

करोना महामारीत ही मनपा सत्ताधारी नेत्यांचा भ्रष्टाचाराचा‘मृत्यूत्सव’
नागपूर,ता. २९ एप्रिल: एकीकडे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे ‘रुग्णांचा प्राण महत्वाचा’ हा जप करीत असताना त्यांच्याच पक्ष्ाची सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेचे काही हेव्हीवेट नेत्यांचे अद्याप ही रुग्णांच्या प्राणांपेक्ष्ा स्वत:ची तुंबडी भरण्याकडेच लक्ष् असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली.या नेत्याला एका खासगी उद्योजगाकडून एकूण ७५ ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त झाले,नुकतेच झालेल्या एका मनपाद्वारे संचालित कोव्हिड सेंटरमध्ये त्याने त्यातील २५ सिलेंडर ‘दान’केले,प्रचार-प्रसार माध्यमात फोटो ही छापून आणले मात्र उर्वरित ५० ऑक्सीजन सिलेंडरचे काय केले?घरी ठेवले का?की ब्लॅकमध्ये खासगी रुग्णालयांना विकले?असा सवाल आता चर्चिला जात आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून करोनामुळे मृत्यूचे भयाण तांडव नागपूरात बघावयास मिळत आहे.यात सर्वाधिक मृत्यू हे वेळेवर खाटा,उपचार,ऑक्सीजन सिलेंडर व रेमडिसिव्हिर न मिळाल्याने झाले.अशावेळी मनपातील या नेत्याला एका खासगी उद्योजगाकडून गोरगरीब, गरजू रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली ७५ ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त झाल्यावरही १०० खाटांच्या कोव्हिड सेंटरमध्ये या नेत्याने राजा हरिशचंद्रासारख्या ‘उदार मनाने’२५ सिलेंडर दान करण्याचे औदार्य दाखवले.मूळात १०० खाटांसाठी संपूर्ण ७५ सिलेंडरदेखील या कोव्हिड केंद्राला कमीच पडले असते मात्र एकीकडे नागपूरकर जनतेसाठी काहीतरी करतोय,ही प्रसिद्धी देखील लाटायची व दूसरीकडे हजारो रुग्णांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू होत असताना ५० सिलेंडरवर बक्कळ पैसा देखील कमवावा,हा उद्योग या नेत्याचा महामारीच्या काळात देखील सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नुकतेच भाजपच्या वर्धापन सोहळ्यात गडकरी यांनी आता मनपाची सत्ता तरी गमावू नका,असा सल्ला दिला होता मात्र तरीदेखील काही सत्ताधारी नेत्यांना भ्रष्ट कारभाराचा मोह सूटत नसून ऑक्सीजन सिलेंडमध्ये ही ते ब्लॅक मार्केटिंग करीत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.गडकरी यांच्या सूचनेचाही पैश्यांच्या लोभासमोर प्रभाव नसल्याची टिका होत आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनीच केला होता केटीनगरमधील कोव्हिड केंद्राला विरोध,विसरलेत का?समाज माध्यमांवर महापौरांवर तीव्र प्रतिक्रिया-
गतवर्षी माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात केटीनगर मधील इमारतीत १०० खाटांचे कोव्हिड सेंटर सुरु करण्यासाठी इमारतीचे रिनोव्हेशन करण्यात आले होते मात्र ही जागा कमर्शियलसाठी राखीव असल्याने या ठिकाणी कोव्हिड केंद्र उभारले जाऊ शकत नसल्याचे सांगत महापौर दयाशंकर तिवारी यांनी या परिसरात तीव्र आंदोलन केले होते.
या कोव्हिड केंद्राला तेथील रहीवाश्यांनी देखील विरोध केला होता मात्र भाजप पक्ष्ाचे ज्येष्ठ नेते म्हणून तिवारी यांना या १०० खाटांची भविष्यात नागपूरकरांना किती निकडीची गरज भासणार आहे हे समजावयाचे सोडून निव्वळ कसे राजकारण केले,आंदोलन केले,मुंढे हटाव नागपूर बचावची मोहिम राबविली त्या आंदोलनाचे स्मरण करीत विविध समाज माध्यमांवर याच केटीनगरच्या कोव्हिड केंद्राचे ‘साग्रसंगीत उद् घाटन’करणा-या सर्व भाजपच्या नेत्यांवर टिकेची झोड उठली आहे.
करोना महामारीत नागरिकांचे जीव वाचवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांचा हा उद् घाटन सोहळा म्हणजे आपले अपयश झाकण्यासाठीचे थातूरमातूर प्रयत्न असल्याचे नेटिझन्सने सूनावले.मुंढे यांना दूरदृष्टि होती त्यातूनच त्यांनी नागपूरकरांसाठी मनपाद्वारे संचालित दवाखान्यात खाटांची सोय करण्यासाठी धडपड केली मात्र केंद्रिय मंत्री नितीन गडकरीपासून तर स्थानिक नगरसेवकांपर्यंत यांना मुंढे हे नको होते त्यामुळेच मुंढे यांना सतत टार्गेट करण्यात आले.गडकरी यांनी आपला प्रभाव वापरुन मुंढे यांची बदली केली,एका प्रामाणिक सनदी अधिका-याला मनपात टिकू दिले नाही व सत्ताधा-यांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करुन दिले असल्याचे नेटिझन्स विविध माध्यमात सुनावत आहे.
