फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदहनघाटांवरील भीषण वास्तव:प्रशासन मृत्यूचे आकडे लपवित आहे!

दहनघाटांवरील भीषण वास्तव:प्रशासन मृत्यूचे आकडे लपवित आहे!

Advertisements

तरुण भावाचा व्हेंटिलेटर अभावी रविवारी मृत्यू:प्रशासनावर करणार गुन्हा दाखल

राष्ट्रनिर्माण संघटनेच्या निलेश नागोलकरांचा आरोप

नागपूर,ता.१९ एप्रिल: काल रविवार दि.१८ एप्रिल रोजी  राष्ट्रनिर्माण संघटनेचे अध्यक्ष् निलेश नागोलकर यांच्या ४६ वर्षीय भावाचा प्रमोद नागोलरक यांचा कराेनामुळे दूर्देवी मृत्यू झाला,सायंकाळी ७ वा.अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले असता घाटावर त्यावेळी जवळापास ७० शव जळत होते!अक्ष् र: शवांनाही अनेक तासांची वेंटिग भाेगावी लागत असून प्रशासन हे फक्त ८५ मृत्यू झाल्याचा दावा कसा करु शकते?शहरातील १८ दहन घाटांवर देखील हीच स्थिती असून मृत्यूचा आकडा प्रशासन लपवित असल्याचा खळबळजनक आरोप निलेश नागोलरक यांनी केला आहे.

नागोलर यांच्या म्हणण्याप्रमाणे अंबाझरी दहन घाटावर सायंकाळी ७ वा.सुद्धा शव ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती.७० लोकांची प्रेते एकसाथ जळत होती!मग प्रशासन हे रविवारी मृत्यूचा आकडा फक्त ८५ कशी सांगू शकते?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रशासन हे आपलं अपयश लपविण्यासाठी सर्रास खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय माझ्या  तरुण भावाला रेमडिसिव्हिरचे तीन इंजेक्शन देऊनसुद्धा वेंटिलेटर अभावी त्याचा काल दूर्देवी मृत्यू झाला.त्याला दोन  मुली असून एकीचे वय १५ वर्ष तर एकीचे फक्त १३ वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.मुर्दाड प्रशासनाने माझ्या वहीनीला विधवा बवनले असून दोन्ही मुलींना ज्या वयात वडीलांच्या प्रेमाची व आधाराची सर्वाधिक गरज होती त्याच वेळी फक्त वेंटिलेटर वेळेवर उपलब्ध न झाल्याने प्रमोद यांचा मृत्यू झाला.याला सर्वस्वी जवाबदार नागपूर महानगरपालिका,जिल्हा प्रशासन,शहरातील आमदार,खासदार व वैद्यकीय यंत्रणा असल्याचा आरोप करीत लवकरच या सर्वांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे निलेश यांनी खास ‘सत्ताधीश‘ला सांगितले.

माझ्या भावाला दूपारी ३.३० वा. नंदनवन येथील वेंटिलेटर उपलब्ध असणारे श्रावणी रुग्णालय उपलब्ध झाले ,यासाठी माझ्या मित्राने जीवाचे रान केले,मात्र दूपारी ३ वाजताच त्याची प्राणज्योत मालवली!जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले,तुमच्या रुग्णाला वेंटिलेटरची नितांत आवश्‍यकता आहे,तेव्हा त्या दीड तासात मी नागपूर शहरातील संपूर्ण खासगी व शासकीय रुग्णालयच नव्हे तर अमरावती,गोंदिया येथील रुग्णालयांतही वेड्यासारखे फोन फिरवलेत……माझ्या भावाच्या मृत्यूसाठीच नव्हे तर करोनामुळे वेंटिलेटर अभावी होणा-या नागपूर शहरातील प्रत्येक मृत्यूसाठी ही मुर्दाड शासकीय व राजकीय यंत्रणा जवाबदार असल्याचा आरोप निलेश यांनी केला.

माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षीच खासगी रुग्णालयांवर चांगला वचक निर्माण करुन शहरातील सर्वसामान्य नागरिकांना करोनाच्या भयंकर विळख्यातून वाचविण्यासाठी प्रभावी तयारी करुन ठेवली होती मात्र या शहराच्या खासदाराने केंद्रातील आपले वजन वापरुन त्यांची बदली केली,व शहरातील भाजपच्या सत्ताधा-यांना रान मोकळे करुन दिले.

आता सगळे आमदार व नगरसवेक तर आपाल्या घरी सुरक्ष्ति बसले आहेत शहरातील जनतेला मात्र रुग्णालयापासून तर दहनघाटांपर्यंत रांगेत उभे केल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.

