फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजझोन सभापतींच्या मुलांची खुलेआम फिरस्ती:गरीब भाजीवाल्या महिलेची भाजी मात्र चौफेर उधळली

झोन सभापतींच्या मुलांची खुलेआम फिरस्ती:गरीब भाजीवाल्या महिलेची भाजी मात्र चौफेर उधळली

Advertisements


जरीपटका पोलीस ठाण्यातील पीएसअायचे असंवेदनशील कृत्य!

पोलिस उपअधीक्ष् कांची लिपापोती

नागपूर,ता. २१ मे: मंगळवार दि. १८ मे रोजी नेहरु नगर झोन सभापती स्नेहल बिहारे यांच्या शासकीय गाडीतून तीन तरुण मुले यात त्यांची मुलगी व मुलगा ही होता भर दूपारी २.३० वाजता सीताबर्डीवर बिनधास्त दीड ते दाेन तास फिरस्ती करताना नागपूरकर जनतेला आढळली,त्यांच्याकडे ना एका हाकेच्या अंतरावर असणा-या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील ‘ कर्तव्यदक्ष्’ पोलीस कर्मचा-यांचे लक्ष् गेले ना दररोज नागपूरकरांच्या रिकाम्या खिश्‍यातून लाखो रुपयांचा दंड वसूल करणा-या नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या चमूचे ! मात्र जरीपटका बाजारात एका गरीब,गरजू महिलेने रस्त्याच्याकडेला पोटाच्या भूकेसाठी व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहसाठी मांडलेल्या भाज्या जरीपटका पोलीस ठाण्यातील पीएसआयने अतिशय असंवेदशनशीलरित्या चाैफेर उधळून दिल्या! हे दृष्य आज नागपूरकरांना थक्क करुन गेलेत,हा व्हिडीयो समाजमाध्यमावर दिवसभर चांगलाच व्हायरल झाला,पोलीसि उपअधीक्ष् क निलोत्पल बासू यांनी मात्र ती भाजी विक्रेती नसून खरेदी करण्यासाठी आलेली महिला असल्याची लीपापोती केली.

जरीपटका भाजीबाजारात काही भाजी विक्रेते हे ४-५ वेळा सांगून देखील त्या भागातून जात नव्हते.भाजी विक्रीसाठी देखील फक्त ११ वाजेपर्यंतच परवानगी आहे.म्हणून पोलिसांनी भाजी विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली,पण हे सर्व भाजी विक्रेते पुरुष होते,असे उपनिरीक्ष् क यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले.या प्रकरणात संबंधित पोलिस उपनिरीक्ष् काची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र तरीही प्रश्‍न उरतो,पुरुष असो किवा महिला,पोटाच्या खळगीसाठी चोरी-मारी आणि लृटमार करण्यापेक्ष्ा इमाने-इतबारे रस्त्याच्याकडेला भाजीची दूकान लावणे हा साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायदा शहरात लागू असताना एवढा गंभीर गुन्हा ठरतो का?

ज्यासाठी माणूसकीच्या सर्व मर्यादा सोडायलाच हव्या!व्हिडीयोमध्ये ते दूकान त्या महिलेचेच असल्याचे स्पष्टपणे दिसत असून शेवटी ती आपला तराजू सांभाळताना दिसून पडतेय.ग्राहक असे का करेल?पोलिस विभागाकडून आपल्या पीएसआयची अशी कृती झाकून ठेवण्यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठांतर्फे करण्यात आलेले दुबळे समर्थन आधीच करोनामुळे ‘संपलेल्या’व गेल्या १४ महिन्यांपासूनचा लॉकडाऊन सहन करता-करता ‘पिचलेल्या’जनतेच्या मनात आणखी चिड निर्माण करणाराच आहे.

भाजीसारखी नाशवंत वस्तू ती ही‘ मे‘ महिन्याच्या रणरणत्या उन्हात लवकरात लवकर विकून दोन पैसे पदरी पाडण्यासाठीचा भाजी विक्रेत्यांचा खटाटोप हा खाकी वर्दीवाल्यांच्या नजरेत अट्टल गुन्हेगारांसारखा गुन्हा ठरत असल्यास हे अपयश ‘माणूसकीचेच’ आहे.त्या महिलेला या पीएसआयने फक्त आणखी एकदा समज दिली असती,कारवाई करण्याचा इशारा दिला असता तरी लगबगिने तिने आपला फाटका संसार वेचून घेण्याचा प्रयत्न निश्‍चितच केला असता,त्यासाठी आक्रमक होऊन खाकी वर्दीची गुर्मी एका दुबळ्या,निशस्त्र,अगतिक महिलेवर काढण्याची मुर्दमकी पीएसआय यांना न शोभणारीच होती,अश्‍या ज्वलंत व धगधगत्या प्रतिक्रिया आता समाज माध्यमात उमटत आहेत.

