
अजनी इंटर मॉडल स्टेशन हब राहणार भारतातील पहीला अत्याधूनिक प्रकल्प:१२०० कोटींची मंजूरी
नागपूर,ता. ३१ जानेवारी: दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५ च्या अर्थसंकल्पात भारतातील फक्त दोन इंटर मॉडल स्टेशन हबच्या प्रकल्पाला मंजूरी प्रदान केली होती त्यातील एक वाराणशीत तर दूसरे आपल्या नागपूरातील अजनी रेल्वे स्टेशन हे आहेत.हा भारतातील एकमेव असा प्रकल्प आहेत ज्यात एकाच छताखाली रेल्व,रस्ते व मेट्रो टर्निमल्स राहणार आहे,मी स्वप्न बघणारा माणूस आहे,नाग नदीत बोट चालावी असे स्वप्न मी बघितले आहे,मला स्वप्ने बघायला आणि ती पूर्ण करायला आवडतं असे विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ते रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.माझं स्वप्न आहे नागनदीत बोटी चालाव्यात,त्यासाठी मी १७०० कोटींची तरतूद केली आहे.अजनी रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पासाठी देखील १२०० कोटी उपलब्ध करुन दिले आहे.या प्रकल्पामुळे जल वाहतूक,हवाई मार्ग,रस्त्यांचे नेटवर्क व रेल्वे एक साथ जोडल्या जातील.एक अत्याधूनिक मल्टी मॉडल हब मला साकार करायचं आहे,असे ते म्हणाले.
या प्रकल्पासाठी २०० एकर जमीन अधिकग्रहीत केली जाणार असून, अजनी जवळील क्रांकरला जिल्हाधिकारी यांच्याद्वारे नोटीस पाठवली जाणार असून शहराला त्यांच्याद्वारे होणा-या प्रदुषणापासून मुक्त करायचे आहे. त्यांना वर्धा येथे निर्माण होणा-या लॉजेस्टीक हब येथे जागा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या ठिकाणी त्यांना दुप्पट जमीन दिली जाईल असे ते म्हणाले.नागपूर शहर हे मला स्वच्छ,सुंदर व प्रदुषणमुक्त हवे आहे.
याशिवाय या प्रकल्पासाठी पाटबांधारे विभाग,मेडीकल विभागाची जागा,भारत सरकारच्या फूड कॉरपोरेशनची जागा अधिग्रहीत करावी लागणार आहे.यासाठी मी प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे,असे ते म्हणाले.ही जागा म्हणजे नागपूरचे ह्दय असल्याचे ते म्हणाले.या ठिकाणाहून नागपूरच्या चारही भागांना जोडल्या जाऊ शकतं.रोममध्ये अश्याच मल्टी मॉडल हबमध्ये आपल्यापेक्ष्ा दहा गूणांनी मोठ मोठे चौक असतात,लोकं दिवसभर या ठिकाणी फिरतात,यानंतर रेल्वे स्टेशनवर येतात.आपल्या नागपूर रेल्वे स्टेशनवर आहेत तसे ३५० पेक्ष्ा जास्त रेस्टारेंट या ठिकाणी असतील अगदी त्याच माफक दरात प्रवाश्यांना या ठिकाणी जेवण मिळेल.रामभरोसे लॉजसारखी राहण्याची देखील माफक दरात सुविधा मिळेल.याशिवाय लग्न समारंभासाठी सभागृहे देखील असणार आहे.
