

स्थायी समिती अध्यक्ष् पदाचा स्वीकारला पदभार
नागपूर,ता. ८ मार्च: राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे गुंठेवारी आता पुन्हा नागपूर सुधार प्रन्यासकडे परत गेली.मला शहरातील अनेक बिल्डर्सने वैयक्तिकरित्या सांगितले आहे की त्यांना महानगरपालिकेपेक्ष्ा नासुप्रची गुंठेवारीची पद्धत जास्त योग्य वाटते.नगररचना विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आधीच मनपाचे कोट्यावधी रुपयांची महसूली बुडाली असून ‘अभय योजनेचाही’लाभ नागरिकांनी घेतला नसल्याचे निर्दशनास आले,या पुढे कर वसूलीसाठी कठोर पाऊले उचलली जाणार असून कर न भरल्यास नागरिकांची मालमत्ता ही जब्त केली जाईल,असा कडक इशारा नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष् प्रकाश भोयर यांनी मनपा मुख्यालयात पदग्रहण समारंभानंतर आयोजित पत्र-परिषदेत दिला.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष् पिंटू झलके व सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे उपस्थित होते.यावेळी बोलताना भोयर हे म्हणाले की,माझ्या स्वत:च्या लक्ष्मीनगर झोनमध्ये अनेक प्लाॅट्सचा लिलाव झाला आहे.नगर रचना विभागातर्फे जास्तीत जास्त उत्पन्न यायला हवे होते.कर वसूली ही ३०० कोटींपर्यंत न्यावीच लागणार आहे.ज्या प्रमाणे विज बिल न भरल्यास विज कापली जात आहे त्याच धर्तीवर आत नागरिकांनी कर न भरल्यास त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल.विज बिल कापली जात असल्यामुळे पैसे भरावेच लागतात यासाठी आता लोकं जागरुक झाले असल्याचे ते म्हणाले.
भोयर यांचे हे विधान पक्ष्ा साठी अडचणीचे ठरणार असल्याची जाणीव होताच सत्ता पक्ष् नेता अविनाश ठाकरे हे त्यांच्या मदतीला धावले.सारवासारव करीत भोयर यांच्या या विधानाचा अर्थ शब्द: न घेता विज बिल हा वेगळा विषय असल्याचे ते म्हणाले.नागरिकांचे प्लाॅट कारवाईत मनपाने जप्त करुन घेतले मात्र पैश्यांचा भरणा होणाच नागरिकांना ते परत करण्यात आले असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
याप्रसंगी बोलताना भोयर यांनी पदाधिकारी व मनपा प्रशासकीय अधिका-यांमध्ये सुवर्ण मध्य साधणार असल्याचे सांगितले.सुवर्ण मध्य म्हणजे काय?असा प्रश्न विचारला असता जी काही आवक येईल त्यात नगरसेवकांच्या ज्या काही अपेक्ष्ा आहेत त्यांना योग्य निधी मिळायला पाहीजे असे सांगून हे निवडणूकीचे वर्ष असल्यामुळे गडकरी,फडणवीस व सर्व आमदार,महापौर व ज्येष्ठ नगरसेवक यांच्याशी चर्चा करुन अर्थसंकल्प लवकरात लवकर तयार करण्यात येईल.आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार मार्चच्या दुस-या आठवड्यात आयुक्त हे अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यांचा अर्थसंकल्प प्राप्त होताच मनपाचा अर्थसंकल्प लवकरात लवकर सादर होईल,प्रशासन व पदाधिकारी हे मिळून -मिसळून काम करतील त्या अनुषंगानेच सुवर्ण मध्य शब्द वापरला असल्याचे भोयर यांनी सांगितले.
माजी आयुक्त तुकाराम मुंढे याचा कार्यकाळ आठ महिन्यांचा होता.२७ ऑगस्ट २०२० रोजी ते आयुक्त गेले व सप्टेंबर २०२० पासून नवे आयुक्त राधाकृष्णन बी.आलेत मात्र नव्या आयुक्तांच्या कालावधीला आता ७ महिन्यांचा काळ लोटत आला असला तरी नगरसेवकांची मंजूर झालेली कामे का सुरु झाली नाही?असा प्रश्न विचारला असता यासाठीच प्रशासनासोबच समन्वयाने काम करणार असल्याचे मी म्हणालो,आपण प्रशासकीय अधिका-यांवर विश्वास ठेऊ,असे भोयर यांनी सांगितले.