स्वत:नागपूर पोलिसांच्या ट्वीटर हँडलवरच अश्‍या ठिकाणी वेगळ्या कृतीची गरज होती अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

सध्या कराेना महामारीच्या काळात सामान्य माणूस हा दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कुशासन व गलथान धोरणांमुळे संपूर्णपणे संपला आहे.मायबाप सरकार एका पाठोपाठ १५-१५ दिवसांचे लॉकडाऊन वाढवत आहे मात्र ज्यांचे हातावर पोट आहे ते करोनापेक्ष्ा ही जास्त वेदनेची धग सोसवणा-या पोटाच्या आगी पुढे हतबल झाले आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक हे तर निव्वळ खाकी वर्दी घालून आधीच रिकाम्या झालेल्या नागरिकांच्या खिशातून गेल्या १४ महिन्यांपासून सातत्याने’वसूली-दंड’आकारण्यात मग्न आहे.काही नागरिक व काही दूकानदार हे नियम मोडतात व चोरुन दोन पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात.मात्र एवढ्या प्रदीर्घ काळापासून कडक निर्बंधांची झळ सोसून प्रामाणिकपणाची त्यांची हिंमत पूर्णत:नष्ट झाली आहे.

काय चूक काय बरोबर ही सारासार विवेकबुद्धीने विचार करण्याची वेळ, पोट आणि कुटुंबियांची जवाबदारी या दूकानदारांना घरात चार भिंतीत स्वस्थ बसू देत नाही मात्र चोरुन अर्धे शटर उघडून दोन पैसे कमावण्याचे ‘दुस्साहस’ केल्याप्रकरणी नुकतेच सीताबर्डी येथील १४ दूकानदारांची ऑन द स्पॉट ॲण्टीजन चाचणी केली,ते ठिक आहे मात्र…..त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्याची तत्परता बर्डी पोलीसांनी दाखवली!

सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा वारंवार उगारणारे हेच खाकी वर्दीततले अधिकारी व कर्मचारी तसेच मनपाच्या उपद्रव शोध पथकातील चमू मंगळवारी भर दूपारी अडीच वाजता,दीड तास बर्डीवर निरर्थक भटकंती करणा-या झोन सभापतींच्या मुलांवर व त्यांच्या मित्रावर कारवाई करण्याची तत्पराता दाखवतील का?

माझा मोबाईल खराब झाला होता त्यामुळे ओळखीच्या दूकानात शासकीय गाडीने मुले व त्यांच्या एका मित्रासोबत मी मोबाईल सुधरवण्यासाठी पाठवला,तो बनेपर्यंत मुले बर्डीवर फिरत होती!असे अतिशय चमत्कारिक समर्थन भाजपच्या या ‘विद्वान ’नेहरु नगर झोन सभापती स्नेहल बिहारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केले!

मूळात सकाळी ११ वा.दूकाने बंद करण्याचे शासकीय फर्मान असताना फक्त झोन सभापतींच्या मोबाईलसाठी त्यांच्या ओळखीच्या दूकानाचे शटर उघडलेच कसे?हा प्रश्‍न त्या ‘सत्ताधारी‘असल्यामुळे ‘औचित्याला’धरुन सत्ताधा-यांसाठी नसणारच आहे!

तीन दिवस उलटून देखील ना महापौर ना भाजपचे सर्व ‘सर्वश्रेष्ठ‘ नेते यांनी या झोन सभापतींना नियम मोडल्याबद्दल कोणतीही विचारणा केली,उलट माध्यमंाना प्रतिक्रिया देताना ज्या गोष्टीचे समर्थन केले गेले, त्यांनी संवैधानिकच नव्हे तर नैतिक नियम देखील मोडला,याचे देखील या झोन सभापतींना कोणतेही सोयरसूतक असलेले दिसत नाही.

त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून मग रस्त्याच्याकडेला पोटाची खळगी भरण्यासाठी एका दिनदुबळ्या,अबला महिलेच्या भाज्या, चाैफेर उधळून लावण्यात एखाद्या पीएसआयचा ‘पुरुषार्थ’कसा उसळून येतो?याचे उत्तर आता अनेक नेटीझन्स हे सोशल मिडीयावर विचारत आहेत.आहे का काही उत्तर या मुर्दाड शासनाकडे?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या