Homeनागपूर न्यूजकाँग्रेसकडे फक्त ‘हात’संघासारखा ‘दंडा’नाही!

काँग्रेसकडे फक्त ‘हात’संघासारखा ‘दंडा’नाही!

Advertisements


युवा काँग्रेसचे बंटी शेळके यांचा संताप

रेशीमबाग मैदानात वेपाेरायझर वाटप उपक्रम पोलिसांनी केला बंद

नागपूर,ता. ६ जून: गेल्या ७५ दिवसांपासून यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व मध्य नागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे त्यांच्या ११७ युवांच्या चमूसोबत अविरत कोविड-१९ च्या महामारीच्या तडाख्यात उपराजधानीत सर्वच प्रभागांमध्ये सेवाकार्य करीत आहेत.गेल्या ७५ दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी त्यांचा मुक्काम सतत मेयो-मेडीकलमध्येच असून शहरात देखील सातत्याने त्यांचे अनेकविध सेवाभावी उपक्रम सुरु आहेत.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज रविवार,दि. ६ जून रोजी रेशीमबाग येथे २०० गरजूंना वेपोरायझर वाटप उपक्रम आयोजित केला असता पाेलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून त्यांचा उपक्रम बंद पाडला.

या प्रकारामुळे बंटी शेळके यांचा चागंलाच संताप झाला.आम्ही काँग्रेसचे युवा आहोत,अहिंसक पद्धतीने सेवाकार्य करतो,आमच्या हातात गरजूंचा ‘हात’असतो,संघासारखा ‘दंडा’नाही तरी देखील आमचा हा सेवाभावी उपक्रम पोलिसांनी येऊन उधळून लावला,आज छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा असून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही रेशीमबाग मैदानात एखाद्या सेवाभावी उपक्रम ही घेऊ शकत नाही का?असा सवाल त्यांनी केला.

केवळ या ठिकणी संघ बिल्डिंग आहे त्यामुळे पोलिस सेवाभावी उपक्रम उधळून लावेल का?परवागनी घेतली नाही अशी सबब पोलिस सांगतात मात्र अशी परवागनी मागितली असती तर पोलिसांनी ती दिली असती का?असा सवाल बंटी शेळकेंनी केला.

आम्ही नागपूरच्या जवळपास सर्वच प्रभागात वेपोरायझरचे वाटप केले.आज आम्हाला रेशीमबाग परिसरात या वस्तूंचे वाटप गरजूंना करायचे होते.या साठी आम्ही सुरक्ष्ति अंतर राखून संर्पूण तयारी केली.चंद्रपूरचे आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते हे वाटप होणार होते.पोलिसांनीच आम्हाला मैदान का नाही उपलब्ध करुन दिले?असा सवालही त्यांनी केला.

नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाला आमदार मोहन मते यांनी याच मैदानात कार्यक्रमाचे आयोजन केले.तेव्हा नव्हती झाली का गर्दी?आमचा प्रश्‍न भाजप-काँग्रेसचा नसून ही वेळ मदतीची आणि माणूसकीची आहे,एवढंच आमचं म्हणनं आहे.केंद्र-राज्याचे भांडण असो कि भाजप-काँग्रेसचे,या भांडणात हजारो नागरिक मृत्यूमुखी पडलेत आणि हेच वास्तव आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्राच्या उपराजधानीत काय विदारक परिस्थिती होती?याची जाणीव आहे का?खासगी रुग्णालयांनी रुग्णांना लृटले,मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ही घरच्या मंडळींना बघायला मिळाले नाही.परस्पर दहन घाटांवरच मृतदेह पाठवण्यात आले.या शहरात या जनतेचा कोणीही वाली नव्हता. इंडियन यूथ काँग्रेसची चमू तेव्हापासून सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळवून दे,ऑक्सीजनची व्यवस्था कर,रुग्णालयांच्या बाहेर चिंतातूर आणि हताश बसलेल्या नातेवाईकांना अन्नाचे वितरण कर,औषधांची व्यवस्था कर,अश्‍या सेवाभावी उपक्रमांत गुंतली आहे.

या शहरातले तर मोठे नेते हे उलट मेयो-मेडीकलमधील अधिका-यांना व्हॉट्स ॲप ग्रूपवर त्यांच्या त्यांच्या प्रभागातील अमूक अमूक रुग्णाला भरती करुन घ्या म्हणून दवाब आणायचे,यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्ण असो किवा नागपूर शहरातला गरजू रुग्ण त्यांना या शासकीय रुग्णालयात बेड मिळणे दूरापस्तच झाले शेवटी तडफडून अनेकांनी बेड उपलब्ध नाही म्हणून या शासकीय रुग्णालयांच्या बाहरेच प्राण सोडले.त्यावेळी का नाही दाखवली अशीच पोलिस बोलावण्याची तत्परता?

खाजगी रुग्णालयांनी जी लृट माजवली त्यावर कारवाई करण्याची तत्परता या शहराचे प्रथम नागरिक असणारे महापौर यांनी तरी दाखवली का?नाशिकच्या मनपा आयुक्तांना तेथील मेडिसिटी व रामालय सारखे खासगी रुग्णालये सील करण्याची तत्परता दाखवता येते तशी तत्परता नागपूर मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी तरी दाखवली आहे का?उलट माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा याच खासगी रुग्णालयांच्या लृटीवर चाप बसला होता,असे शेळके सांगतात.

हा कार्यक्रम अतिशय शिस्तीत चालत होता मात्र पोलिसांनी या ठिकाणी धडक दिली आणि लोकांना घरी परत जाण्यासाठी दम दिल्यावर गोंधळ उडाला.आम्ही कोणतेही नियम मोडले नाही,कोणतीही हिंसा केली नाही,कोणतेही आंदोलन केले नाही तरी देखील आमच्या या सेवाभावी उपक्रमावर पोलिसांनी वर्दीचा धाक दाखवून गदा आणली.का?तर या ठिकाणी संघ बिल्डिंग आहे!

संघाला आम्हाला घाबरण्याचे कारण नाही.आम्ही या वस्तूंचे वाटप करुन निघून जाणार होतो मात्र त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले! पूर्वी आम्ही संघाच्या विरोधात अनेक आंदोलने केलीत हे मान्य आहे आम्हाला.अगदी पं.बच्छराज व्यास यांच्या पुतळ्यावर चढून चढ्ढी-टोपी ही जाळली आहे,कारण आमचे नेते राहूल गांधी यांचा अपमान झाला होता,आज मात्र परिस्थिती हे कोणतेही आंदोलन करण्याची नसून जनतेच्या मदतीला धावून जाण्याची आहे. माहिती नाही संघाला भीती कोणाची आहे आणि का आहे?असा सवाल त्यांनी केला.

यासाठीच आम्ही रेशिमबाग मैदानात कोविड-१९चे सर्व नियम पाळून शिस्तबद्धरित्या वेपोरायझरचे वाटप करीत होतो आम्हाला इतरांसारखे ५० नग वाटायचे व सांगायचे ५ हजार वाटले असा स्वभाव नाही मात्र पोलिसांनी हा सेवाभावी उपक्रम उधळला. किंबहूना फक्त संघ बिल्डिंगमुळे ज्यांनी उधळून लावला आता जनताच याचा हिशेब त्यांना मागेल.

Latest बातम्या