भाजप सत्ताधा-यांमध्ये अंतर्गत गटबाजी लक्ष्ात घेऊन तसेच तुम्ही दक्ष्णि-पश्चिमचे असल्यामुळेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमची स्थायी समिती अध्यक्ष् पदी निवड केली असा आरोप लावला जात आहे, यावर बोलताना आता पर्यंत मध्य,पूर्व,उत्तर,दक्ष्णि अश्या सर्वच मतदार संघातून स्थायी समिती अध्यक्ष् पदी नगरसेवकांना संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.यामुळेच या वेळी दक्ष्णि-पश्चिमला संधी देण्यात आली असावी,शेवटी हा कोअर कमेटीचा निर्णय आहे. या आरोपात मुळीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना नगरसेवकांना छोट्या छोट्या कामासाठी निधी मिळत नाही.या वर्षी नगरसेवकांना जो निधी मंजूर झाला आहे तो मिळून देण्यास प्राधान्य राहील.मी १०-१५ गोष्टी सांगणार नाही,१-२ गोष्टी ही साध्य होतात का?यासाठी प्रयत्न करणार.मनपाची आर्थिक स्थिती ही अत्यंत वाईट असल्याची प्रतिमा जनसामान्यात आहे.कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट झाल्यास पालक आपल्या पाल्यांचे शिक्ष् ण,आरोग्य यांच्यावर खर्च करणे बंद करीत नाही.मनपाच्या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा,महापौरांचे ७५ आरोग्य दवाखाने निर्माण करण्यास सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करील.

साध्या समारंभात स्वीकारला पदभार-
स्थायी समितीचे सभापती म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षामध्ये औपचारीक पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार अनिल सोले, मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर नंदा जिचकार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, नासुप्र चे माजी विश्वस्त भूषण शिंगणे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती मिनाक्षी तेलगोटे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती दीपक चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सर्वश्री अभय गोटेकर, भगवान मेंढे, निशांत गांधी, नागेश सहारे, नागेश मानकर, नगरसेविका मंगला लांजेवार, नसीम बानो इब्राहिम खान, सोनाली कडू, विशाखा बांते, उज्ज्वला शर्मा, वनिता दांडेकर, रिता मुळे, भारती बुंडे, लता काडगाये, रुपाली ठाकुर, स्वाती आखतकर, जयश्री रारोकर, सुमेधा देशपांडे आदी उपस्थित होते.
बोलताना नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, १९८७-८८ पासून भारतीय जनता पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले. पुढे विविध जबाबदा-या पक्षाने सोपविल्या त्यांना प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. २००२ला पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढविली, मात्र त्यात अपयश आले. पुढे २०१७च्या निवडणुकीत यश मिळाले. या पहिल्याच वर्षी पक्षाने लक्ष्मीनगर झोन सभापतीपदाची जबाबदारी सोपविली. पक्षाने दाखविलेला विश्वास पुढे सलग चार वर्ष कायम ठेवला. आज पाचव्या व शेवटच्या वर्षी मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाची मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे. वेळोवेळी टाकलेल्या विश्वासाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींचा आभारी असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सर्व पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास कायम ठेवून मावळते स्थायी समिती सभापती विजय झलके यांच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली कामे, अनेक प्रकल्प पुढे नेउन तसेच, शहरातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांच्या मुलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी सर्व अनुभवी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, २०१७मध्ये मनपामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिले स्थायी समिती सभापती म्हणून संदीप जाधव यांना जबाबदारी देण्यात आली होती व शेवटच्या वर्षी ती जबाबदारी प्रकाश भोयर यांच्याकडे आली आहे. एकूणच सुरूवातीला लागलेला विकासाचा, यशाच्या दीपाच्या प्रकाश हा पुढेही निरंतर राहिल, हा विश्वास यामधून प्रतीत होतो.
मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अडचणी असतानाही लोकहिताच्या २७६ कोटींच्या कामाला मंजुरी मिळवून दिली. पक्षश्रेष्ठींद्वारे दाखविण्यात आलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी महत्वाची कामे, प्रकल्प, संकल्पना मांडल्या. त्या कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पूर्ण होउ शकल्या नाहीत. आता त्याच कामांना पुढे घेउन जनहिताची नवीन कामेही करण्याचे आव्हान प्रकाश भोयर यांच्यावर आहे. सलग चार वर्ष लक्ष्मीनगर झोन सभापती म्हणून कामकाज पाहिलेले प्रकाश भोयर अनुभवी व वाणिज्य विषयात पदवीधर आहेत. त्यांच्या शैक्षणिक, राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा फायदा निश्चितच येत्या काळात मनपाला होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.
मावळते सभापती विजय (पिंटू) झलके यांनी यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अडचणी आणि त्यावर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या मदतीने केलेली मात याचे विवेचन केले. ६ मार्च २०२० रोजी समितीचा सभापती म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर २२ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले. अशा काळात मनपाच्या अर्थसंकल्पात अनेक बाबींचा समावेश होता मात्र त्याची पूर्ती होउ शकली नसल्याचे दु:ख आहे. मनपाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या योजना राबविता आलेल्या नाहीत. मात्र काही प्रमाणात तरी उत्पन्न वाढीत यश आल्याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.
नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर हे अनुभवी आणि सुक्ष्म नियोजन असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने मागील कामांना गती मिळून जनतेच्या हिताची अनेक कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे व माजी आमदार अनिल सोले यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी प्रकाश भोयर यांच्याकडे पदभार सोपविला.
कार्यक्रमाचे संचालन मनपातील परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