कुठे आहे गडकरींचे २०० बेड?
गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे कँसर रुग्णालयात देखील भावासाठी फोन फिरवला मात्र तिथे ही बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले!सध्या फक्त २० बेड्सची सोय झाली असून पुढील आठवड्यात आणखी २० बेड्स नागरिकांना उपलब्ध हाेतील अशी माहिती सांगतात.मग गडकरीं यांना २०० बेड्सची लाल रिबिन कापण्याची इतकी घाई का झाली जर ते माझ्या भावाला त्या संस्थेत एक वेंटिलेटर वेळेवर उपलबध करुन देऊ शकले नाही?सर्वस्वी भाजपचे असणारे या रुग्णालयात संघाकडून फोन गेल्यावरच रुग्ण दाखल केले जातात का?असा उपरोधिक प्रश्‍न त्यांनी केला.गडकरींनी २०० बेड्सची घोषणा केल्याप्रमाणे या कँसर रुग्णालयातील कोविड वार्डात सर्वसामान्य नागपूरकरांना खरंच उपचार मिळणार आहे का?की संघासाठीच ते राखीव असणार?असा बोचरा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.संघाचा फोन गेल्याशिवाय एम्स आणि एमसीआरमध्ये बेड मिळत नसल्याचा जळजळीत आरोप निलेश यांनी केला.

माझ्या मित्राच्या सुशील मोरे यांच्या वहीनीचे देखील काल करोनामुळे निधन झाले मात्र त्यांचा ही मृतदेह मिळण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात लांब ‘वेटिंग’ होती.शेवटी एका नेत्याला फोन करावा लागला तेव्हा त्यांचे शव शवागारातून थोडे लवकर बाहेर पडले……!
करोना महामारीच्या काळात मरण फक्त आणि फक्त सामान्य माणसाचे असून शहरातील राजकीय नेत्यांनी तर चंद्रावर आधीच प्लॉट घेऊन ठेवले आहेत,आम्हाला श्‍मशान घाटावर ही आपल्या माणसाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ‘वेंटिंग’सहन करावी लागते?अशी बोचरी टिका त्यांनी केली.

हे संपूर्ण अपयश नागपूर महानगरपालिकेचे असून रुग्णांना जिवंतपणी वेळेवर ऑक्सीजन,वेंटिलेटर व रेमडिसिव्हिर तर ते देऊच शकत नाही मात्र मृत्यूनंतर देखील त्यांची इतकी पराकोटीची जी परवड होत आहे,यासाठी मनपाच्या प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करणार असल्याचे निलेश सांगतात कारण आम्ही स्वत:हून मरत नाही तर आमचा बळी घेतला जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
माझा भाऊ दीड तास मृत्यूशी झंुज देत होता…गडकरींनी मात्र वेंटिलेटर सर्वस्वी खासगी असणा-या दंदे रुग्णालयाला दिले..७५ लाखांचे हेच ५ वेंटिलेटर्स गडकरी यांनी दंदे ऐवजी मेडीकल किवा मेयोला दिले असते तर आज माझ्या भावाला आणि त्याच्यासारखेच काल दूर्देवाने करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांचे जीव वाचले असते….!त्यामुळेच माझ्या भावाच्या अंत्यविधीचे संपूर्ण सोपस्कार पार पडल्यानंतर मी १३ दिवसांनी या सर्वावर गुन्हा दाखल करणार असून न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

गडकरी यांच्या प्रयत्नातून आज भिलाईमधून १६ टन बेल्लारीतून ३६ टन ऑक्सीजन नागपूरात पोहोचले,याचे नक्कीच स्वागत आहे मात्र हे ऑक्सीजन तरी ख-या गरजूंना मिळणार आणि त्यांचे प्राण वाचणार आहे का?की पुन्हा याचेही वाटप शहरातील खासगी रुग्णालयांना व संघाच्या कँसर रुग्णालयालात केला जाणार आहे?असा सवाल त्यांनी केला.

नातेवाईक करतात फक्त अस्थि गोळा:राख अस्थि संकलन केंद्रात जमा
एकेका घाटावर एकसाथ ७०-८० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्यामुळे आणि एकेका मृतदेहाचे ७ ते ८ पोते राख निघत असल्याने संपूर्ण राख ही घाटांवरील ‘अस्थि संकलन केंद्रात‘जमा केली जाते,यानंतर ट्रकद्वारे तो इतरत्र पाठविला जाते..प्रत्येक मृतदेह हा थंड व्हायला ७ ते ८ तासांचा वेळ लागत असल्यामुळे नातेवाईक हे आता फक्त अस्थिच गोळा करुन उर्वरित विधीसाठी घेऊन जात असल्याचे विदारक दृष्य सध्या शहरातील संपूर्ण घाटांवर उमटत आहे.

गडकरी यांनी या संपूर्ण राखेचा उपयोग आता सिमेंट व डांबरी रस्ते व मोठमोठे पूल उभारण्यासाठी करावे अशी मागणी निलेश नागोलकर यांनी केली आहे.नागपूरातील प्रत्येक घाटावर दररोज अशी ८० ते ९० पोती राख निघत आहे,यातून शहराचा आणखी विकास त्यांनी करावा.या राखेतून विटा,गट्टू,डांबरी रस्ते बनवावे.गडकरी हे मूत्रापासूनही इथेनॉल तयार करु शकतात.गडकरी यांना साढे आठ हजार कोटींची नागपूर शहरात महामेट्रोची जास्त गरज होती,आता या मेट्रोमध्येच व मेट्रो स्टेशन्सवर गडकरींनी नागरिकांसाठी वेंटिलेटर्सचे बेड उपलब्ध करावे,असा संताप निलेेश यांनी व्यक्त केला.

(संपर्क क्रमांक-निलेश नागोलकर-९८२२७३९७३८)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या