Homeनागपूर न्यूजसोसायटी स्वत:च्या जागेवर भिंत बांधू शकत नाही!धंतोली झोनची ‘अर्थपूर्ण’ नोटीस!

सोसायटी स्वत:च्या जागेवर भिंत बांधू शकत नाही!धंतोली झोनची ‘अर्थपूर्ण’ नोटीस!

नागपूर,ता. ४ फेब्रुवारी: नरेंद्रनगर एक्सटेशन परिसरातील शिल्पा हाऊसिंग सोसायटीत मनपाच्या राजेश रंगारी या कंत्राटदाराचे अतिक्रमण, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या आदेशाने २५ डिसेंबर २०२० रोजी तोडण्यात आले होते मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला असला तरी  अतिक्रमणाचा हा मलबा धंतोली झोनच्या अधिका-यांकडून ‘हेतूपुरस्सर’ उचलण्यात आला नाही,विशेष म्हणजे हा मलबा सोसायटीलाही उचलू देण्याची परवनागी सोसायटीतर्फे झोन कार्यालयात चार-चार अर्ज करुन देखील परवानगी प्रदान करण्यात आली नाही,त्यावर कहर म्हणजे चक्क धंतोली झोन्या सहायक आयुक्त बागडे यांनी या ठिकाणी भींत बांधता येणार नसल्याचे पत्रकच चिपवकले!एखाद्या साेसायटीला आपल्याच मालकी हक्काच्या जागेवर भिंतच बांधता येणार नसल्याचा ‘अजब मनपाच्या गजब कारभारावर’ आता संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेचे [प्रसिद्ध] कंत्राटदार राजेश रंगारी याने तीन वर्षापूर्वी या भागातील नाल्याचे काम करण्याचे कंत्राट मिळवले.हे काम करण्यासाठी रंगारी याने नाल्या जवळच मजुरांसाठी राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती.काही महिन्यानंतर काम संपल्यानंतरही रंगारी याने मजुरांना सोसायटीच्या या मालकी हक्काच्या जागेवरुन स्थानांतरित केले नाही. उलट या ठिकाणी पक्के बांधकाम करुन त्यांच्या कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्थाच करुन दिली.त्याच बरोबर या परिसरात असामाजिक तत्वांचा वावर वाढू लागला.रात्री कामावरुन परतल्यानंतर मजूरांद्वारे त्या ठिकाणी दारु पिऊन भांडण करने,अमली पदार्थांचे सेवन करणे यासारखा गैरप्रकार वाढू लागला.याची तक्रार परिसरातील नागरिकांनी रंगारी याच्याकडे केली.मात्र या भागातील नागरिकांनाच मजुरांकडून चाकू दाखवून धमकावण्यात येऊ लागले.या संबंधीची तक्रार परिसरातील नागरिकांनी माजी महापौर संदीप जोशी तसेच धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे,सहायक अभियंता उज्वल धनविजय यांना देखील वारंवार केली मात्र अधिकारी व मनपा पदाधिका-यांना ‘प्रिय’असणा-या या कंत्राटदारावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही!

याच भागातील वैभव पांडे यांनी या संबधीची पोलिसात तक्रार केली.मात्र धंतोली झोनच्या सहायक आयुक्त व सहायक अंभियंता यांनी ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’या न्यायाने ७० वर्षीय विशाखा पांडे आणि त्यांचे पुत्र वैभव पांडे यांनाच नोटीस पाठवून त्यांना त्यांच्या घराचा नकाशा घेऊन झोन कार्यालयात बोलावले!या संपूर्ण प्रकरणाची माहिती आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या कानावर पडताच त्यांनी जेसीबी पाठवून अतिक्रमण पाडण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते.तसेच नागरिकांच्या तक्रारीवरुन बेलतरोडी पोलिस ठाण्यात रंगारी याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला मात्र एफआयर दाखल झालेल्या रंगारी याच्याच तक्रारीवरुन धंतोली झोनचे सहायक आयुक्त व सहायक अभियंता यांनी या सोसायटीच्या मालक असणा-या विशाखा पांडे यांचे मानसिक खच्चीकरण करने सुरु केले .याचाच एक भाग म्हणजे जगातील कोणत्याही भागात मालक आपल्याच हक्काच्या जागेवर भिंत बांधू शकत नाही असा कायदा नसताना धंतोली झोनच्या अधिका-यांनी मात्र हा ‘चमत्कार’ नागपूरात करुन दाखवला व काल सायंकाळी ६ वा.शिल्पा सोसायटीच्या भिंतीवर तुम्ही भिंत बांधू शकत नसल्याची नोटीस चिपकवली!
पदाधिकारी,मनपा अधिकारी,झोन अधिकारी व कंत्राटदार यांच्या मोडस ऑपरेंडीचा हा उत्तम नमूना आहे!

