Homeनागपूर न्यूजपर्यावरणद्रोही शोधा त्याला.....

पर्यावरणद्रोही शोधा त्याला…..

Advertisements

आम आदमी पार्टीचे अजनी वन वृक्ष तोडी विरुद्ध’ चिपको’ आंदोलन

नागपूर,ता. ५ जून: अजनी वन येथील प्रकल्पात जवळपास ४० ते ५० हजार वृक्ष तोडीमुळे मानवांसाठी मोफत ऑक्सिजन उत्पादक स्त्रोतांचे मोठे नुकसान होईल. ही झाडे केवळ मोफत ऑक्सिजन देत नाहीत तर प्रदूषित हवा स्वच्छ करतात आणि जमिनीची तग  धरतात. उष्णतामान कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात,मात्र अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पासाठी नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एवढ्या महत्वाच्या ग्रीन पॉकेटमधील एवढ्या मोठ्या संख्येत १०० वर्षे जुनी ,हिरवीगार व डोलदार झाडे कापण्याच्या विराधेत आम आदमी पक्ष्ातर्फे आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘चिपको‘आंदोलन करण्यात आले.एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे कापून त्या ठिकणी कमर्शियल काॅम्पॅलक्स बनवणारे पर्यावरण द्रोही कोण आहेत?शोधा त्याला…अशी विविध निषेध फलके घेऊन आंदोलन करण्यात आले.

२०१९ मध्ये इस्रोच्या आरसीसीने एक अहवाल दिला आहे ज्यात असे म्हटले आहे की नागपूरमध्ये गेल्या काही दशकांमध्ये ३०% पेक्षा जास्त हिरवे आवरण (एक तृतीयांश क्षेत्र) गमावले गेले. हे चिंताजनक आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडल्यामुळे हिरव्या आवरणात अधिक घट होईल.

आयएमएस फेज-१ मधील ४५२२ वृक्ष कापण्याचा तपशील चुकीचा असून अजनी, FCI आणि इरिगेशन विभाग मिळून एकूण लहान मोठी जवळपास ४० हजार झाडे कापली जाणार आहेत, एवढ्या मोठ्याप्रमाणात होणारी वृक्ष तोड म्हणजे न भरून निघणारी पर्यावरणाची अपरिमित हानी आहे. (IMS )प्रकल्प हा एक ‘लक्झरी ’प्रकल्प आहे जो स्थलांतरित केला जाऊ शकतो किंवा वृक्ष तोड न करता सुद्धा प्रकल्प उभा होऊ शकतो.

परंतु, ही वृक्ष तोड झाल्यानंतर झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे आश्‍वासन तसेच सर्व अनुभव अयशस्वी ठरल्यामुळे या ४० हजार झाडांचे देखील प्रत्यारोपण केले जाऊ शकत नाही. तसेच नवीन वृक्षारोपण सुद्धा कागदावरच राहल्याचा या शहराचा व संबधित अधिका-यांचा इतिहास आहे.

त्यामुळे याचाही फारसा उपयोग होणार नाही, किंवा जुन्या कापलेल्या झाडांची जागा घेऊ शकत नाही. ही झाडे अनेक पक्ष्यांसाठी अधिवास आहेत जी सूक्ष्म हवामानावर नियंत्रण करतात. त्यांना कापल्यास पक्ष्यांची घरे, कीटक नष्ट होतील, जे जैवविविधतेच्या आवश्यक भागांचे परागण करन्यास उपयुक्त  आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी पर्यावरण मंजुरी घेतली गेली नाही. एकूणच वरील बाबींचा विचार केला असता करदात्यांच्या रकेमतून होत असणाऱ्या अशा प्रकारच्या ‘पायाभूत विकासा’मुळे जगण्याच्या मूलभूत  सुविधा  (हवा आणि पाणी)  पासून वंचित राहण्याची किंमत नागपूरकरांना मोजावी लागेल.

त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा अट्टहास धरणा-या मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प मिहान मध्ये किंवा शहराच्या बाहेर घेऊनन जावा,त्याचे नागपूरकर स्वागतच करतील.

चिपको आंदोलन विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े व राज्य कोषाध्यक्ष् जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख्यानी राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय कौंसिल मेंबर अमरीश सावरकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, दक्षिण नागपुर संयोजक सुरेन्द्र समुद्रे, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, युवा नागपुर संयोजक गिरीश तीतरमारे, युवा नागपुर सचिव प्रितिक बावनकर उपस्तित होते. याचा बरोबर पूर्व नागपुर मधून, बबलू यामीन, रोहित वाघमारे, रविकांत वाघ, अभय भोयर, राहुल सोमकुवर, बबलू मोहाडीकर, पश्चिम नागपुर मधून आकाश कावळे, राहुल कावळे, सुरेश चौधरी, विश्वजीत मसराम उत्तर नागपुर मधून स्वप्निल सोमकुंवर, प्रदीप पोनिकार, पंकज मेश्राम, निशिकांत माटे, योगेश पराते, प्रवीण कुंभारे, जगदीश रोकड़े, अमोल बोडीले मध्य नागपुर मधून विनोद गौर, हरीश वेळेकर, हरीश बोकडे, पार्थ मीरे, विशाल चौधरी, आकाश विभूते दक्षिण नागपुर मधून प्रतिक मीरे, राजू देशमुख, प्रणीत कडु इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Latest बातम्या