फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविम्सवर’ काय कारवाई केली?फक्त नोटीस पाठवून मनपा प्रशासनाची जनतेच्या डोळ्यात धूळफेक

विम्सवर’ काय कारवाई केली?फक्त नोटीस पाठवून मनपा प्रशासनाची जनतेच्या डोळ्यात धूळफेक

Advertisements

टोपे यांना देणार पत्र  :आयुक्तांची करा उचलबांगडी

नागपूर,ता. ८ मे: शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले व रुग्णांच्या आरोग्य विषयक परिस्थितीचा फायदा या महामारीच्या काळात ही लाटला म्हणून आर्थिक लुबाडणूक करणा-या १३ रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली मात्र ‘जय जवान जय किसान’संघटनेने ‘विम्स‘रुग्णालयाने जयेश किशोर साखरकर या अवघ्या २५ वर्षीय तरुणाकडून वडीलांवर केलेल्या उपचारासाठी साढे चार लाख रुपयांचे बिल उकळले त्याचे पुरावे देऊनसुद्धा अद्याप कारवाई नाही झाली,यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून अश्‍या खासगी रुग्णालयांना नोटीस देणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् व राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे केला.

विशेष म्हणजे शहरातील ही खासगी रुग्णालये गेले वर्षभरापासूनच रुग्णांची आर्थिक लृट करीत आहे मात्र मनपा आयुक्त व आरोग्य विभागाने फक्त पुतळेस्वरुपी‘ऑडिटर’बसवण्याचे काम केले.या ऑडीटर्सची भूमिका संशयास्पद असून रुग्णांच्या न्याय हक्काची बाजू घेण्याऐवजी त्यांनी रुग्णालयांची बाजू घेऊन भ्रष्ट कारभार केला असल्याची शेकडो उदाहरणे आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री यांनी नागपूर मनपाच बर्खास्त करुन सत्ताधा-यांच्या तावडीतून मनपा प्रशासनाला सोडवावे व जनतेच्या हिताचे काम करु देण्याची मागणी पत्राद्वारे करणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे म्हणजे मनपात आयुक्त म्हणून रुजू झालेले राधाकृष्णन बी.यांची कोणतीही पकड मनपाच्या आरोग्य विभागावर व वैद्यकीय अधिका-यांवर नसल्याचे स्पष्ट झाले.असा निष्क्रिय मनपा आयुक्त नागपूरकरांवर थोपवणा-या राज्य शासनालाच व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आमची संघटना त्वरित मेल करणार असून ’आयुक्त हटाव जनता बचाव’ची विनंती करणार आहे.

मनपा आयुक्तांचा या जीवघेण्या महामारीच्या काळात एकंदरित कारभार बघता नागपूरात ‘मनपा आयुक्तांची पोस्टच रिकामी आहे का?‘असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे,आम्ही याची देखील जाणीव आरोग्य मंत्री यांना करुन देणार आहोत.ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशी ‘पोपट’यांची उचलबांगडी करुन चहल यांना मुंबई मनपा आयुक्त पदी बसवले व धारावीतील कोविड नियंत्रणात आणला तशीच कारवाई नागपूरसाठी देखील करावी कारण मुंबईप्रमाणेच नागपूरकरांचे प्राण हे मोलाचे आहेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे ते म्हणाले.

जेव्हा कोविडने शहरात उच्छाद मांडला तेव्हाच शहारतील अनेक खासगी रुग्णालयांनी गरजू रुग्णांकडून पैस उकळून टाकले आणि आता फक्त नोटीसा पाठवायला मनपाचा विभाग जागृत झाला का?असा सवाल त्यांनी केला.या सर्व लृटीमध्ये मनपाची देखील तेवढीच भ्रष्ट यंत्रणा बरोबरीने सहभागी असल्याचा धडधडीत आरोप पवार यांनी केला.

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे खासगी रुग्णालयांच्या विरोधात मनपाचेच सत्ताधारी असणारे माजी महापौर संदीप जोशी हे आंदोलनाचा इशारा देत आहे.याचा अर्थ आम्हीच जनतेचे तारणहार म्हणून आजी महापौर व माजी महापौर यांच्यामध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरु आहे का?असा जळजळीत प्रश्‍न प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.सत्ता ज्या पक्ष्ाची तेच कारवाई करण्याचे सोडून आंदोलनाची भाषा करतात,नागपूरकर जनतेला हे मूर्ख समजतात का?श्रेयवादाच्या लढाईत समस्त नागपूरकर जनतेचं आरोग्यच यांनी धोक्यात आणले असल्याचा आरोप पवार यांनी केला.

’जय जवान जय किसान’संघटना मनपाला फक्त दोन दिवसांचा वेळ देत आहे,ज्या वोक्हार्ट हॉस्पीटल शंकरनगर व गांधीनगर,सेव्हन स्टार हॉस्पीटल जगनाडे चौक,विवेका हॉस्पीटल सुभाषनगर,सुश्रृत हॉस्पीटल रामदापेठ,आयुष्यमान हॉस्पीटल रामदासपेठ,अर्नेजा हॉस्पीटल रामदासपेठ, किंग्जवे हॉस्पीटल कस्तुरचंद पार्क,व्हिम्स हॉस्पीटल कामठी रोड,सेफ हॅण्ड हॉस्पीट लकडगंज,रेडियन्स हॉस्पीटल छापरुनगर,मेडिकेअर हॉस्पीटल मानकापूर,ऑरिअर हॉस्पीटल वंजारीनगर यांना मनपाने नोटीस बजावण्याचा फार्स केला आहे,येत्या दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही केली तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले जाईल.

विम्स हॉस्पीटलचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांना देखील नोटीस पाठवून जयेश साखरकर या तरुणाच्या तक्रारीची नोंद मनपा आयुक्तांनी न घेतल्यास आयुक्तांचा घेराव करण्यात येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या