नागपूर शहरातील ३० ते ३५ लाख नागरिकांचे पालकत्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजे नागपूर महानगरपालिकेवर आहे त्याच मनपातील सत्ताधारी,मनपा प्रशासकीय अधिकारी,झोनल अधिकारी आणि काही भ्रष्ट कंत्राटदार यांची कशी अभद्र युती आहे हे नागपूरकर जनतेलाही माहिती आहे,गेल्या १४ वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात नागपूरकर जनतेने ती चांगलीच अनुभवली देखील आहे मात्र नुकतीच २० जानेवारीच्या मनपाच्या ऑन लाईन पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अपक्ष् व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी या मोडस ऑपरेंडीला वाचा फोडली.एकच एक संस्था किवा एकच व्यक्ती वारंवार धंतोली,लकडगंज,नेहरु नगर,धरमपेठ इ.विशेषत:चारच झोनमध्ये वारंवार कोणाच्याही बांधकामाविरोधात तक्रार नोंदवित असून,त्याच्या तक्रारीवर तातडीने झोन अधिकारी हे संबंधित नागरिकाला कश्‍याप्रकारे नोटीस पाठवतात यानंतर ही व्यक्ति किवा संस्था मग ’संबंधित तक्रारीविषयी माझे समाधान झाले!’अशी लेखी हमी कश्‍याप्रकारे झाेन कार्यालयात देते,यावर झगझगीत प्रकाश टाकला होता.आभा पांडे यांनी या सभेत नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख सत्ताधा-यांना प्रिय असणा-या राजेश रंगारी याच्या ‘भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषद’तसेच ‘दणका’या दोन संघटनेवर होता.’सत्ताधीश’कडे या संघटनांनी चारही झोनमध्ये केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकामांबाबत केलेल्या असंख्य तक्रारी व यानंतर ‘समाधान झाल्याचे’सादर केलेली पत्रे,असे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत.संघटनेचे नाव भ्रष्टाचार निमुर्लन मात्र वास्तवतेत भ्रष्टाचाराचे पोषण अशी या संघटनेची कृती असल्याचे सांगितले जात आहे!

विशेष म्हणजे सामान्य प्रशासन मंत्रालय मुंबईतर्फे १४ ऑक्टोबर २०१९ रोजी परिपत्रक निघाले होते.यात स्पष्टपणे वैयक्तिक तक्रारीविषयी त्रयस्थ व्यक्तींच्या किवा संस्थांचा तक्रारी स्वीकारण्यात येऊ नये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले .एवढेच नव्हे तर शासनाच्या या परिपत्रकानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त निर्भय जैन यांनी दहा ही झोनच्या सहा.आयुक्तांना हे परिपत्रक जारी केले,दुसरीकडे २० जानेवारी २०२१ च्या सभेत आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी देखील आभा पांडे यांच्या तक्रारींची गांर्भीर्याने दखल घेत,याबाबात संपूर्ण शहनिहा केली जाईल,सर्व झोन अधिका-यांना अश्‍या व्यक्ती किवा संस्थेद्वारे कोणाच्याही विरुद्ध तक्रार न घेण्याच्या सूचना ही दिल्या जाईल,असे आश्‍वासन ही दिले होते मात्र आयुक्तांच्या आदेशालाच झोनल अधिकारी कश्‍याप्रमाणे ‘केराची टोपली’ दाखवतात व एफआयआर दाखल असलेल्या कंत्राटदाराच्या तक्रारीवरुन उलट प्लाट धारकालाच कागदपत्रे घेऊन झोन कार्यालय नावाच्या सरकारी‘दरबारात’बोलवतात,याचे हे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शिल्पा सोसायटीचे हे प्रकरण आहे.वरुन त्याच रंगारी यांच्या तक्रारीचे पुन्हा तातडीने दखल घेत ‘तुम्ही भिंत बांधू शकत नाही’कारण रंगारी यांची लेखी तक्रार आली आहे,अशी नोटीस चिपकावणे म्हणजे कमरेचे सोडून चक्क डोक्याला गुंडाळण्यासारखी कृती असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

मनपाची ही भ्रष्टाचाराची कथा येथवरच थांबत नसून अगदी माजी महापौरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणा-या धरमपेठ झोनमध्येही अनेक नागरिकांची देखील हीच व्यथा व कथा आहे.येथील व-हाडे नावाच्या सहायक आयुक्तांनी कश्‍याप्रकारे नागरिकांच्या नाकात दम आणला आहे,याच्या अनेक तक्रारी  व्हायरल झाल्या आहेत.धरमपेठमधील अल्ताफ अहमद यांच्या कराची बाजार, अपना बाजार यांना देखील धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांकडून अश्‍याच नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.एवढेच नव्हे तर येथील शांतताप्रिय बोहरा समाजाचा व्यापारी वर्ग हा देखील या झोन अधिका-याच्या कारगुजारींमुळे अत्यंत त्रस्थ झाला असून हे जनेतेचे अधिकारी आहेत की खंडणीखाेर?असा संताप त्यांनी खास ’सत्ताधीश’जवळ व्यक्त केला.

