फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकाय चाललंय काय?ज्येष्ठांना उद्या ही लस नाहीच!

काय चाललंय काय?ज्येष्ठांना उद्या ही लस नाहीच!

Advertisements

६ मे रोजी मनपाला मिळालेल्या लसींचा आकडा ‘मिसिंग’

नागपूर,ता. १० मे: केंद्र सरकारने देशात १ मे पासून १८ वर्ष वयावरील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केल्यावर ६ मे पासून नागपूर महानगरपालिकेनी या वयोगाटातील नागरिकांना लस देण्यासाठी ‘जय्यत’तयारी केली.प्रारंभी या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ३ केंद्र सुरु करण्यात आली,आता ६ केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे.ज्येष्ठांसाठी ९६ केंद्रांवर लसीकरण सुरु होते,मात्र ६ मे पासून ज्येष्ठांना या सर्व केंद्रावर फक्त दोनच वेळा लसी उपलब्ध झाल्या.रविवारी लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा उद्या मंगळवारी व आज सोमवारी ज्येष्ठांसाठी लसच उपलब्ध नसल्याचे मनपाने जाहीर केले.

परिणामी शहरातील ज्येष्ठांना विशेषत:पहीला डोज घेतलेल्या नागरिकांना याच प्रचंड मनस्ताप भाेगावा लागत आहे.मनपाच्या एकंदरित अतियश ढिसाळ आणि भोंगळ कारभाराचा हा आणखी एक ‘उपक्रम‘आहे ज्याचे पूर्णत:बारा वाजले आहेत.

मूळात ५ मे रोजी मनपाद्वारे ‘ज्येष्ठांचे लसीकरण आजपासून,पुरेशा साठा आल्याचा दावा किती फोल होता याचा अनुभव या शहरातील ज्येष्ठ नागरिक सर्वच केंद्रांवर घेत आहे.काल रविवारी लस उपलब्ध असल्याचे जाहीर केल्यानंतर देखील अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना ‘मे ’महिन्याच्या रणरणत्या उन्हात अनेक तास ताटकळत उभे राहावे लागल्याचे अनेकांचे अनुभव आहे.

आतापर्यंत ५ लाख ५१ हजार ७०० नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची मनपातर्फे आकडेवारी जाहीर करण्यात आली.यात ४ लाख ४१ हजार १५७ नागरिक हे पहीला डोज घेणारे आहेत,या आकडेवारीवरुन दूस-या डोजसाठी ज्येष्ठांची किती मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे हे लक्ष्ात येतं.

ही आकडेवारी लक्ष्ात न घेता मनपातर्फे प्रसिद्धीच्या हव्यासापायी सर्रास ‘ज्येष्ठांसाठी पुरेशा लसी उपलब्ध’असी घोषणा केली जाते.मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक विविध केंद्रांवर गर्दी करतात मात्र त्यांच्या पदरी निराशा पडते.मग ६ मे रोजी मनपा प्रशासनाने घोषित केल्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी पुरशा लसी या नेमक्या किती उपलब्ध होत्या?असा सवाल आता विचारला जात आहे,मनपा प्रशासन त्यांना एकूण किती लसी उपलब्ध झाल्या याची आकडेवारी जनतेसमोर पारदर्शकरित्या जाहीर का करीत नाही?यावरुन मनपा सत्ताधारी नागरिकांसोबत लसींचे राजकारण खेळत असल्याची शंका समाज माध्यमांवर व्यक्त केली जात आहे.

७ महिन्याने येणा-या मनपाच्या निवडणूकीच्या तोंडावर जनतेला पुरशा लसी उपलब्ध करुन देण्याची सत्ताधा-यांची राक्ष् सी मंशा असल्याचा संताप ही माध्यमात उमटत आहे.नुकतेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन पत्र लिहून मनपा स्वत:१५ कोटी रुपये उभारुन आपल्या नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन देईल यासाठी मान्यता देण्याची विनंती करणारे पत्र लिहले,आहे त्याच लसींचे विनियोजन महापौरांना योग्यरित्या करता येत नसल्याचे दृष्य जागोजागी उमटले असताना १५ कोटींच्या लसींचे नियोजन ते कश्‍याप्रकारे करतील,याबाबत फार मोठे प्रश्‍नचिन्ह नागपूरकरांच्या डोळ्यासमोर उभे ठाकल आहे.

