परमबिरसिंह यांच्या आधी सुबोध जायसवाल यांचा ही गृहमंत्र्यांच्या विरोधात अहवाल
गृहमंत्र्यांनी राजीनामा देईपर्यंत भाजपचे आंदोलन:पत्र परिषदेत दिला इशारा
नागपूर,ता. २१ मार्च: आज दिल्ली येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्र परिषद घेतली. त्यात पवारांनी अर्धसत्य सांगितले,परमबिरसिंग यांच्या अध्यक्ष् तेत पार पडलेल्या बैठकीत सचिन वाझे यांची पुर्ननियुक्ती झाली असे ते म्हणाले मात्र हे अर्धसत्य असून वाझे यांची पुर्ननियुक्ती करण्याचे आदेश परमबिरसिंग यांना कोणी दिले होते?असा प्रश्न माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवार दि. २१ मार्च रोजी नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत उपस्थित केला.
शरद पवार हे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फडणवीस हे म्हणाले.परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना लिहलेल्या १२ पानी पत्रात व्हॉट्स ॲप चॅटचे पुरावे देखील दिले, एवढ्या महत्वपूर्ण पुराव्यांकडे दूर्लक्ष् कसे करता येईल?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.पवार यांनी या घटनेची चौकशी माजी पोलीस महासंचालक ज्यूलियो रिबेरो यांच्याकडून करणार असल्याचे सांगितले.रिबेरो हे अत्यंत अनुभवी असून त्यांच्याविषयी आमच्या मनात आदरच आहे मात्र गृहमंत्री अनिल देशमुख हे पदावर असताना अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले व ज्येष्ठ वयोवृद्ध रिबेरो हे त्यांची चौकशी करु शकतील का?अशी चौकशी होऊच शकत नाही,त्यामुळे देशमुख यांनी राजीनामा दय्ावा,आमची मागणी असल्याचे फडणवीस म्हणाले.
एखादा पुरावा घटनेनंतर निर्माण झाला असेल तर समजू शकतो मात्र हे व्हॉट्स ॲप चॅट घटनेपूर्वीचेच साक्ष्ीदार आहेत.त्यामुळे पवार यांची आजची पत्र परिषद म्हणजे ‘पापावर पांघरुण घालण्याचा प्रकार’असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.त्यामुळेच आमची स्पष्ट मागणी आहे या संपूर्ण प्रकरणात जवाबदारी निश्चित झालीच पाहिजे.गृहमंत्री यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करा.
महाराष्ट्र राज्याचं गृहविभाग कोण चालवतोय?अनिल देशमुख की अनिल परब?परब हे गृहविभागाच्या प्रत्येक बैठकीत कसे सहभागी होतात?असा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादीचे अनेक नेतेच शिवसेच्या मोठया प्रमाणात होणा-या हस्तक्ष्ेपाविषयी बोलतात.त्यामुळेच पोलीस विभागात या नियुकत्या नेमक्या कोणी केल्या?या नियुक्त्यांमागील भूमिका ही स्पष्ट झाली पाहीजे,असे ते म्हणाले.
याशिवाय वाझे यांच्याकडे एवढ्या गाड्या कूठून आल्या?असा सवाल करीत या सर्व गाड्या ६-७ महिन्यांपूर्वी नेमक्या कोणाकडे होत्या?याची देखील चौकशी झाली पाहिजे.जोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणा-यांचा छडा लागत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष् हे आंदोलन करीत राहणार असल्याचे आमचे पक्ष्ाध्यक्ष् चंद्रकांतदादा पाटील यांनी आज इशारा दिलाच असल्याचे फडणवीस म्हणाले.
पवार यांची पत्र परिषद ऐकून आश्चर्य वाटले असल्याचे फडणवीस म्हणाले.पवार हे सरकारचे निर्माते आहेत त्यामुळेच आपलं सरकार कसंही वागलं तरी त्यांना समर्थन देण्याची भूमिका पवार यांना घ्यावीच लागेल,असे फडणवीस म्हणाले.पवार यांनी आज पत्र परिषदेत वाझे यांना परमबिरसिंह यांनीच पुर्ननियुक्त केल्याचा दावा केला मात्र १६-१७ वर्षे निलंबित असणा-या एका पीआए दर्जाच्या पोलिस विभगातील व्यक्तिला एवढ्या महत्वाच्या जागेवर पुर्ननियुक्ती देताना काही नियम व कायदे असतात,हे नियम मुख्यमंत्री किवा गृहमंत्र्यांना माहीती नव्हते का?हे सरकार वाझे यांना पुर्ननियुक्त करताना झोपले होते का?असा घणाघात याप्रसंगी फडणवीस यांनी केला.एवढंच नव्हे तर वाझे यांना नियुक्त झाल्याबरोबर अतिशय महत्वाच्या प्रकरणांचा तपास ही त्यांच्याचकडे का देण्यात आला,असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.
पत्र परिषदेला माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, आमदार कृष्णा खोपडे,आ.गिरीश व्यास,आ.मोहन मते,आ. प्रवीण दटके,महापौर दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.
