

खंडपीठाच्या तिन्ही न्यायमूर्तींचे मत :भाजप नगरसेविका प्रगती पाटील प्रकरण
नागपूर,ता. २४ मार्च: निवडणूक जिंकण्यापूर्वी उमेदवाराच्या पती किवा पत्नीने किंवा त्यांच्यावर अवलंबून असणा-यांनी अनाधिकृत बांधकाम केल्यास तो उमेदवार महापालिका कायद्याच्या कलम १२ अंतर्गत अपात्र ठरतो,तथापि,या परिस्थितीत महापालिका अायुक्त सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हे प्रकरण दिवाणी न्यायालयाकडे पाठवू शकतात,असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या तीन न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष्ाच्या नगरसेविका प्रगती पाटील यांच्या घराचे बांधकाम अनिाधिकृत असून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे,अशी विनंती करणारी याचिका तिलोत्तमा किनखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.
प्रगती पाटील यांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन अनाधिकृत बांधकाम केले आहे.त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम १२ अन्वये त्यांना अपात्र ठरविण्यात यावे,अशी विनंती त्यांनी केली होती.या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन ही दिले होते.पण कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
सर्व पक्ष्ांची बाजू ऐकल्यानंतर न्या.सुनील शुक्रे व न्या.अविनाश घारोटे यांनी,नगरसेवक पदी निवडून येण्यापूर्वी अनाधिकृत बांधकाम करीत असेल तर त्या उमेदवाराला अपात्र ठरविता येऊ शकते का?पूर्वीचेच बांधकाम करण्यात आले असेल व ती संपत्ती नगरसेवक असताना किवा निवडून येण्यापूर्वी कुणी विकत घेतली असेल तर ते बांधकाम अनाधिकृत समजावे का?तसेच अश्या प्रकरणात महापालिका आयुक्त किवा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का?असे प्रश्न उपस्थित करुन तीन न्यायमूर्तींच्या पूर्ण पिठाकडून मत मागविले होते.
त्यानंतर न्या. झ.का. हक,न्या.अमित बोरकर व न्या.विनय देशपांडे यांनी सर्व पक्ष्ांची बाजू ऐकल्यानंतर निवडणूक जिंकण्या आधी अनाधिकृत बांधकाम करणे किवा विकत घेण्याच्या परिस्थितीतही नगरसेवक अपात्र ठरवला जाऊ शकतो,असे मत व्यक्त केले.
परिणामी, आधी राष्ट्रवादी पक्ष्ात असणा-या व आता भारतीय जनता पक्ष्ाच्या नगरसेविका असणा-या प्रगती पाटील यांच्यावर,वन विभागाची जमीन लाटल्याप्रकरणी न्यायालयातर्फे, पक्ष्ातर्फे,मनपा आयुक्तांतर्फे व स्थायी समितीतर्फे काय कारवाई होते याकडे आता जनतेचे लक्ष् लागले आहे.नगरसेविका प्रगती पाटील यांचे पती अजय पाटील हे गिरीश गांधी यांच्या ‘वनराई’संस्थेमध्ये अतिशय जवाबदार अश्या उपाध्यक्ष् पदावर राहीले असून,वन विभगाच्या जमीनीशी तेव्हाच त्यांचा संबंध आला असल्याचे बोलले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