(२९ जानेवारी रोजी रंगारी याच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेली एफआयआर)

महत्वाचे म्हणजे धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांना सोसायटीच्या मालकाकडून ३० दिवसांचा अवधी मागितला असता या महान अधिका-याने अशी कोणतीही मुदत मालकाला न देता एक दोन नव्हे तर चक्क….५३ नोटीस पाठवल्या!त्यांच्या ‘कार्यतत्परतचे’ आता सर्वत्र कौतूक होत आहे!

काही ब्लॅकमेअर कंत्राटदार…झोनल कार्यालयात तक्रारी.. झोन कार्यालयांतून तातडीने जारी होणारी नाेटीस..तडजोडी…पैशांची देवाणघेवाण…लक्ष्मी दर्शन कार्यक्रम…राजकीय कॉल..त्या भागातील नगरसेवकाचे १५ टक्क्यांचा शेअर..झोनल कार्यालयातून तक्रार मागे घेणे….!अशी ही संपूर्ण मोडस ऑपरेंडी असून आता मनपास्तरावर शहरातील सर्वसामान्य जनतेला कोणतीही आशा नसून पोलीस आयुक्त अमितेश कूमार यांच्याकडूनच व्यापारी वर्ग या खंडणीखाेर व लाचखोर,काही भ्रष्ट सत्ताधारी व मनपा प्रशासकीय अधिकारी यांच्याद्वारे वारंवार होणा-या छळवादातून सुटका करतील अशी आशा ठेऊन आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्ण बी.यांच्या ‘मला कायदा माहिती नव्हता’या शब्दांचा देखील तीव्र निषेध केला जात असून एवढ्या मोठ्या पदावर बसणा-या आयएएस अधिका-याला शासनाचे निर्देश यांची माहिती नाही तर ते कोणत्याप्रकारे प्रशासनात सुशासन अवलंबतील?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे अगदी त्यांच्या नाकाखाली बसणारे मनपा मुख्यालयातील प्रशासकी अधिकारीच या व्यापारी वर्गाला ’तुम्ही तुमचे पाहून घ्या’अश्‍या शब्दात परतून लावतात याचाच दूसरा अर्थ ’सॅटलमेंट’करुन घ्या असाच नाही होत का?

पोलीस आयुक्तांनीच आता या संपूर्ण मोडस ऑपरेंडीची दखल घेत एसआयटी बसवायला पाहीजे,नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे हा सर्वसामान्य जनतेला विश्‍वास बसायला हवा यासाठी त्यांनीच पुढकार घ्यायला हवा अशी अपेक्ष्ाही मनपाच्या एकंदिरत कारभारामूळे पीडीत झालेल्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केली.

फडणवीस यांच्या कॉलही व्यर्थ!
७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक असणा-या विशाखा पांडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धंतोली झोनच्या या संपूर्ण कारभारावर तक्रार करण्यासाठी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र ‘चाय से ज्यादा केटली गरम‘वाली कहावत या ठिकाणीही हुबेहूब लागू झाली.अनेकदा चकरा मारुन देखील स्वीय सहायकाने ही ‘चिल्लर बाब’असल्याचे सांगून त्यांना परतून लावले.साहेब एवढ्या चिल्लर बाबीकडे लक्ष् देत नसल्याची पुश्‍ती ही जोडली!

एकेकाळी मुख्यमंत्री राहीलेले फडणवीस हे त्यांच्याच मतदार संघातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ देऊ शकत नाही का?असा संताप ही विशाखा पांडे यांनी व्यक्त केला.अखेर त्यांनी उपाेषणाचा मार्ग अवलंबिणार अशी धमकी देताच या स्वीय सहायकाने त्यांची बोलणी फडणवीस यांच्यासोबत करुन दिली.फडणवीस यांनी स्वत: धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना कॉल करुन रंगारी यांच्या तक्रारींची दखल घेऊ नका असे सांगितले मात्र…..धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांनी माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष्ाचे नेते असणारे देवेंद्र फडणवीस यांचाही कॉल त्यांच्या पदासमोर किती निरर्थक किवा व्यर्थ आहे,ही नोटीस चिपकवून सिद्ध केले!

Latest बातम्या