मनपा प्रशासन हे लसींच्याबाबतीत नागरिकांना ‘पेंडूलम’प्रमाणे झूलवित आहेच मात्र महापौर आणि सत्ताधारी हे देखील १८ वर्ष वयोगटावरील लसीकरण केंद्रात उद् घाटन सोहळे साजरे करण्यात धन्यता मानत असल्याचे संतापजनक दृष्य उमटले आहे.मनपा प्रशासन व पदाधिकारी हे बैठक घेऊन एकूण किती लसी मनपाला प्राप्त झाल्या,त्यातील दुस-या डोजसाठी ज्येष्ठांना किती लसी उपलब्ध करुन देण्यात याव्या,तरुणाईसाठी किती लसी राखून ठेवाव्या,याचे कोणतेही नियोजन करीत नसून मनमानेल त्याप्रमाणे संपूर्ण भर, नव्याने पहील्यांदा लस घेणा-या तरुणाईवर केंद्रित केल्याचे दिसून पडतंय.विशेष म्हणजे लसींच्या उपलब्धतेची कोणतीही आकडेवारी मनपाच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धच केल्या जात नाही,त्यामुळे दूसरा डोज घेणा-यां नागरिकांच्या नशीबी मनस्तापाशिवाय काहीही येत नसल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

महापौर व मनपा प्रशासन साढे चार लाखांच्या जवळपास असणा-या ज्येष्ठांसाठी दूस-या डोजसाठी नियोजन कधी करणार?अति.आयुक्त राम जोशी हे दररोज’ आजही ज्येष्ठांना लस उपलब्ध नाही,लसीचा साठा उपलब्ध नाही’असे प्रसिद्धीपत्रक कधीपर्यंत काढत राहणार?असा सवाल आता विचारला जात आहे,महापौरांनी विविध लस केंद्रांवरील उद् घाटन सोहळे बंद करुन ज्येष्ठांच्या दुस-या डोजसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.

राज्य सरकारकडे लसींबाबत स्वायत्ता मागण्यापूर्वी महापौरांनी, भारताकडून ८० देशांना लसींचा पुरवठा करण्यात आला व १५० पेक्ष्ा अधिक देशांना वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले त्यामुळे देशातील नागरिकांना लसीबांबत भोगावी लागत असलेल्या मर्यादा ही देखील लक्ष्ात घेतली पाहिजे,असा विराेधकांचा सूर आहे. महाल येथील एकाच केंद्राकडे लसींचा जो ओघ ‘अविरत ’वाहत असतो तो तात्काळ थांबवून इतर केंद्रांवरील नागरिकांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

२९ एप्रिल २०२१ रोजी महापौरांनीच ज्येष्ठांच्या लसीकरणात बाधा येऊ देऊ नका,याची काळजी घ्या,असे निर्देश प्रशासनाला दिले होते,आज अवघ्या १० दिवसात महापौरांना स्वत:च्याच ‘वचनाचे’ विस्मरण झाले असल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

नुकतेच सुप्रसिद्ध ‘लॅन्सेट’या नियतकालिकेतून गंभीर इशारा देण्यात आला आहे.येत्या १ ऑगस्टपर्यंत भारतात कराेनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि यासाठी भारत सरकार सर्वस्वी जवाबदार असेल,असं यात म्हटलं आहे.तसेच लॅन्सेटनं जाहीर केलेल्या अहवालानुसार,पुढील ३ महिन्यांमध्ये साढे सात लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो,असे सांगण्यात आले.एवढ्या भयाण आकडेवारीत एकीकडे वेगाने लसीकरणच हा एकमेव उपाय सांगण्यात येत असून दूसरीकडे शहरातील काही लाख लोकांसाठीचे योग्य व प्रभावी नियोजन करण्यात नागपूर महानगरपालिका ही सपशेल अपयशी ठरली असल्याचे चित्र उमटले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या