फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनासुप्रने उभारले शहरात सिमेंट-काँक्रिटचे ‘स्लम’:पिंटू झलकेंचा आरोप

नासुप्रने उभारले शहरात सिमेंट-काँक्रिटचे ‘स्लम’:पिंटू झलकेंचा आरोप

Advertisements

नासुप्रचा पुर्नरुज्जीवनाचा निर्णय दूर्देवी: शहराचा केला सत्यानाश!

नागपूर,ता. ५ फेब्रुवारी: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाबाबात जे-जे निर्णय घेतले ते संपूर्ण निर्णय ठाकरे सरकार ही हेतुपुरस्सर बदलत आहेत,नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्त करुन या प्राधिकरणाचे अधिकार महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचा फडणवीस यांचा निर्णय देखील काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत बदलण्यात आला,नासुप्रने शहरात फक्त सिमेंट-काँक्रिटचे स्लम उभारले असून या शहराचा सत्यानाश केला असल्याचा आरोप मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष् व नासुप्रचे विशवस्त पिंटू झलके यांनी आज शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत केला.यावेवळी नासुप्रचे विशवस्त भूषण शिंगणे उपस्थित होते.

झलके हे म्हणाले की,नासुप्रने केलेली ५७२,१९०० ले-आऊटची रचना म्हणजे शहराचा सत्यानाशच आहे.नासुप्रच्या बर्खास्तीनंतर ज्या काही फाईल्स मनपाकडे आल्या त्यात अनेक धक्कादायक गोष्टी आम्हाला कळल्या.एकच प्लाट अनेकांना विकणे,जी प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत त्याच्याही डिमांड काढणे,अनेक प्रकरणात कागदोपत्री पूर्तता नसताना बिल्डर्सना सोयीचे निर्णय घेणे,शहरातील अनेक नाल्यांवरच ले-आऊट्स टाकणे,अवैधरित्या डिमांड व आरएल देण्याचे काम केले,शेतक-यांची जमीन ही ४ एकर असताना नासुप्रच्या मदतीने बिल्डर्सने मात्र ६-७ एकरमध्ये प्लाट टाकले,हा प्लाट विश्‍वासाने घेणारा सामान्य माणूस यात भरडला गेला,बिल्डर मात्र विकून मोकळे झालेत,२००१ साली गुंठेवारी कायदा अस्तित्वात आला,मोकळे भूखंड रिव्हाईस झाले,मात्र नासुप्र म्हणजे सिंडीकेट झाले त्यांनी ए,बी,सी,डी असे ले-आऊट दाखवून गोरखधंदा केला,यात नासुप्रचे चार-पाच विश्‍वस्त हेच अधिकारी भूखंडाचे रॅकेट चालवित असल्याचा घणाघाती आरोप झलके यांनी केला.

नासुप्रने दक्ष्णि-पूर्व, दक्ष्णि-पश्‍चिम इ.अश्‍या भागात शहराची विभागणी करुन प्रत्येक भागासाठी ६० ते ७० अधिकारी,कर्मचारी नेमले,दूसरीकडे महानगरपालिकेकडे अपूरा कर्मचारी वर्ग आहे.आजही चार हजार जागा रिक्त आहेत.मनपाजवळ प्रत्येक भागासाठी फक्त ३० टक्के कर्मचारी आहेत,अश्‍या अपु-या संख्याबळावरही मनपाने नेटाने कारभार रेटला,आम्ही नासुप्रला हस्तांतरणामध्ये अधिकारी व कर्मचारी देखील मागितले होते.मात्र त्यांनी अंमलबजावणी केली नाही.मनपाने एका वर्षात मिनिमम रिर्सोसेसमध्ये मेक्सीमन कामे केली.
शहरालगतच्या वेगवेगळ्या मौजेकडून मनपाकडे ४ हजार ५०० अर्ज आलेत,२४५ डिमांड आलेत.यातील ५० टक्के डिमांड मंजूर करण्यात आल्या.मात्र नासुप्रने अनेक डिमांडच्या मूळ नस्ती व फाईल्स मनपाला सुपुर्दच केल्या नाहीत.नासुप्रच्या रेकॉड विभागातून एकेका फाईलला हस्तांतरीत होण्यास चार-चार महिने लागलेत!जोपर्यंत नासुप्रमध्ये ‘लक्ष्मी दर्शन’होत नाही तोपर्यंत फाईल हलत नसल्याचा आरोप झलके यांनी केला.या उलट मनपाच्या एडीटीपी विभागाने त्या तुलनेत उत्तम काम केले.१६.७१ कोटींचे उत्पन्न मनपाला मिळवून दिले.४७.६७ कोटी हे केवळ इमारतींतून प्राप्त झालेत.

