

शहरातील स्वयंसेवी संस्थांनी नि:शुल्क उद्यानांचा भार उचलावा
स्थायी समितीने पाठवला प्रशासनाकडे फेरप्रस्ताव:झलके यांची माहिती
नागपूर,ता. ५ फेब्रुवारी: गेल्या बैठकीत स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी या पुढे मनपाच्या एकूण ६४ मोठ्या उद्यानामध्ये फिरायला येणा-या नागरिकांना ५ रु.प्रति दिवस शुल्क आकारण्यात येणार असल्याचा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती दिली.यानंतर नागरिकांमध्ये पराकोटीचा असंतोष आणि संताप उसळून आला.महापौर,भाजपचे आमदार,नेते,नगरसेवक ते स्वत: पिंटू झलके यांच्याकडे नागरिकांच्या निवेदनाचा अक्ष् र:पाऊस पडला,जनतेच्या या रेट्यापुढे झूकत आज शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी मनपा मुख्यालयात पार पडलेल्या पत्र परिषदेत हा प्रस्ताव आता मनपा प्रशासनाकडे फेरप्रस्तावासाठी पाठवला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी दिली.

उद्यानांवर शुल्क आकारण्याच्या पालिकेचा निर्णय हा नागपूरकरांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.सलग तिस-या दिवशीही नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनांनी विविध बगिच्यात आंदोलने उभारली व विरोध दर्शवला.महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी उद्यानाच्या खासगीकरणाचा निर्णय जनतेवर लादला.प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी देखील प्रदान केली.सुरवातीला मोठ्या उद्यानांवर शुल्क आकारल्यानंतर पुढे मनपाच्या इतर ही उद्यानात हा प्रयोग राबविला जाणार होता. मनपाची उद्याने खासगी संस्थांच्या हातात देण्याचा निर्णय नागपूरकर नागरिकांना रुचलाच नाही.
बघता बघता विरोधाची मोहीम लोकचळवळीत परिवर्तित झाली.शहरात अनेक ठिकाणी सकाळी व सायंकाळी नागरिकांनी एकत्रित येऊन उद्यानात स्वाक्षरी मोहीम राबविली. महापालिकेने शहरातील इतर प्रकल्पामध्ये होणारी कोट्यावधीची उधळपट्टी आधी थांबवावी.रस्त्यावर चालणा-याकडून देखील महापालिका पथकर वसूलते.आता शुद्ध श्वास घेण्यासाठी उद्यानात येणा-या नागरिकांवर ५ रु.चा बोजा टाकला जात आहे.‘आम्ही शुल्क नाही देणार‘जनता जे वेगवेगळे कर मनपाला देते त्यातून निदान उद्यानावर तरी नि:शुल्क नागरिकांचा अधिकार असू द्या,असा संताप ही अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
या ही पुढे जाऊन भाजप हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाकडूनही उद्यान शुल्क वसूल करेल का?असा संतप्त सवाल ही एका उद्यानातील ज्येष्ठ नागरिकाने विचारला!की फक्त आम नागरिकांकडूनच भाजपला शुल्क वसूल करायचे आहे?सकाळी फक्त ९ वाजेपर्यंत नागरिकांना नि:शुल्क उद्यानात फिरता येणार होते.याशिवाय ३ वर्षावरील सर्व बालकांना उद्यानात येण्यासाठी तेवढेच ५ रु.शुल्क द्यावे लागणार होते.यामुळे नागरिकांचा चांगलाच भडका उडाला.
नागरिकांच्या या जनक्ष्ोभापुढे नमते घेत अखेर आज स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी नागरिकांवर कोणताही बोजा पडणार नाही आणि मनपाचे उत्पन्न देखील वाचेल अश्या प्रकारचा फेरप्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देत,शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी मनपा उद्यानाचे नि:शुल्क पालकत्व घ्यावे असे आवाहन केले.सीएसआर फंडामधून संस्था यांनी हे पालकत्व स्वीकारल्यास मनपा तसेच नागरिकांवर कोणताही बोजा पडणार नाही,असे ते म्हणाले.
स्थायी समितीसमोर जो प्रस्ताव गेल्या बैठकीत प्रशासनाने मांडला त्याबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज नागरिकांमध्ये पसरला,अशी पुश्ती ही झलके यांनी जोडली.ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या भावना महापौर,उपमहापौर,भाजप नेते,आमदार,नगरसेवक यांच्या पुढे वेगवेगळ्या माध्यमातून मांडल्या.मी स्वत: अनेक उद्यानाला भेट दिली.सर्व लोकप्रतिनिधी व विरोधी पक्ष् नेते यांनीही असे शुल्क योग्य नसल्याची भावना व्यक्त केली.
ज्या स्वयंसेवी संस्था ही उद्याने नि:शुल्क चालवू शकतील त्यांनी पुढे यावे,असे आवाहन झलके यांनी या प्रसंगी केले.




आमचे चॅनल subscribe करा
