
हॉटेल्समध्ये बेड पण डॉक्टर्स गायब!
शहरात मृत्यूचा तांडव….आकड्यांची लपवाछपवी
नागपूर,ता. २१ एप्रिल: शहरात दरवर्षी रामनवमीच्या दिवशी उत्साह,जल्लोष आणि भक्तीचे वातावरण नागपूरकरांनी अनुभवले,गेल्या वर्षी जरी करोना महामारीमुळे शहरात रामनवमी ही सार्वजनिकरित्या जल्लोषात साजरी करता नाही आली तरी घराघरात रामजन्माचा उत्सव हा खासगीरित्या भाविकांनी साजरा केला मात्र या वर्षी तर रामनवमीला जेवढी निरांजने घराघरात देवघरासमारे तेवली त्यापेक्ष्ाही अधिक शहरातील दहनघाटांवर अग्नि धगधगला!
आपल्या भारतीय संस्कृतीत अंत्ययात्रेत जाणा-या प्रेतासमोर रामाचे नाव घेण्याची परंपरा आहे,रामा तुझेच नाव एकमेव खरे,बाकी हे जग मिथ्या,नश्वर असा भाव आणि असेच बोल अंत्ययात्रेत सहभागी असणा-यांचे असतात ’राम नाम सत्य है……!
आज रामनवमीच्या दिवशी नागपूर शहरातील विविध दहनघाटावरील भयाण वास्तव समोर आले .हे वास्तव भयाण आहे,भयंकर आहे, नि:शब्द करणारे आहे,करोना नावाच्या महामारीच्या या लाटेत कोणी गरीब नाही,कोणी श्रीमंत नाही,कोणी सवर्ण नाही,कोणी शुद्र नाही,भाषा,प्रांत,पंथाचे भेदभाव देखील नाही.करोना या विषाणूने एका झटक्यात संपूर्ण मानव जातीला एका समान रांगेत आणून टाकले.मग ती रांग खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी असो किवा दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी वाट बघण्याची असो!
एवढं मात्र खरं भगवान श्रीरामाचे नाव सत्य असले तरी प्रशासन हे मृतांच्या आकड्यांमधील ‘सत्य‘ हे लपवित असल्याची शंका आहे,आज ही नागपूर शहरात मृतांचा आकडा हा ९३ सांगितला जात असला तरी…..शहरातील संपूर्ण दहनघाटांवर आकडे मात्र वगेळे होते….फार फार वेगळे……!
मुंबई उच्च न्यायालयाने करोनाचे वार्तांकन संयमाने करा,अशी सूचना प्रसारमाध्यमांना केली आहे जेणेकरुन समाजात निराशा पसरु नये,मात्र प्रशासनच सत्य लपवित असेल तर माध्यमांचे हे कामच आहे आपल्या वाचकांसमोर सत्य काय आहे,ते मांडण्याचा प्रयत्न करने..नागपूर शहरात विविध दहनघाटांवरील असेच ’नग्न सत्य‘समोर आणण्याचा हा छोटासा ‘सत्ताधीश’चा प्रयास…..!
अनेक व्हिडीयोजमधील संभाषण हे तर टाईप करण्याच्या पलकडील होते एवढे….ते संवेदनशील मनाला नि:शब्द करणारे आहेत….सुजाण वाचकांनी रामनवमीच्या या पावन दिनी भगवान श्रीरामालाच आता साकडे घालावे,पुढल्या वर्षी पुन्हा तुझी शोभायात्रा गुलाल,संदल,बॅण्डबाजेसहीत शोभिवंत मखराच्या आरासमध्ये शहरातील रस्त्यावरुन जल्लोषात निघू दे…हा करोना जगातूनच नष्ट कर आणि अवघ्या मानवजातीचे कल्याण कर..कोणावरही ‘राम नाम सत्य है’म्हणायची वेळ येऊ देऊ नकोस रामा…..!आज ज्या घरातील जीव गेलेत त्यांना तर ना अंतयात्रा काढता आली… ना… तुझेच नाव सत्य आहे,हे सांगता आले….!
मी माझ्या वडीलांना कारमध्येच ऑक्सीजनवर ठेवलं.शहरात एका ही खासगी व सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नाही.कुठे आहे प्रशासन?प्रशासन शुन्य आहे…गाजावाजा केलेल्या हॉटेल्समधील कोविड सेंटरमध्ये नेले तिथे फक्त ऑक्सीजन उपलब्ध होते,डॉक्टर्स नाही,परिचारिकाही नाही,पुन्हा वडीलांना कारमधील ऑक्सीजनचा आश्रय!लावा ना हॉटेलवाल्यांन बेड्सच्या आकड्यासोबतच डॉक्टरर्सची यादी!एकेका रुग्णाला ५ रेमडिसीवीर गरजेचे असताना एक उपलब्ध होतं,बाकीसाठी वणवण भटकावं लागतंय,दीड लाखांपर्यंत रेमडिसिवीर ब्लॅकमध्ये विकल्या जातंय,‘सबने करोना का हंसी-मजाक बना दिया है!’अब बहोत ही लेट हो चूका है,सेन्सेक्स गिर गया,लोक घर में ही मर रहे है….सरकारने सबको आधार कार्ड और करोना पॉझिटीव्ह की रिपोर्ट देखकर फ्री में दवाईया उपलब्ध कराये,ये सरकार का काम है,हम क्यो इंजेक्शन के लिये अपना मरीज लेकर शहरभर और दर-दर घूमे?राम नाम सत्य है!
(योगेश अग्रवाल,तरुण उद्योजक)
आधी एक पॉझिटीव्ह आढळताच संपूर्ण ऐरिया तीन किलोमीटरपर्यंत सील केला जात होता.वो करोना २०२० का था,अब ये करोना नही है क्या २०२१ का?एक बेड पे ३-३ को सुला रहे है!इन्ही की बिमारी इन्ही को खा रही है….!ये करोना तो सरकारने हात की बनाई हूई बिमारी है,कल ये ही इस बिमारी को मिटा भी सकते है….!अपनी सरकार महाराष्ट्र मे बिठा देंगे,हो गई महामारी खतम!मोदी ने देश को बेच डाला,देश को छूडाना के लिये महामारी फैला दी,इतना कर्जा कर दिया है देश पर,अब महामारी के नाम पर भरपाई कर रहा है…..!राम नाम सत्य है!
खूपच डेंजर परिस्थिती है…..एकाच दिवसात ४०-४० बॉडीज कोविडची येऊन राहीली.कधी ४० कधी ५० एकेका घाटावर!प्रशासन मग कशाला आकडा लपवतेय?ते आम्हाला काही माहिती नाही,आम्ही सांगूनच राहीलो ना?हे माेजून घ्या..पूर्ण कोविडच्या बॉड्या आहेत…किती वाजेपर्यंत जळतील?काही गॅरंटी नाही…..!




आमचे चॅनल subscribe करा
