फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआणि... मनपा सभेत श्‍वेता बॅनर्जी पदाधिका-यांच्या ‘टार्गेटवर’

आणि… मनपा सभेत श्‍वेता बॅनर्जी पदाधिका-यांच्या ‘टार्गेटवर’

Advertisements

एक साथ पाच विभागांचा भार एकाच अधिका-यावर कसा?पदाधिका-यांचा आक्ष्ेप

नागपूर,ता. २५ मार्च: शिक्ष् ण समिती सभापती दिलीप दिवे यांनी गुरुवारी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत त्रिशरण नगर ते जीवन छाया ले-आऊट(प्रभाग क्र.३७ ड)पर्यंत ट्रंक सिव्हर लाईनचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या कामासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला,११ कोटींचे हे काम असून संबंधित अधिकारी श्‍वेता बॅनर्जी यांनी या ठिकाणी वर्षभरात एकदाही येऊन पाहणी केली नसल्याचे महापौरांच्या निर्दशनास आणून दिले.यावर महापौर यांच्यासह इतर ही पदाधिकारी यांच्या ‘टार्गेटवरमनपातील कर्मठ व प्रामाणिक समजल्या जाणा-या महिला प्रशासकीय अधिकारी श्‍वेता बॅनर्जी आल्या,यावेळी त्यांच्या आयटीच्या ज्ञानावर देखील चांगलेच तोंडसुख घेण्यात आले.

श्‍वेता बॅनर्जी यांनी एकदा ही या ठिकाणची पाहणी का नाही केली,याचे महापौरांनी उत्तर मागितले असता माझ्याकडे आधीच पाच विभागांचे काम असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय झोनमधून अनेक विषय येतच रहातात,खूप काही शिल्लक काम राहतातच,असे समर्थन बॅनर्जी यांनी केले.यावर दिवे यांनी या कामाच्या भूगतानावर प्रश्‍न उपस्थित केला.यावर श्‍वेता यांनी मी कोणतेही भूगतान केले नसल्याचे सांगितले.

महापौरांनी बॅनर्जी यांना सदस्यांनी प्रश्‍न विचारला आहे त्याचे उत्तर देण्याची तुमची जवाबदारी आहे की नाही?असे ठणकावले.यावर बॅनर्जी यांनी माझी जवाबदारी आहे,असे उत्तर दिले.याचा अर्थ तुम्ही तुमच्या जवाबदारीचे पालन केले नाही हे सिद्ध होतंय,असे महापौर म्हणाले.यावर बॅनर्जी यांनी माझ्याकडे ५-६ विभागांचे काम आहे प्रत्येक ठिकाणी मी कशी जाईल?असा प्रतिप्रश्‍न केला.

यावर दिवे यांनी संपूर्ण महानगरपालिकेत एकट्या श्‍वेता बॅनर्जी याच सक्ष् म असल्याचा टोला हाणला.त्यामुळेच त्यांच्याचकडे एवढे विभाग सोपवले जातात,यावर बॅनर्जी म्हणाल्या,माझ्याचकडे का सोपवले जातात याचे उत्तर मी कसे देणार?आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे असे महापौरांनी निर्देश दिल्यावर आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी तालेवार यांच्याकडे हा विभाग देण्यात आला असून ते करोना पॉझिटीव्ह आहेत,ही सर्व जुनी कामे आहेत,या कामांचे भूगतान ही झाले आहेत मात्र काम समाधानकारक झाले नाही,याची शहनिशा आधी करावी लागेल,तालेवार कामावर परत रुजू झाल्यावर श्‍वेता व तालेवार हे संयुक्तपणे काम बघतील असे सभागृहाला सांगितले.

