊन देखील पेठे हे मांडू शकले नसते का?
नुकतेच राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सरचिटणीस आभा पांडे यांनी व तत्पूर्वी माजी शहराध्यक्ष् अनिल अहिरकर यांनी याच प्रेस क्लबमध्ये पत्र परिषदे घेतली मात्र त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा एवढा जमावडा नव्हता किवा पत्रकारांच्या जिविताला असा धोका देखील निर्माण झाला नव्हता.
पेठे हे विसरलेत ते सध्या सत्ताधारी पक्ष्ातील नेते आहेत.शहरात संचारबंदी लागू आहे.साथरोग कायदा लागू आहे.अद्याप करोनाचा धोका टळला नाही.मार्च,एप्रिल व मे महिन्यात करोनामुळे याच शहरात हजारोंचा बळी गेला आहे.या शहराने कराेनामुळे एवढी भीषण त्रासदी बघितली आहे की दहन घाटांवर मृतदेहांना देखील अग्निसंस्कारासाठी ‘न भूतो ना भविष्यती’अशी प्रदीर्घ प्रतिक्ष्ा करावी लागली!
जगभरातील तज्ज्ञांनी भारतात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.अश्यावेळी पेठे सारखी मंडळी ही फक्त आपला बडेजाव मिरवण्यासाठी शेकडो लोकांचा प्राण धोक्यात कशी घालू शकते?
आज शेकडो कार्यकर्ते हे शहराच्या विविध भागातून आले होते,त्यातील अनेक कार्यकर्ते हे कराेनाचा प्रादुर्भाव अद्याप अोसरल्या नसलेल्या भागातून देखील आले असतील,त्यांच्यात करोनाची सौम्य लक्ष् णे असतील व त्यांच्यामुळे शेकडो जीव धोक्यात येणार असतील तर याला जवाबदार कोण?
पेठे हे विसरले ते सत्ताधारी आहेत व राज्य सरकारच्या सर्व नियम व अटींचे पालन करण्याची जवाबदारी त्यांच्यावर देखील आहे.त्यांना देखील शहराध्यक्ष् पदाच्या स्वरुपात सत्तेत अल्पसा वाटा मिळाला असल्याने या पुढेही ते ही अशी सत्ता राबवणार आहे का?पत्रकार व कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून!आपल्या पदाचे गांर्भीय त्यांना कळू नये?पदासोबत जवाबदारी जुळली असते की मस्ती?
शहराध्यक्ष् पदी रुजू होताच त्यांनी नियम धाब्यावर बसवण्याची सुरवात केली व पहील्याच झटक्यात आपल्याच सरकारचे सर्व नियम पायदळी तुडवले.पक्ष् श्रेष्ठी त्यांच्या या मूजोर कृत्याची दखल घेतील का?असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
नियम मोडलेत म्हणून एकाच दूचाकीवर जाणा-या पती-पत्नीलाही मनपाने जबर दंड ठोठावला.स्वत:च्या चारचाकीने जाणा-या वाहनचालकांकडून देखील मास्क नाका खाली का घातला म्हणून दंड वसूलण्यात आला.दूकान बंद करण्यास थोडा उशिर झाला म्हणून दिवसभराची कमाई आपल्या बालबच्च्यांना उपाशी ठेऊन लहान दूकानदारांनी मनपाच्या भरारी पथकाच्या उरावर ती दिवसभराची कमाई घातली.कॉटन मार्केटमधील ठोक व्यवसायी यांना मनपाच्या या पथकाने रडकूंडीला आणले त्यांचा भाजीपाला वेळोवेळी जप्त केला.
या शहराचा सामन्य नागरिक मनपाचे हे अमानवीय दुष्कृत्य अद्याप विसरला नाही,एकीकडे पेठे हे सामान्यांना न्याय देण्याची भाषा पत्र परिषदेत बोलतात तर दूसरीकडे आपल्याच सरकारने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांची पायमल्ली करतात,महत्वाचे म्हणजे असे करताना त्यांना त्याचे कोणतेही शल्य वाटत नाही,उलट ते हसून आपल्या कार्यकर्त्यांची गर्दीचे समर्थन करीत फक्त ‘साॅरी‘म्हणून सुटका करुन घेतात!
माजी आमदार सानंदा यांनी जे करोना नियम मोडण्याचे दु:साहस केले व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तोच नियम नागपूर शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष् दुनेश्वर पेठे यांच्यावर लागू होईल का?असा प्रश्न आता नागपूरची जनता विचारत आहे.

आमचे चॅनल subscribe करा