सर्वस्तराच्या लोकांचा विचार करुन संपूर्ण सुविधा प्रवाश्यांना या ठिकाणी मिळणार आहे.ई-रिक्शासोबतच एस.टी,मध्यप्रदेशच्या बसेस,खासगी बसेस,आपली बस या सरळ येथील प्रवाश्यांना त्यांच्या गंतव्यापर्यंत पोहोचवतील.नागपूर मेट्रो स्टेशनसोबत हे रेल्वे स्टेशन जोडल्या जाणार असून नागपूर ते छिंडवाडा,बैतूल,गोंदिया,रामटेक,वडसा,अमरावती ब्रॉडगेज मेट्रोची परवानगी मिळाली असून येत्या ५ वर्षात १०० मेट्रो चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भाचे ५ व पश्चिम विदर्भाचा अमरावती जिल्हा या ब्रॉडगेज मेट्रोने जोडल्या जाणार असून नागपूर ते अमरावतीचे अंतर फक्त दीड तास राहणार असल्याचे ते म्हणाले.१४० किलोमीटर प्रति तासांचा वेग या ब्रॉडगेज मेट्रोचा राहणार आहे. ५ लाख प्रवाशी या प्रकल्पांचा लाभ घेतील.अजनी रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात आकर्षक रेल्वे स्टेशन राहणार आहे.या ठिकाणी इलेक्ट्रीक चार्जिंगची व्यवस्था,दूचाकी पार्कींगची व्यवस्थाही राहील.या स्टेशनपासून निघाल्यानंतर सरळ रिंगरोडवर प्रवाशी निघू शकेल व मध्ये सिग्नल लेस व्यवस्था असावी,अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत नागपूरकर जनतेच्या,स्वयंसेवी संस्थांचा,शहरातील तज्ज्ञ लोकांचा,शिक्ष् ण संस्था,आमदार,खासदार,विद्यार्थी, पत्रकारांच्या देखील काही सूचना असतील तर त्यांनी त्या नक्की सूचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.
या ठिकाणी रेल्वेने आम्हाला जागा दिली आहे.येथील रेल्वेच्या कर्मचा-यांची जागा या प्रकल्पात जाणार असल्याने या ठिकाणी त्यांच्यासाठी टाऊनशिप राहणार असून आतापेक्ष्ा तिप्पट सुविधा त्यांना मिळणार आहे.यात शाळा,खेळासाठी मैदाने असणार आहे.

(प्रस्तावित मॉडेल)
कमीत कमी वृक्ष्ांची कटाई-
याप्रसंगी बोलताना गडकरी हे म्हणाले की या प्रकल्पात कमीत कमी वृक्ष तोड व्हावी अशी सूचना मी केली आहे.जेवढी पण झाडे कापली जातील त्यांचे पूर्नरोपण त्याच परिसरात करण्यात यावे किवा राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे पुर्नरोपण केल्या जाईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रकल्पात कमीत कमी प्रदुषण-
जेसीबीच्या व्यवस्थापकीय संचालकाशी मी बोललो असून या ठिकाणी कामाकाजादरम्यान कमीत कमी प्रदुषण होईल अशी उपकरणे वापरा,असे सांगितले आहे. डीजल,पेट्रोलच्या ऐवजी इलेक्ट्रीकवर चालणारी उपकरणे वापरण्याचा सल्ला दिला असल्याचे ते म्हणाले.सीएनजीचे वाहन वापरत असल्यामुळे महिनाकाठी २५ हजार रुपये पेट्रोलचा खर्च हा २ हजार रुपयांवर आला. बायो-सीएनजीमुळे १०० रुपयांचा खर्च हा ४० रुपयांवर येत असल्याचे ते म्हणाले.
मी स्वत:या पुढे नागपूरात बुलेट प्रूफ गाडी नाही वापरणार कारण बुलेट प्रूफ गाड्या या अद्याप इलेक्ट्रीकवर किवां सीएनजीवर आल्यानसून त्या डिजेल,पेट्रोलवरच चालत असतात.मला सीएनजी किवा इलेक्ट्रीक कारमध्येच जाणे-येणे करायला आवडेल.महापौरांना देखील या प्रसंगी त्यांनी सूचना केल्या महापौरांनी त्यांची गाडी देखील सीएनजीवर कन्वर्ट करावी.मनपा मुख्यालयातील सीएनजीचा प्लांट बसवावा व हळूहळू मनपातील सर्वच गाड्या या सीएनजीवर कराव्यात.