परमबिरसिंह पूर्वीच सुबोध जायसवाल,रश्मी शुक्ला यांनीही गृहमंत्र्यांच्या विरोधात दिला होता अहवाल!
एंटिलियासमोर स्फोटके ठेवण्याप्रकरणी वाझे यांना अटक झाल्यानंतर व दररोज विविध खुलासे होत असताना काल मुंबईचे पोलिस आयुक्त व महासंचालक परमबिरसिंह यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व राज्यपालांकडे जो खुलासा केला तो धक्कादायक हाेता मात्र असा धक्कादायक खुलासा करणारे परमबिरसिंह हे काही पहीले व्यक्ति नाही,अशी विधान फडणवीस यांनी केले.
यापूर्वी देखील तत्कालीन पोलीस महासंचालक सुबाेध जासयवाल यांनी या संदर्भात एक अहवाल राज्य सरकार,मुख्यमंत्र्यांना सादर केला.यात पोलिस विभागातील बदल्या,पैश्यांची देवाण-घेवाण,दलाली,राज्यकर्त्यांचा हस्तक्ष्ेप इ.बाबत संपूर्ण तपशील होता.तो अहवाल कमिश्नर ऑफ इंटलिजेंसच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना गेला,मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तोच अहवाल गृहमंत्र्यांकडे गेला मात्र काय कारवाई झाली?एक प्रामाणिक अधिकारी आपली बदलीच करुन केंद्रात सेवेसाठी निघून गेला,असे फडणवीस म्हणाले.दोन वर्ष ते या महत्वाच्या पदावर होते,मात्र पोलिस विभागातील एवढे महत्वपूर्ण प्रकरण मुख्यमंत्र्यांसमोर आणले तरी मुख्यमंत्री यांनी साधी चौकशीसुद्धा लावली नाही!
रश्मी शुक्ला या इंटलिजेंस खात्यातील पी.जी यांनी फार मोठं रॅकेट कसे काम करीत आहे हे दर्शवणा-या आपल्या अहवालात वारंवार गृहखाते व गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख केला होता,याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशाप्रमाणे फोन सर्विलेंसची परवानगी घेतली,त्यात जे संभाषण आहे ते धक्कादायक असल्याचे फडणवीस म्हणाले.ज्यांची नावे त्या अहवालात आली त्यांनाच या सरकारने पोलिस विभागात महत्वाच्या पदावर बसवले असा आरोप फडणवीस यांनी केला.
मात्र पवार हे परमबिरसिंह यांची बदली केल्यामुळे असा आरोप परमबिरसिंग करीत असल्याचे सांगतात मात्र सुदीप जायसवाल व रश्मी शुक्ला यांच्या बदलीविषयी काय?असा सवाल फडणवीस यांनी केला.
पवार हे ज्याप्रमाणे हे सरकार वाचवण्यासाठी समोर आलेत ते बघून महाभारतातील ‘नरो वा कुंज नरोवा’ची आठवण येते,अश्वथामा हा हत्ती की माणूस मेला,असा तो प्रकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.वाझे यांची पुर्ननियुक्ती ही सरकारच्या आर्शिवादानेच झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.पवार स्वत: पत्र परिषदेत परमबिरसिंह यांच्या पत्रात फार ‘गंभीर’आरोप होते हे मान्य करतात मग या प्रकरणाचं गांर्भीय त्यांना का समजत नाही?असा सवाल त्यांनी केला.
न्यायालीयन चौकशी व्हावी-
या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी या प्रसंगी फडणवीस यांनी केली.न्यायालयीन चौकशीतूनच ‘दूध का दूध और पानी का पानी’ होणार नाही तोपर्यंत या ‘वसूली सरकार’च्या विरोधात भाजप आंदोलन करेल,असा इशारा फडणवीस यांनी दिला.
परमबिरसिंह यांच्या या पत्रामागे विश्वासहर्तेचा प्रश्ना नाही का?यावर बोलताना नोकरीवर असणारा एक डी.जी रँकचा अधिकारी गृहमंत्र्यांच्या विरोधात एवढा गंभीर आरोप करतोय,ते ही व्हॉट्स ॲप्सचे पुरावे जोडून मग एवढी गंभीर बाब आम्ही सोडून देऊ का?असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला.
मनसेनेते राज ठाकरे यांचा उल्लेख करताना,स्वत: राज ठाकरे यांनी आज पत्र परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्राने करण्याची मागणी केली असून त्या चौकशीतून अनेक फटाके फूटतील,असा योग्य सूतोवा केला असल्याचे फडणवीस म्हणाले.पण मी अशी मागणी केली तर माझ्यावरच आरोप होतील
शिवसेना नेते संजय राऊत यांचे सकाळीच विधान मी ऐकले आहे त्यांनी योग्य विधान केले असून खरंच या सरकारने आता आत्मचिंतन करावे असे फडणवीस म्हणाले.या सरकारने आपली विश्वासहर्ता पुरती गमावली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

आमचे चॅनल subscribe करा