यावर सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी एकट्या बॅनर्जी मॅडमवरच एवढा ओवरलोड कसा?काही विभाग कमी का करीत नाही?असा प्रश्‍न उपस्थित केला.यावर आयुक्त यांनी आधीच त्यांच्याकडचे विभाग कमी करण्यात आले,लोड कमी झाले असल्याची माहिती दिली.यावर अविनाश ठाकरे यांनी श्‍वेता बॅनर्जी यांना कोणत्या कामासाठी मनपात पाठवले?असा प्रश्‍न उपस्थित केला.बॅनर्जी यांनी पाणी पुरवठासाठी असे उत्तर दिले.यावर त्यांचे पद कोणते?असा प्रश्‍न त्यांनी विचारला?यावर कार्यकारी अभियंता जलप्रदाय,असे उत्तर बॅनर्जी यांनी दिले.
यावर ठाकरे यांनी मी प्रश्‍न उपस्थित करत नाही मात्र आय.टी. विभागाची पण जवाबदारी त्यांच्याचकडे असून,त्याच सामाजिक यांत्रिकी विभाग ही बघतात,मधला काही काळ त्यांनी वित्त विभागात देखील काम केले,मनपात अनेक वर्षांपासून इतर ही अतिशय सक्ष् म अधिकारी आहेत त्यांना डावलून बॅनर्जी यांना एवढ्या महत्वाच्या विभागातील काम का देण्यात आले?प्रशासनाची भूमिका काय?असा प्रश्‍न उपस्थित केला.यावर मी कधीही वित्त विभागात काम केले नसल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

यावर तुमच्याकडे आय.टी.चा देखील अतिरिक्त प्रभार आहे आय.टी.ची कोणती पात्रता पदवी तुमच्याकडे आहे अशी विचारणा केली?यावर श्‍वेता बॅनर्जी यांनी माझ्याकडे आय.टी.ची शैक्ष् णिक अहर्ता नसल्याचे सभागृहाला सांगितले.म्हणूनच अद्याप आतापर्यंत आम्ही शालेय विद्यार्थ्यांना टॅब देऊ शकलो नसल्याचे महापौर यांनी कोटी केली.

यावर टॅबचे वाटप हे माझ्याकडे नसल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.हा मनपाचा आय.टी.विभाग जेव्हा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्माण केला तेव्हा त्यांनीच बॅनर्जी यांची त्या विभागात नेमणूक केली याचे अाणखी एक कारण म्हणजे अधिका-यांची कमतरता असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी बॅनर्जी यांच्यात आय.टी.ची पात्रता नसल्यानेच दरवेळी आमच्या ऑन लाईन सभेचा बोजवारा उडतो,यांच्यात ती तांत्रिकी पात्रताच नाही त्यामुळेच आमचा आवाज नीट पोहोचत नाही,मागच्या काळात बॅनर्जी यांच्यावर चुकीची जवाबदारी सोपविण्यात आली त्या करु शकतील म्हणून,त्यांच्यावर प्रशासनाला भरोसा असेल मात्र मनपाला नाही.ज्यांची कोणती पात्रताच नाही त्यांच्यावर जवाबदारी सोपविण्यात आली.मी पाहणीसाठी गेलेच नाही,असे त्या सरळ निवेदन पटलावर ठेवतात!असा संताप महापौरांनी व्यक्त केला.

मी स्थायी समितीचा अध्यक्ष् असताना पोहरा नदीच्या काठावरील नागरिकांनी कूलर ऐवजी त्यांच्या घरात एसी बसवलेत.याचे कारण विचारले असता कूलरच्या वा-यासोबत नदीतील घाणेरडा वास घरात शिरतो ,असे नागरिकांनी सांगितले.त्या पोहरा नदीत संपूर्ण सिवरेज नागपूर सुधार प्रन्यासने नेऊन सोडला,परिणामी नवीन सिवरेज लाईन टाकण्याच्या कामांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी दिली,पैसे ही दिले.सिवरेज ही प्राथमिकता नाही का?ज्यांना ती वाटत नसेल त्यांच्यावर कारवाई हाेणे आवश्‍यक असल्याचे महापौरांनी बॅनर्जी यांना ठणकावले.

मुख्य अभियंता,स्थापत्य समितीचे अध्यक्ष् व आयुक्तांच्या समितीने अहवाल यावर सादर करावा,कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे हा काही उपाय होऊ शकत नाही.त्यांच्याकडून पूर्ण काम करवून घ्या,असे निर्देश महापौरांनी दिले.

थोडक्यात आज संपूर्ण महानगरपालिकेत अतिशय कर्मठ,कामसू,प्रामाणिक व स्पष्टवकत्या म्हणून परिचित व प्रसिद्ध असणा-या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी यांच्यावर मनपाच्या सर्वसाधारण सभेत महापौर व पदाधिका-यांनी चांगलाच रोष काढल्याची चर्चा सभेनंतर रंगली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या