फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकोविड मृतदेह शवागारात:नातेवाईक उपाशी झोन गाडीसाठी दारात!

कोविड मृतदेह शवागारात:नातेवाईक उपाशी झोन गाडीसाठी दारात!

Advertisements

मनपा यंत्रणेचे‘ यांत्रिकी’ नियोजन:गजभिये कुटुंबियांवरील शोककळा कायम

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २७ मार्च: नागपूर शहरात कधी नव्हे अशी भयाण परिस्थिती कोविड-१९ मुळे कोसळली आहे,काल एकाच दिवसात ४७ करोना बाधितांचा मृत्यू झाला.३५ हजार सक्रिय रुग्ण आढळले.महत्वाचे म्हणजे यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असून त्यांना इतर ही आजार असल्यामुळे ते सहज करोना संसर्गाचे बळी ठरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी शासकीय मेडीकल रुग्णालयात ७२ वर्षीय हनुमंतराव गजभिये यांना दाखल करण्यात आलं होतं.चार दिवसांपूर्वीच त्यांना ताप आला होता,मात्र त्यांना घरीच औषधे देण्यात आली कारण शहरात कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी खाट मिळत नसल्याचे गजभिये कुटुंबियांनी ऐकले होते तसे ही खासगी रुग्णालयाचे दर परवडणारे नव्हते तर मेडीकल आणि मेयोमध्ये सर्वाधिक मृत्यूचा आकडा प्रसिद्ध होत असल्याने एकदा या शासकीय रुग्णालयात आपला माणूस भर्ती केल्यास ताे जिवंत परत येणार की नाही,याची चंागलीच धास्ती अनेकांनी घेतली आहे.

मात्र औषधाने देखील हनुमंतराव यांचा ताप न उतरल्याने शेवटी त्यांना दोन दिवसांपूर्वी मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची मेडीकलमध्ये काेविडची चाचणी करण्यात आली त्यात ते कोविड-पॉझिटीव्ह आढळले.काल रात्री साढे अकरा वा.दरम्यान त्यांचा दूर्देवी मृत्यू झाला.त्यांना चार मुली,दोन मुले,जावई,सूना असून हे सगळे रात्री संपूर्ण कागदोपत्री व्यवहार पूर्ण होईपर्यंत आपल्या लहानग्यांना घेऊन मेडीकलमध्येच घुटमळत होते.शेवटी रात्री अडीच वाजता. सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झालेत.हनुमंतराव यांचा मृतदेह मेडीकलच्या शवागारात ठेवण्यात आला.

गजभिये कुटुंबियांना तेथील कर्मचा-यांनी आज सकाळी १० वा.मृतदेह मनपाची झोनची गाडी सरळ मोक्ष् धामात घेऊन जाणार असल्याची माहिती दिली,परिणामी संपूर्ण कुटुंब हे सकाळी १० वा.मेडीकलच्या शवागारासमोर पोहोचले.दूपारचे ३ वाजले तरी त्यांच्या माणसाचा मृतदेह मात्र श्‍मशान घाटात पोहोचलाच नाही.

कोविड-१९ ने मृत पावलेल्या मृतकांना नागपूर महानगरपालिकेतर्फे सरळ श्‍माशान घाटांवर घेऊन जाण्याची जवाबदारी झोनस्तरावर सोपविण्यात आली आहे.दुपारचे तीन वाजले तरी हनुमान नगर झोनमधील गाडीचा पत्ता नव्हता.रणरणते ऊन,पाण्यासाठी व्याकूळलेले मन,करोनामुळे शवागाराजवळ कुठेही चहा-नाशत्याची सोय नाही,भूक,तहान आणि दू:खाने मानसिकरित्या कोसळलेले गजभिये कुटुंबिय हे वारंवार हनुमान नगर झोनमध्ये फोन लाऊन मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी केव्हा येणार याची विचारणा करीत होते. नेहरु नगर झोनमधील गाडीतून सात मृतदेह नेण्यात आले,इतर ही झोनमधील गाड्या येऊन मृतदेह घेऊन जात होते मात्र हनुमान नगर झोनमधील गाडीचा दूपारचे तीन वाजले तरी काहीच पत्ता नव्हता!

शवागारातील कर्मचा-यांचे ही एकच उत्तर मिळत होते ‘जोपर्यंत तुमच्या झोनची गाडी येेत नाही तोपर्यंत मृतदेह पाठविता येत नाही!’
‘सत्ताधीश‘ला ही माहिती मिळताच,झोनचे सहा.आयुक्त,उपाध्यक्ष्,झोन सभापती,मनपाचे अति.आयुक्त राम जोशी,मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.या सर्वांना फोन लावण्यात आला मात्र,सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने कदाचित मनपाची ही संपूर्ण यंत्रणा ‘सुटीवरच’असावी,कोणीही कॉल उचलला नाही.

यानंतर मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांना कॉल केला असता तात्काळ त्यांनी मृतकाचे नाव विचारले व शवागारात फोन करुन नातेवाईकांना धीर देण्यास सांगितले व झोनला फोन करुन त्वरित गाडी मागविण्यास सांगितले.

यानंतर अवघ्या काही मिनिटातच हनुमान नगर झोनची गाडी शवागारासमोर पोहोचली.मानेवाडा येथील श्‍मशान घाटात मनपा कर्मचा-यांनी हनुमंतराव गजभिये यांचा अंत्यसंस्कार केला.नातेवाईकांनी लांबूनच त्यांना अंतिम विदाई देत घराचा रस्ता धरला.गजभिये यांचे हे एकमेव प्रातिनिधिक उदाहरण नाही. संपूर्ण मनपा यंत्रणेनेच नागपूरकर जनतेला या भयंकर महामारीच्या काळात कसे वा-यावर सोडले आहे,याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे!

आज अनेक दू:खी,पीडीत नागपूरकर संकटाच्या या भयंकर समयी पत्रकारांकडे आशेने बघत आहे.पत्रकार हे देखील तेवढ्याच संवेदनशीलतेने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतो मात्र महामारीच्या या भयानक संकटाच्या काळात मायबाप सरकारने जी ‘सरकारी‘यंत्रणा उभारली आहे,ज्याचा सातव्या वेतन आयोगानुसार भरमसाठ पगार या यंत्रणेतील अधिकारी,कर्मचारी घेत आहेत ते बघता त्यांना या महामारीतूनही कर्तव्यांची आणि माणूसकीची जाणीव झाली असे म्हणने धाडसाचे ठरेल.

करोना बाधितांचे मृतदेह नेण्यासाठी तासनतास झोनच्या गाडीची वाट बघत,त्यांचे दू:खी,कष्टी आणि उधवस्त झालेल्या आप्त स्वकीयांना रणरणत्या उन्हात देखील कश्‍या पद्धतीने उपाशी-तापाशी चिमुकल्यांना घेऊन शवागारासमोर त्यांना उभी ठेवते याचे गजभिये कुटुंबिय हे ज्वलंत उदाहरण आहे.

नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत हे सध्या केरळमध्ये काँग्रेस पक्ष्ाच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांना मेडीकल,मेयोच्या शवागारासमोर भेसूर,उधवस्त माणूसकी बघण्यास वेळ नाही,माजी अामदार सुधाकर कोहळे यांच्या चार घर सोडून एखाद्या कुटुंबात काय घडत आहे,हे बघण्यास ते आता आमदार नसल्याने त्यांनाही रस वाटत नसावा.त्यांच्या सुविद्य पत्नी या तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या असून स्वयंसेवी संस्था चालवतात.त्यांना ही त्या कुटुंबियांच्या दू:खात काही तरी सामाजिक कार्य करण्याची उसंत मिळाली नसावी,याचा ही संताप आता व्यक्त होत आहे.

प्रभागातील नगरसेवक यांना तर गडरचे चेंबर,रसत्यांची कामे,पथ दिवे यासारख्या ‘कंत्राटीच्या ‘प्रश्‍नांशिवाय मनपाच्या सभेत जनतेच्या या अश्‍या मूलभूत आणि जगण्या मरण्यांची प्रश्‍ने उचलण्यात काही रस नाही,हे गेल्या मार्चपासूनच नागपूरकर बघत आहेत.

शेवटी सामान्य जनतेने पाहावे तर कोणाकडे?असा प्रश्‍न उपस्थित झाला असून ज्या चाईना मधून करोनाचे हे नवनवीन जीवघेणे स्टेन प्रसूत व प्रसारित होत आहेत, त्या चाईनानेच आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देशात व पालकमंत्री केरळमध्ये व्यस्त असल्यामुळे उतारा ही सांगावा,असे ही संतापाने बोलल्या जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या