Homeनागपूर न्यूजराजकारण मुळीच आवडत नाही! काय म्हणतात महापौरांच्या पत्नी?

राजकारण मुळीच आवडत नाही! काय म्हणतात महापौरांच्या पत्नी?

(जागतिक महिला दिन विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ८ मार्च २०२१: शहराचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांच्या सोबतीने सुख:दु:खाचा,संघर्ष,यश-अपयशाचा संसार सांभाळणा-या त्यांच्या शिक्ष्ि का असणा-या सुविद्य पत्नी आशा दयाशंकर तिवारी या मूळात आहेत तरी कश्‍या?त्यांचे विचार,स्वभाव,जीवनमान याची माहीती करुन घेण्याची अनेक नागपूरकर नागरिकांनाही उत्सुक्ता होती,जागतिक महिला दिनी खास ‘सत्ताधीश’ने त्यांना ही संधी उपलब्ध करुन दिली.

आशा दयाशंकर तिवारी यांचे माहेर हे मूळ सौंसर,जि.छिंदवाडा येथील असून त्यांच्या माहेरचे आडनाव ‘दुबे’आहे.आईचं माहेर नागपूरातील हंसापूरी येथीलच असल्यामुळे दयाशंकर तिवारी यांचे स्थळ त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनीच सुचवले.याशिवाय ‘तिवारी’ आडनावाच्याच एका दुस-या नातेवाईकांने देखील या स्थळावर शिक्कामोतर्ब करा म्हणून सांगितले त्यामुळे हा संयोग जुळून आला.

त्या नातेवाईकाचे शब्द होते ‘ये इंसान, इंसान के रुप में भगवान है’त्यांचे हे शब्द हे अगदी खरे निघाले.मी जशी सौंसरमध्ये घरातील लाडकी लेक होते तशीच मी ‘तिवारी‘यांच्या घरी देखील लेक म्हणूनच गेल्या १३ वर्षांपासून नांदले आणि नांदत आहे.

तिवारी यांच्यात नेमके काय आवडले? राजकारण आवडतं का?ते राजकारणात आहेत हे माहिती होते का?या प्रश्‍नांबाबत सांगताना ‘राजकारण मुळीच आवडत नाही!’अश्‍या ठामपणे त्या म्हणाल्या.मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून त्यांच्यापासून मी संतुष्ट आहे.आता महापौर झाल्यामुळे ते जास्त वेळ देऊ शकत नाही मात्र जेवढा पण वेळ देतात,कुटुंब म्हणून आम्ही संतुष्ट होऊन जातो.

थोड्यामध्ये खूप काही देण्याची कला ही तर त्यांच्याकडून शिकावी,असे त्या सांगतात.मला दोन मुले आहेत एक मुलगी आणि एक मुलगा.मुलगा ‘अथ‘ आणि मुलगी ‘इति’या दोघांचा अर्थ होतो ‘अतिथी’त्यामुळे आमच्या घरात सतत अतिथींचा राबता असतो.माझ्या नव-याचे संस्कृतवर अतिशय प्रेम त्यामुळे त्यांनी मुलांची नावे ही संस्कृत अर्थ असणारीच ठेवली.

दोन्ही मुले लाडकी असली तरी मुलीशी त्यांना जास्त जिव्हाळा आहे.किती ही उशिर झाला तरी तिच्याशी बोलल्याशिवाय ते झोपत नाही.
वर्धमान नगरच्या व्हीएमवी महाविद्यालयात मी हिंदीची शिक्ष्किा आहे,माझं सुरवातीपासूनच शिक्ष्किा होण्याचे स्वप्न होतं.सौंसरमध्ये ही मी नोकरी करायचे .लग्नापूर्वीच दयाशंकर यांना देखील माहिती होते मी नोकरी करणार आहे.माझं सासर हे खूप खुल्या विचारसरणीचे आहे.मला दोन दीर असून त्यांच्या पत्नी देखील नोकरी करतात.आम्हाला आमच्या सासूचा नेहमीच पाठींबा मिळाला.आज त्या नव्वदी पलीकडे आहे,आम्ही तिन्ही सूना त्यांच्या वेळा सांभाळून आपापली नोकरी करतो.संयुक्त कुटुंबात हाच आधार खूप महत्वाचा असतो.

आयुष्यात सर्वात सुखाचा क्ष् ण कोणता?याबाबत सांगताना ‘यांचे महापौर बनणे’असे एका क्ष् णात त्यांनी सांगितले.अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी हे पद प्राप्त केले असल्याचे त्या म्हणाल्या.तो क्ष् ण खूप आनंदाचा होता,मी तो नेहमीसाठी डोळ्यात साठवून ठेवला असल्याचे त्या सांगतात.

जिवनात दु:खाचा क्ष् ण कोणता आठवतो?या प्रश्‍नावर बोलताना २०१० साली दयाशंकर यांना उमळलेला भयंकर मुळव्याधीचा त्रास हा असहनीय होता.काही केल्याने ते शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते.जवळपास दोन महिने त्यांनी खूपच त्रासात काढले मात्र शेवटी डॉ.गुप्ता यांच्याकडून शस्त्रक्रिया करुन घेतली,योग्य उपचार घेतले,त्यांचा त्रास मला ही बघवत नव्हता,असे त्या सांगतात.
महापौर झाल्यानंतर काय बदल झाला?यावर बोलताना ‘पहले व्यस्त रहते थे…अब बहोत ज्यादा व्यस्त रहते है’असे त्या हसत सांगतात.मात्र कुटुंबात कोणालाही गरज पडली की ते तात्काळ हजर राहतात,फक्त आमच्यासाठीच नाही तर त्यांच्या बहीणींसाठी देखील ते उपलब्ध असतात.

महिला दिनाच्या निमित्ताने काय संदेश द्याल?यावर बोलताना प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर झाले पाहिजे.मी २००० साला पासून नोकरी करीत आहे.नोकरीमुळे आत्मविश्‍वास वाढतो.स्वत:चं व्यक्तिमत्व घडतं.फक्त पुरुषांच्या यशामागे महिलांचा हात असतो ही ऐकेरी म्हण आहे,महिलेच्या यशामागे देखील पुरुषाचा तेवढाच महत्वाचा वाटा असतो,हे समजून घ्यायला पाहिजे.

माझे जिवनाचे लक्ष् हे शिक्ष्किा व्हायंच होतं,पुरुष म्हणून आधी वडीलांनी तर पती म्हणून दयाशंकर तिवारी यांनी मला माझे लक्ष् मिळून देण्यात मदत केली.

Latest बातम्या