नागपूर हे देशातील सुंदर शहर बनावे,हे माझे स्वप्नं आहे.सध्या १२०० कोटींचा पहीला टप्पा हा मंजूर झाला आहे.दुसरा देखील लवकरच सुरु होईल.मी राज्य सरकारला व पालकमंत्र्यांना देखील विनंती केली आहे त्यांनी मध्यवर्ती कारागृहाची जागा या प्रकल्पासाठी द्यावी.१२०० कोटी माझ्या केंद्रिय विभागाने दिले आहेत,हा भारत सरकारचा प्रकल्प आहे.जगातील एकमेव आणि अद् भूत असा हा पाश्चात्य धर्तीवरील प्रकल्प राहणार आहे.मी पोलीस विभागाला देखील त्यांची वाहने सीएनजीवर करावी अशी विनंती करणार आहे.नागपूरात जास्तीत जास्त वाहने ही सीएनजी,इलेक्ट्रीक,मिथेनॉल,इथेनॉल,बायो-सीएनजीवर चालावी अशी अपेक्ष्ा त्यांनी व्यक्त केली.
महापौरांनी आदेश काढावा व मनपातील १५ वर्षांपूर्वीची वाहने ही भंगारात काढावी.नागपूर शहर हे जास्तीत जास्त प्रदुषणमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
मी महालकरच!
याप्रसंगी बोलताना प्रकल्प कसे रखडतात यावर भाष्य करतानाच मला महालमध्येच राहायला आवडतं मात्र अद्याप महानगरपालिकेने माझ्याच वाड्या जवळील केळीबाग रोडचे काम पूर्ण केले नसून गेल्या सहा महीन्यांपासून एकच रस्ता बनत आहे.मी आज जरी पूलाच्या अलीकडे म्हणजे छत्रपती चौकात राहत आहे तरी देखील मी महालकरच असून मला पूलाच्या पलीकडेच राहयला आवडतं,अशी मिश्किली त्यांनी केली.मनपाला रसत्याच्या कामावरुन गडकरी यांनी चिमटा काढला असता शेजारी बसलेले महापौर दयाशंकर तिवारी यांचा चेह-यावर देखील हास्य उमटले.
१० हजार वैदर्भिय तरुणांना मिळणार रोजगार-
या एकाच प्रकल्पामुळे किमान १० हजार स्थानिक व वैदर्भिय तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.मिहानच्या प्रकल्पामुळे ५६ हजार तरुणांना रोजगार मिळाला.त्यांची यादीच माझ्याकडे आहे.या ठिकाणी वातानूकूलीत व थ्री स्टार दर्जाची सुविधा सामान्य माणसाला मिळेल.सध्या २०० एकर मध्ये हा प्रकल्प राहणार असून आजच्या प्रस्तावित मॉडेलमध्ये नीरीची जी जागा इंटरमॉडल स्टेशन हबमध्ये दाखवण्यात आली ती मला नाही रुचली.नीरीची जागा या प्रकल्पासाठी घेणे मला योग्य वाटले नसून मी कंपनीला पुन्हा नवा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.४४ एकरमध्ये केवळ स्टेशनच राहणार आहे.सध्या १२०० कोटींची मंजूरी दिली असली तरी पुढे या प्रकल्पातून जो कमर्शियल रेव्हेन्यू जनरेट होईल तो देखील याच प्रकल्पावर खर्च होणार असल्याचे ते म्हणाले.
पुढील निवडणूकीत मत मागायला नागपूरकर जनतेपुढे जाण्या आधी मला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे,असा निर्धार गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवला.
पत्र परिषदेला आमदार कृष्णा खोपडे,आ. मोहन मते,आ.प्रवीण दटके, महापौर दयाशकंर तिवारी,उपमहापौर मनीषा धावडे, माजी आ.डॉ.मिलिंद माने,मनपा स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके आदी तसेच नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा