फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशासनाचे दर १ एप्रिल पासून जाहीर:रुग्णांच्या बिलांची वसूली १५ दिवस आधीपासूनची!

शासनाचे दर १ एप्रिल पासून जाहीर:रुग्णांच्या बिलांची वसूली १५ दिवस आधीपासूनची!

Advertisements

खासगी रुग्णालयांची अशीही लृट..

नागपूर,ता. ३ एप्रिल: राज्य शासनाने खासगी रुगण्यालयांसाठी कोविड-१९ च्या उपचारासंदर्भात १ एिप्रल पासून दर निश्‍चित केले,खासगी रुग्णालयांना या पुढे रुग्णांकडून एका दिवसाचे ९ हजार रुपयांपेक्ष्ा जास्त पैसा वसूल करता येणार नाही मात्र हे दर १ एिप्रल पासून लागू झाले असले तरी खासगी रुग्णालये हे १० ते १५ दिवसांपूर्वीपासून उपचार घेणा-या रुग्णांकडून आधीचे दर अर्थात कुठे १५ हजार तर कुठे २२ हजार एका दिवसाचे वसूल करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

यावरुन रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयाचे व्यवस्थापक यांच्यात चांगलीच बाचाबाची सुरु झाली आहे.आधीच करोनाच्या मारेने पिचलेला नातेवाईक आपल्या माणसाच्या जीवन-मरणाला घेऊन चिंतित आहे त्यात खासगी रुग्णालये आकारत असलेल्या लाखो रुपयांच्या उपचाराच्या खर्चाची जमवाजमव करण्यात तो चांगलाच बेजार झाला आहे,आता शासनाने एका दिवसाच्या उपचाराचा खर्च ९ हजार निश्‍चित केल्यावर रुग्णाचे नातेवाईक याहून अधिक दर देण्यास नकार देत आहेत.

मात्र खासगी रुग्णालयांनी यातही ‘कट मनी‘कसा निर्धारित केला आहे याची यादी वाचून हे डॉक्टर आहेत की ‘सीए‘असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे.तुमच्या रुग्णाला दररोज ६ ऑक्सीजन सिलेंडर लावले जात आहे, एका सिलेंडरची किंमत १००० रु.याचा अर्थ दररोज फक्त ऑक्सीजन सिलेंडरचीच किमंत ६ हजार रुपये बिलमध्ये जोडल्या जात असल्याचा हिशेब सांगितला जात आहे!

याशिवाय तुमच्या रुग्णासाठी एक बाई लागते दररोज जेवण भरवण्यासाठी,याशिवाय दोन अटॅण्डेट आणि दाेन डॉक्टर रुग्णाला तपासतात,या सर्वांनाच पीपीई किट घालावी लागते.एका पीपीई किटची किंमत २५०० रुपये आहे,हाच खर्च जवळपास साढे बारा हजार रुपये दररोजचा आहे.याशिवाय ऑक्सीजन सिलेंडरच्या नळ्या व इतर साहित्य बदलावे लागते याचा खर्च दररोज ३ हजार रुपये येतो.यामुळे आमच्या रुग्णालयात दररोजचा दर रुग्णासाठी १५ हजार किवा २२ हजार रुपये असल्याचे बिल, रुग्णांच्या नावाने अनेक खासगी रुग्णालये सर्रास फाडताना दिसत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे एकच पीपीई किट घालून हे डॉक्टर्स किमान ८० रुग्णांना तपासतात तरी देखील प्रत्येकच रुग्णाच्या बिलामध्ये एकाच पीपीई किटचे बिल जोडल्या जात आहेत याचा अर्थ एका पीपीई किटची किंमत अडीच हजार सांगितली जात असली तरी ८० रुग्णांच्या बिलामध्ये ही किंमत जोडल्यास दोन लाख रुपये फक्त या पीपीई किटपासूनच खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांकडून ‘लृटत’असल्याचा गणितीय हिशेब समोर आला आहे!

एका रुग्णाने कामठी येथील नामांकित सिटी हॉस्पीटलमध्ये देखील अशीच लृट सुरु असल्याचे पुरावे पाठवले.या रुग्णालयात एका ७२ वर्षीय रुग्णाला लाखो रुपये भरल्यानंतर देखील अधिकचे सव्वा लाख न भरल्या गेल्यामुळे आयसीयूमधून चक्क केज्यूअलटीमध्ये पाठवून देण्यात आले व रुग्णाच्या मुलीला फोन करुन आपला रुग्ण घेऊन जाण्याचे सांगण्यात आले!२८ किलोमीटर दूर असणा-या या रुग्णालयातून रात्रीच्या ११ वाजता ७२ वर्षीय रुग्णाला कसे आणता येणार होते?

विशेष म्हणजे कामठी येथील सिटी हॉस्पीटलच्या दर्शनी भागावर दरफलक लागला असून त्यात तेथील तहसीलदारांचा  क्रमांक देखील देण्यात आला आहे.या क्रमांकावर वेगवेगळ्या वेळी अनेकवेळा कॉल केला असताना फोन बंद असल्याचे उत्तर मिळतं किवा बिझी असल्याचं उत्तर ऐकून घ्यावं लागतं.मग हा क्रमांक  फक्त जनतेच्या ‘मनाेरंजनासाठी‘देण्यात आला आहे का?असा संताप व्यक्त होत होता.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचा कोणताही वचक ग्रामीण भागात नसल्याचेच हे उदाहरण आहे.

