Homeनागपूर न्यूजगोरेवाडा उद्यान आणि...कृत्रिम जंगल!

गोरेवाडा उद्यान आणि…कृत्रिम जंगल!

सिंगापूर प्राणि उद्यानात प्राण्याचे नैसर्गिक अधिवास घनदाट जंगलातच

नागपूर,ता. २८ जानेवारी: नागपूर शहरातील गोरेवाडा उद्यानाचे नुकतेच उद् घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी गणतंत्र दिनी पार पडले.याप्रसंगी सिंगापूरच्या धर्तीवर गोरेवाडा उद्यानाचा विकास करणार असल्याचे त्यांनी वचन ही दिले मात्र २०१५ पासून ज्या गाेरेवाडा उद्यानाचा हा प्रकल्प कश्‍याप्रकारे रखडत रखडत सुरु आहे त्याची साक्ष् एक हजार ९१४ हेक्टर वन जमिनीवर विस्तारलेल्या उजाड,भकास वृक्ष् वेली देतात.अक्ष रश: घनदाट जंगलाचा अभाव असणारे हे उद्यान घनदाट जंगल हेच नैसर्गिक अधिवास असणा-या वाघ,बिबटसाख्या प्राण्यांचे अधिवास बनवण्यात आले आहे,याबाबत आता आश्‍यर्च व्यक्त केले जात आहे!

२०१५ पासून महाराष्ट्र वन विकास महामंडळाने त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेल्या राज्य सरकारकडून ९० कोटींमधून ६० कोटी खर्च केल्याचे सांगितले मात्र हे ६० कोटी गेल्या सहा वर्षात फक्त तांत्रिक बाबींवरच खर्च झाल्याचे स्पष्टपणे निर्दशनास येतं.सहा वर्षापूर्वीच एवढ्या मोठ्या वन जमिनीवर सुनियोजितरित्या जगंल वसवण्याचा प्रयत्न झाला असता तर सध्या या उजाड आणि भकास उद्यानात एखाद्या झाडाच्या आश्रयासाठी सैरभैर फिरणा-या चार बिबट,दोन वाघ,तृणभक्ष् पक्ष्ी,सहा अस्वल इ.यांना निदान एखाद्या झाडाची तरी नैसर्गिक सावली तर मिळाली असती,असे म्हटले जात आहे!

मुख्यमंत्री यांनी तरी सिंगापूरचे प्राणी उद्यान बघितले आहे का?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.सिंगापूरचे प्राणी उद्यान हे संपूर्णपणे नैसर्गिक जंगलच आहे.दोन चार पावलांच्या अंतरावर हिंस्त्र असे वाघ,सिंह यासारखे प्राणी पर्यटकांच्या जवळ सहज विचरण करताना दिसतात.याचे कारण एक लहानशी विजेची तार पर्यटक आणि त्या हिंस्त्र प्राण्यांच्या मधोमध पसरली असते.ज्यात विद्युत प्रवाह अखंडीत वाहत असतो त्यामुळे फक्त दोन पावलांच्या अंतरावर वाघ,सिंह यांच्या सानिध्याचे ते पराकोटीचे ‘थ्रील’ अनुभवने हे भाग्य गेल्या सहा वर्षांपासूनचा वन विकास महामंडळाचा एकंदरित कार्यभार बघता वैदर्भियांच्या नशीबी तर नक्कीच नाही येणार असेच आता म्हणावे लागेल.

‘नाईट‘ सफारीची देखील वल्गना करण्यात येत आहे.या नाईट सफारीमध्ये तरी पर्यटकांना गोरेवाडा प्राणी उद्यानात काय दिसणार आहे?उजाड,भकास मैदाने?खुरटलेली झूडपे?कृत्रिमरित्या निर्माण केलेलं खुरटलेलं जंगल?सिंगापूरमध्ये नाईट सफारीमध्ये पर्यटकांना प्राणी व पशु पक्ष्य्ांसोबतच पर्यावरणातील रात्रीचा तो गारवा हूरळून टाकीत असतो,रात्रीच्या काळोखात घनदाट किर्र अंधार असणारी ती वृक्ष् वेली वेगळाच रोमांच निर्माण करतात,गोरेवाडा उद्यानात दिवसात रपेट मारली असता रोमांच निर्माण होत नाही तर रात्रीच्या र्कीर अंधारात तरी पर्यटकांना काय दिसणार?

