

नागपूर, ता. १२ : राज्य शासनाचे निर्देशानुसार केवळ ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना गुरुवारी (१३ मे) रोजी लसीकरणाचा दूसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दूसरा डोज देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिले आहे. मनपाच्या सर्व ९६ केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. पुढील आदेशापर्यंत फक्त दुसरा डोज नागरिकांना दिला जाईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ.आंबेडकर रुग्णालय इंदोरा व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे कोव्हॅक्सीन चा दूसरा डोज उपलब्ध असून अन्य केन्द्रावर कोव्हीशिल्डचा दूसरा डोज दिलया जाईल. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
शासन निर्देशानंतर १८ ते ४४ चे लसीकरण सुरु होईल : महापौर
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर शासनाच्या दिशा निर्देशानुसार या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, ही माहिती महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिली.
महापौरांना १८ ते ४४ वर्षावरील वयोगटाच्या लसीकरणाबददल तसेच ४५ वर्षावरील नागरिकांचे दूस-या डोज बददल नागरिकांची सतत विचारणा होत आहे. महापौरांनी सांगितले की मनपा ला प्राप्त लसीचा उपयोग ४५ वर्षावरील नागरिकांना दूसरा डोज देण्यासाठी होणार आहे. गुरुवारी सर्व केन्द्रांवर नागरिकांना दूसरा डोज दिल्या जाईल. ज्यांचा दूसरा डोज शिल्लक आहे त्यांनी मनपा केन्द्रावर जाऊन या संधीचा लाभ घ्यावा. आता शासनाच्या निर्देशानुसार फक्त दूसरा डोज दिला जाईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून पुरेसा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे मनपाला लसीकरण मोहिमेला थांबवावे लागले. ज्या नागरिकांनी प्रथम डोज घेतले होते त्यांना दूसरा डोज मिळण्यात अडचणी येत होत्या. राज्य शासनाकडून आता नागरिकांना दूसरा डोज देण्यासाठी लस प्राप्त झाली आहे. ज्यांनी पहिला डोज खाजगी रुग्णालयामध्ये घेतला ते सुध्दा मनपा केन्द्रांवर आपला दूसरा डोज घेऊ शकतात. सर्व नागरिकांनी आपल्या सोबत प्रथम डोजचे प्रमाणपत्र सोबत घेऊन जावे.
त्यांनी सांगितले की, लसीकरण देण्याची व्यवस्था मनपा तर्फे करण्यात येते परंतु लसचा पुरवठा राज्य शासनाव्दारे केला जातो. त्यांनी राज्य शासनाला लसीचा पुरेसा पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. सर्व नागरिकांना लस दयायची आहे तर लसीचा पुरवठा अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
