फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआणि...गडकरी यांनी टोचले महापौरांचे कान!

आणि…गडकरी यांनी टोचले महापौरांचे कान!

Advertisements

‘रामराज्यासाठी ‘आधी मनपातला भ्रष्ट कारभार करा दूर

नागपूर,ता. १३ मार्च: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकवेळा अडचणीत आले आहे मात्र तरीही ते जेव्हा बोलायला बसतात तेव्हा सारगर्भित बोलत असतात,आज देखील फॉरच्यून फाऊंडेशनच्या यूथ एम्पावरमेंट समिटच्या उद् घाटनाप्रसंगी गडकरी यांनी महापौर यांच्या ऑन लाईन भाषणानंतर मनपातील भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांचे चांगलेच कान टोचले.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वे वर्ष अर्थात अमृत महोत्सवी वर्षात मां जिजाऊ यांच्या नावाने दुर्बळ घटकातील महिलांसाठी अनेक योजना राबविणार असल्याचा सूतोवाच केला.मनपा मुख्यालयात एकाच छताखाली महिलांना प्रशिक्ष् ण ,मार्गदर्शन आणि रोजगार देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

महापौरांच्या या वक्तव्याचा ही संदर्भ आपल्या ऑन लाईन भाषणात गडकरी यांनी नंतर घेतला व मनपामध्ये व्याप्त भ्रष्टाचार आधी दूर करा अशी कानटोचणी केली.महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिकेत रामराज्य आणण्याचा सूतोवा केला आहे मात्र हे करण्यासाठी आधी त्यांना महानगरपालिकेत व्याप्त भ्रष्ट कारभार आधी निखंदून काढावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष् इशारा त्यांनी दिला.

महापौर यांनी मनपात रामराज्य प्रस्थापित करण्याचं ठरवलं आहे मात्र त्यासाठी आधी मनपा ही भ्रष्टाचारमुक्त करावी लागणार आहे,नागपूरला स्वच्छ,सुंदर आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी मनपाला प्रयत्न करावे लागेल.विकासामुख प्रशासन करावं लागेल,लोकांना त्रास ‘न ’ होणारं प्रशासन राबवावं लागेल, नागपूरच्या इतिहास आणि संस्कृतीचं जतन करणं आणि दुसरीकडे आर्थिक विकासासाठी प्रगती आणि प्रयत्न करणे हेच रामराज्याच्या स्थापनेसाठी आवश्‍यक असल्याची कानटोचणी त्यांनी आपल्या भाषणात केली.

नुसतं भाषण देऊन चालणार नाही तर प्रत्यक्ष् कृती करावी लागेल. मी नेहमी आमदारांना,कार्यकर्त्यांना सांगत आलो आहे आपण जे बोलत असून त्याच्या दहा पटीने काम करीत असू तरच आपल्याला बोलण्याला अर्थ प्राप्त होतो.फक्त बोलत राहू आणि कृती मात्र करणार नाही तर आपल्या बोलण्याला काही अर्थ नसल्याचे गडकरी हे म्हणाले.

विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षांच्या भाजपच्या मनपातील सत्ताधा-यांच्या एकंदरित कारभाराबद्दल गडकरी हे वेळोवेळी उघडपणे आपल्या भाषणात बोलत आले आहेत मात्र सत्ताधारी हे गडकरी यांच्या विधानांना निवडणूकीला आता काही महिनेच शिल्लक राहीले असताना किती गांर्भीयाने घेतात,हे येणारा काळच सांगू शकेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या