गोरेवाडा प्राणी उद्यानात इंडियन सफारीचे उद् घाटन होताच नागपूरकरांनी या उद्यानात धाव घेत तूफान गर्दी केली अन ॒….पदरी निराशा घेऊन परतल्याचे अनेकांचे अनुभव आहेत….!यापेक्ष्ा महराज बागेची रपेट जास्त रोमांचक राहीली असती असे देखील कुत्सीतपणे सांगण्यात आले.वन विकास महामंडळाचे नेहमीचेच तुणतुणे अाहे,अद्याप खूप काही करायचे बाकी आहे,आता जरा सुरवात झाली,रोमांचक असा कल्पनाविलास वन विभागाकडून रंगवल्या जात आहे,असे जर घडले तर वैदर्भियांना आनंदच वाटेल मात्र आज त्या उद्यानाची उजाड रणभूमी बघताना पर्यटकांचे मन देखील तितकंच उजाड,आेसाड आणि भकास होतं,हे देखील तितकेच खरे आहे.
या उद्यानात इंडियन सफारी,अाफ्रिकन सफारी, नाईट सफारी,बायो पार्क इ.चे स्वप्न रंगवत असताना २०१५ पासून सर्वात आधी येथे जंगल का नाही उभारण्यात आले?हा प्रश्‍न पर्यटकांना छळत आहे.जंगलच नसताना खुरटलेल्या झाडी झूडपात‘ राजकूमार’ आणि ’ली’ या दोन वाघांना आणून सोडण्यात आले,याचेच अनेकांना वाईट वाटत असून एवढ्या मोठ्या परिसरात ते चार बिबट तरी आपली नैसर्गिक अधिवास कसे आखणार आहेत?

राज्य सरकारने २०० कोटीतील ९० कोटी उपलब्ध करुन दिल्याने इंडियन सफारीचा पहीला टप्पा जरी सुरु झाला असला तरी यामधून खर्च झालेल्या ६० कोटीमधून एवढ्या मोठ्या वन जमिनीवर आधी नैसर्गिक जंगल का नाही निर्माण करण्यात आले?मोठमोठे जाळींचे गेट बसवून आणि कृत्रित वृक्ष्ारोपणचे प्रयोग करुन वन विकास महामंडळाने काय साधले?असा छळवाद पर्यटकांना सोसावा लागत आहे.
ज्या पर्यटकांनी खरंच सिंगापूरचे प्राणी उद्यान बघितले आहे,ते मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर गोरेवाडा प्राणी उद्यानाची तूलना सिंगापूरशी केली?यावरच माथापच्ची करीत बसले आहेत!सिंगापूरचे प्राणी उद्यान म्हणजे फक्त रोमांच,राेमांच आणि रोमांचच आहे,त्याच्या एक टक्का देखील काम विदर्भाच्या या प्राणी उद्यानात दिसून पडत नाही.‘राजकूमार‘ आणि ‘ली‘ हे वाघ तर घनदाट जंगला अभावी ’निर्वासितांचे’जगणे जगत असल्याची भावना दाटून येते.रोमांच ऐवजी दयाभावना मनात निर्माण होते,असे अनेकांनी सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल केली आहे.ते अस्सवल तर गुहे ऐवजी जंगलातच उत्तम आरोग्दाायी राहीले असते,असा देखील सूर उमटला.

एखाद्या सरकारी विभागाचे सरकारी कामधाम जसे असते त्याच धर्तीवर वन विकास महामंडळाच्या गोरेवाडा प्राणी उद्यानाचे संपूर्ण स्वप्नवत प्रकल्प हा कागदांवरच राेमांचक आणि रोमहर्षक वाटत असल्याची टिका देखील वाचण्यात आली!सध्या १४५ हेक्टर क्ष्ेत्रातील इंडियन सफारी सुरु झाली आहे पुढे या संकल्पनांना गती मिळेल व पुढील काळात गाेरेवाडा प्राणी उद्यानात दोन वाघ,चार बिबट,सहा अस्सवल, पक्ष्यांचे अधिवास झालेला हा परिसर पर्यटकांनी फूलवून न्यायचा असेल आणि पर्यटनातून ५५ कोटींचे वार्षिक उत्पन्नाचे स्वप्न हे महामंडळ बघत असेल तर विदर्भ हा मूळातच जंगलानी नटलेला प्रदेश आहे,हे विसरता कामा नये,आणि इंडियन सफारीमध्ये देखील ‘जंगल सफारी‘चा आनंद पर्यटक हे अपेक्ष्ति करतात,असेच आता म्हणावे लागेल.जंगल आणि प्राणी ही माणसाच्या आंतरिक कल्पनेतच वसलेली असतात,गोरेवाडा प्राणी उद्यानात त्यामुळेच प्राणी तर दिसले मात्र जंगल न दिसल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला.

या उद्यानातील पाणवठे हे देखील पाण्या अभावी ठणठण कोरडे होते.याबाबत विचारणा केली असता,कृत्रिम पाईप लावण्यात आले आहेत,वेळोवेळी पाणी पाणवठ्यात सोडले जात असल्याचे सरकारी उत्तर मिळाले.हे उद्यान बघून मोठमोठ्या जाळ्यांच्या फाटकांमागे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवासच धोक्यात आणल्याची भावना अनेक प्राणीप्रेमींनी व्यक्त केली.

उद्यानाला ‘गोंडवन’ नाव द्या किवा ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’यामुळे पर्यटकांना काहीही फरक पडत नाही,त्यांना हवा असतो तो रोमांच आणि गोरेवाडा प्राणी उद्यानात याचाच नितांत अभाव आहे…..!

Latest बातम्या