सध्या नेटिझन्सकडून भाजप पक्ष्ाचे सर्वच नेते हे प्रचंड रोषाला बळी पडत आहेत.यात त्यांचे महामारीच्या काळातही उद् घाटन सोहळे न थांबल्याने भाजपचे हे नेते ‘मृत्यूत्सव’साजरा करीत असल्याची टिका होत आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना काय दिलं तर एंबूलेंस!
नुकतेच प्रकाश नगरयेथील कोविड केंद्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णवाहिका दान केली.याचे देखील छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले.यावर देखील सोशल मिडीयावर टिकेची झोड उठली.विशेष म्हणजे शहरातील बहूचर्चित व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा गूंड मुन्ना यादव हा देखील माजी मुख्यमंत्र्यांच्या या उद् घाटन सोहळ्यात उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.
या रुग्णवाहिकेचे लोकापर्ण तर झाले मात्र ते सामान्य गरजू नागरिकांना किती दराने उपलब्ध होणार आहे याचे दरपत्रक माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असते तर बरे झाले असते,असे नेटीझन्स सांगतात आहेत.इतर रुग्णवाहिकेचे मालक ज्याप्रमाणे करोना महामारीच्या या भीषण संकटात फक्त २ किलोमीटरसाठी गरजूंकडून १०-१० हजार रुपये उकळत आहे त्याचप्रमाणे या रुग्णवाहिकेचेही दर असणार आहे का?असा सवाल नेटीझनने विचारला आहे.
मनपा आयुक्त ‘मिसिंग’-
भाजपच्या सत्ताधा-यांसोबतच नेटीझन्सच्या सर्वाधिक रोषाला बळी पडत आहेत ते मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.मनपा आयुक्त ‘मिसिंग’असल्याची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून ज्या नागपूरकरांनी तुकाराम मुंढे यांचा धडक कारभार अनुभवला ते राधाकृष्णन बी. यांच्या सत्ताधा-यांसमोर मान तुकविण्याच्या कार्यशैलीवर कठोर प्रहार करीत आहेत.
नागरिक रस्त्यांवर मरत आहेत,मुंढे असते तर नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले असते,राधाकृष्णन बी.हे तर आपल्या वातानुकूलीन कक्ष्ाच्या बाहेरच पडत नाही,मुंढेंनी भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या खासगी रुग्णालयावर लाखाेंचा दंड ठोठावण्याचे धाडस दाखवले होते,राधाकृष्णन बी यांनी तर खासगी रुग्णालयांना गाेर गरीब रुग्णांची आर्थिक लृट करण्या-यांना रान मोकळे करुन दिल्याची टिका होत आहे. महापौर तिवारी यांनी देखील कोणताही पुढाकार घेऊन एकाही खासगी रुग्णालयावर धाड टाकली नाही,ऑडीट तपासले नाही,सामान्य जनतेचा सध्या प्रशासकीय व राजकीयस्तरावर कोणीही वाली नसल्याचे नेटिझन्स यांनी उद्विग्नता व्यक्त केली.
मनपा आयुक्त हे खासगी डॉक्टर्सच्या हॉस्पीटलला कोव्हिड केंद्राचंी परवानगी प्रदान करण्यापेक्ष्ा शहारातील हॉटेल लॉबीला कोव्हिड केंद्र उघडण्याची तातडीने परवागनी देण्याबाबत देखील मनपा आयुक्त चांगलेच ट्रोल होत आहेत.ही हॉटेल लॉबी एका एका खाटाचे एक लाख रुपये वसूल करीत असल्याचे सांगितले जात आहे.‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’या उक्तीप्रमाणे करोनासारख्या महाभयंकर काळात सर्वदूर मृत्यूंचा तांडव सुरु असताना करोना रुग्णांच्या नशीबी मात्र ‘तेरवी’ही नशीबी येत नसल्याची व्यथा व्यक्त केली जात आहे.
नुकतेच काँग्रेस पक्ष्ाच्या युवा ब्रिगेडचे नेते व नगरसेवक बंटी शेळके यांनी मनपा आयुक्तांच्या कक्ष्ासमोर आयुक्तांच्या एकंदरित कार्यशैली विरोधात चांगलाच राडा केला.मौनी बाबा असलेल्या अश्या मनपा आयुक्तांची तुरंत हकालपट्टी शासनाने करावी अशी मागणी करीत तुकाराम मुंढे यांना परत बोलावण्यात यावे असा आग्रह धरला.

माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या या पोस्टवर देखील नेटीझन्सने चांगलाच संताप व्यक्त केला.आमदार पद भूषवणा-या नेत्याने ‘घरात रहा सुरक्ष्ति रहा’असा नारा देण्यापेक्ष्ा ’तुम्ही घरात रहा आम्ही रस्त्यावर तुमच्या मदतीसाठी राहतो’अशी वर्तवणूक करायला हवी होती अशी टिका करण्यात आली.




आमचे चॅनल subscribe करा