विशेष म्हणजे आपल्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी या वयोवृद्ध रुग्णांजवळ मोबाईल देखील नसल्यामुळे आपल्या रुग्णासोबत रुग्णालयात नेमके काय घडत आहे?हे देखील कुटुंबियांना कळत नाही.आपल्या रुग्णाला रुग्णालयात नेमकी कोणती औषधे दिली जात आहेत?किती प्रमाणात दिली जात आहे?याचे कोणतेही उत्तर रुग्णालये हे कुटुंबियांना सांगत नाहीत.कुटुंबियांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता खासगी रुग्णालये हे परस्पर रुग्णांबाबत निर्णय घेऊन मोकळे होत आहेत.

अश्‍या अनेक अव्वाच्या सव्वा बाबी जोडून खासगी रुग्णालये हे लाखो रुपये करोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळत आहे.कामठीच्याच सिटी रुग्णालयात रुग्णाचे लाखो रुपये बिल भरण्यासाठी एक मध्यम वर्गीय व्यक्ति फोनवर अक्ष् र श: पाच टक्के अाणि दहा टक्के व्याजेवर पैसे मिळण्यास पलीकडील व्यक्तिला ‘याचना’करीत होता.त्याने देखील शासनाच्या दराप्रमाणे त्या रुग्णालयाला बिल काढण्यास सांगितले मात्र त्याला देखील या रुग्णालयाने ‘तुमचा रुग्ण आमच्याकडे १५ दिवसांपासून उपचार घेत आहे त्यामुळे बिल तर १५ दिवसांपूर्वीपासूनच्या दराप्रमाणेच भरावे लागेल’असे ठणकावून त्याला सांगण्यात आले!

मायबाप सरकारने दर निश्‍चिती करताना १ एप्रिल पासून दर तर लागू केले मात्र खासगी रुग्णालयांना अश्‍याप्रकारे सर्वसामान्य रुग्णांची ‘लृट’करण्यास रान ही मोकळे करुन दिले.शासन निर्देशात स्पष्टपणे याच दराप्रमाणेच आधीचे देखील बिल काढण्याचे कोणतेही बंधन खासगी रुग्णालयांवर नाही, त्यामुळे राज्य शासनाच्या सर्वसामान्य रुग्णांसाठीच्या दर निश्‍चितीचा कोणताही फायदा रुग्णाच्या नातेवाईकांना होताना दिसत नाही.

रुग्ण सारीचा सांगितले करोनाचा!
मानकापूर येथील कुणाल रुग्णालयात ९ दिवसांपूर्वी ८४ वर्षीय गावंडे नामक महिलेला उपचारासाठी भर्ती करण्यास घेऊन गेले असता,त्यांना न्यूमोनिया झाला असतानाही त्यांच्यात करोनाची माईल्ड लक्ष् णे असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले व उपचारासाठी भर्ती होण्याचा सल्ला दिला.त्या कुटुंबाला खासगी रुग्णालयाचे दररोजचे दर परवडणारे नसल्याने त्यांनी त्या महिलेला मेडीकलमध्ये भर्ती केले.मेडीकलमधील करोना चाचणीत गावंडे यांच्या अहवाल हा करोना निगेटीव्ह आला!दूर्देवाने डबल न्यूमोनियामुळे काल या महिलेचा मृत्यू झाला मात्र खासगी रुग्णालये हे त्यांच्या दारावर आलेल्या प्रत्येकच रुग्णाला करोनाचा रुग्ण ‘साबित’करुन बक्कळ पैसा लृटण्यासाठी कसे टपून बसले आहेत हे या घटनेवरुन सिद्ध होतं.

मात्र या रुग्णालयांवर माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे वचक बसला होता तो कुठेही पहायाला मिळत नाही.मनपाच्या प्रशासनाने व पदाधिका-यांनी सध्या ‘धृतराष्ट्र’ची भूमिका स्वीकारली असून अंधपणे सर्वसामान्यांची ही लृट बघितली जात आहे.मनपा प्रशासन,महापौर किवा संबंधित झोनचे अधिकारी,झोन सभापती,सहायक आयुक्त हे त्यांच्या हद्दीतील खासगी रुग्णालयांचा हिशेब तपासण्यास का कचुराई करीत आहे?यामागे कोणते आर्थिक हितसंबंध दडले आहेत?हे उघडपणे आता आम जनतेमध्ये बोलले जात आहे.

येरवी मास्क न घालणा-या किवा थोडासा जरी मास्क नाकाखाली सरकल्यास,खासगी प्रतिष्ठानांवर नियमांचा बडगा उगारुन जबर दंड वसूल करणारी मनपा खासगी रुग्णालयांच्या बाबतीत मात्र ‘अळीमळी‘गुपचूप गिळून बसली असल्याचाच संताप आता सर्वदूर व्यक्त होत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या