एकंदरित हस्तांतरण प्रक्रियेमुळेच हे सत्य समजले की, शहरातील सर्वाधिक महत्वाच्या जागा नासुप्रने मंजूर केल्या असून क्रीम सगळी खाऊन टाकली, ५७२ ले-आऊट्समध्ये मात्र अर्धवट कामे करुन ती देखील चूकीची कामे केलीत व ती मनपाला हस्तांतरित करण्यात आली.या सर्व ले-आऊट्समध्ये सर्वाधिक गडर लाईनचा त्रास झाला.शहराच्या अनेक भागात नासुप्रने बांधलेल्या व सत्यानाश केलेल्या या ले-आऊट्समधील तांत्रिकदृष्टया बांधलेल्या गडर लाईन्स यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले.कोणतीही लेवल न घेता वर-वर पाईप लाईन्स टाकल्या व याचा भार मनपावर ढकलला.सिमेंट रोडची कामे करताना नासुप्रच्या या सर्व सत्यानाशी कारभारामुळेच यूटीलिटी शिफ्टींगमध्ये भयंकर त्रास झाला एवढेच नव्हे तर या कामासाठी मनपाला वेगळे पैसे भरावे लागले.

नासुप्र बर्खास्तीचा फडणवीस यांनी यथायोग्य निर्णय घेतला होता मात्र ठाकरे यांनी केवळ फडणवीस यांच्यावरील आकसापोटी पुन्हा नासुप्र, नियोजन प्राधिकरण म्हणून नागपूरकर जनतेवर लादले.महानगरपालिकेत १५५ नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत,ते आपल्या कामासाठी जनतेला जवाबदार असतात मात्र नासुप्रमध्ये केवळ दोन लोकप्रतिनिधी सोडून ४ ते ५ विश्‍वस्त असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही,असे ते म्हणाले.

मनपाकडे नासुप्रचा नियोजन विभाग हस्तांतरण झाल्यानंतर गुंठेवारीची ४ हजार ९०० अर्ज आलेत त्यातील २५०० हजार अर्जाची सोडवणूक केली,काही प्रकरणे ही न्यायालयात विचाराधीन आहेत तर काही प्रकरणात एकाच प्लाटवर दोन-दोन मालमत्ताधारकांचा दावा आहे.
विश्‍वस्त भूषण शिंगणे यांनी एकाच शहरात विकासासाठी दोन-दोन प्राधिकरणाची गरज नसल्याचे सांगितले.दीडशे नगरसेवक हे या शहराच्या विकासासाठी पुरेशे आहेत. मात्र फक्त ५-७ विश्‍वस्तांवर शहराचा विकास सोपवल्या जाऊ शकत नाही.मी स्वत:नासुप्रचा विश्‍वस्त असलो तरी माझे नासुप्र बर्खास्तीला समर्थन आहे.माजी आमदार सुधाकर देशमुख हे देखील विश्‍वस्त होते मात्र त्यांनी देखील एक ही दिवस नासुप्रमध्ये भेट दिली नाही,भारतीय जनता पक्ष्ाची हीच मागणी आहे नासुप्र बर्खास्तच राहीली पाहीजे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या