फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज.करोनात ‘आपली बस’डेपोत... डिम्सने काढले बिल १ कोटी ८० लाख!

.करोनात ‘आपली बस’डेपोत… डिम्सने काढले बिल १ कोटी ८० लाख!

Advertisements


डिम्स कंपनीला नियमबाह्य पद्धतीने आयुक्तांनी केले भूगतान:बाल्या बोरकर यांचा आरोप

नागपूर,ता.२७ जानेवारी: गेल्या वर्षी करोनाच्या काळात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात महानगरपालिकेच्या एकूण ४६५ ‘आपली बस’ पैकी फक्त ६० बसेस करोना कारणासाठी रस्त्यावर धावल्या मात्र आपली बसचे संचालन करणा-या दिल्लीच्या डीम्स कंपनीने बिल सादर केले १ कोटी ८० लाख ७० हजार ४२२ रुपये!अशी माहिती आज मनपा परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी मनपा मुख्याल्यात आयोजित पत्र परिषदेत दिली.

डिम्स कंपनीला सहा वर्षासाठी ‘आपली बस’च्या संचालनाचा कंत्राट मिळाला असून यापैकी चार वर्ष पूर्ण झाली असून अद्याप दोन वर्षांचा कंत्राट शिल्लक आहे मात्र ऐन करोनाच्या काळात जेव्हा ‘आपली बस ’ ही चक्क डेपाेत उभी असतानाही डिम्स कंपनीच्या नागपूर येथील व्यवस्थापकांनी मनपाकडे, शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वोच्च स्थानी असताना एप्रिल,मे व जून २०२० या तिन्ही महीन्यांचे एक कोटी १५ लाखांचे बिल पाठवले, मात्र वित्त व लेखा अधिकारी यांनी हे लागू होत नसल्याचे कारण सांगून डिम्सने सादर केलेले हे बिल अमान्य करुन कंपनीकडे परत पाठवले.

मात्र पुन्हा जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर २०२० चे बिल या कंपनीने क्रमश: ७७ लाख,७८ लाख व ७९ लाख रुपये दरमहा असे पाठवले.वित्त अधिकारी यांनी हे बिल देखील अमान्य केले असता या कंपनीचे व्यवस्थापक हे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना भेटली आणि आयुक्तांना माहिती नाही का?या कंपनीचा एवढा पुळका आला की त्यांनी वित्त अधिकारी यांना फोन करुन कळवले एकूण बिलाच्या ३० टक्के कपात करुन कंपनीला ७० टक्के बिलाचे भूगतान करावे!याचा अर्थ डिम्सला ३० टक्के कपात करुन एप्रिल महिन्यात ६२ लाख,मे महिन्यात ६६ लाख,जून महिन्यात ६३ लाख,जुलै महिन्यात ६४ लाख,ऑगस्ट महिन्यात पुन्हा ६४ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ६५ लाखांचे भूगतान केल्या गेले असल्याची माहिती बाल्या बाेरकर यांनी याप्रसंगी दिली.

डिम्समध्ये एकूण १८४ कर्मचारी काम करतात.करोनाच्या काळात या पैकी डिम्सच्या कार्यालयात फक्त ७ कर्मचारी काम करीत होते.सहा कर्मचारी तिकीट खिडकीवर बसलेत.एकूण ७६ तिकीट तपासणीस पैकी फक्त १० कर्मचारी कामावर होते.आपली बस ही झोननिहाय चालत असल्यामुळे दहा झोनमध्ये दहाच माणसे व दहाच बसेस धावल्या. एप्रिल ते जून फक्त ६० बसेस धावल्या.यानंतर आणखी ३० बसेसला परवानगी मिळाली.जुलै ते सप्टेंबर ९० बसेस रस्त्यावर धावल्या. तरी देखील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यांचे एकूण बिल डिम्सने ३ कोटी ८६ लाख ४५ हजार ४८४ रुपयांचे काढले!

हे बिल फक्त २५ ते ३० लाख रु.हवे होते,माझ्या मते तर फक्त ५ लाख बिल निघतं तरी देखील आयुक्तांनी या कंपनीवर एवढे उदार होऊन कोट्यावधींची जी उधळण केली आहे,त्या बाबत परिवहन समितीच्या पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल व या कंपनीकडून त्यांच्या पुढील बिलामधून हे संपूर्ण जास्तीचे पैसे कापण्यात येईल,असा इशारा बाल्या बाेरकर यांनी दिला.विशेष म्हणजे या कंपनीचे आठ आधिकारी हे दिल्लीत असतात,त्यांचा नागपूर शहराशी काहीही संबंध नाही तरी देखील मनपामधून त्या आठ अधिका-यांना जवळपास दर महा एक लाखाच्या घरात पगार निघतो!या आठ अधिका-यांचा पगार मनपा देणार नाही असे पत्र डिसेंबर २०२० मध्ये समितीने डिम्सला दिले असल्याचे बाल्या बोरकर यांनी सांगितले.

या कंपनीसोबतच्या करारात तिकीट तपासणीस दर महा २५ हजार पगार देणे बंधनकारक असल्याचे नमूद असताना कंपनी फक्त ८ हजार पगार कर्मचा-यांना देत असल्याचे ते म्हणाले.या बाबतच्या कराराचे पानच कंत्राटीच्या फाईलमधून गायब असल्याचा धक्कादायक खुलासा बाल्या बोरकर यांनी केला.मनपाच्या शासकीय नस्तीतून एखाद्या खासगी कंपनीबाबतचे महत्वाचे पानच गायब होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगून कंपनी त्यांच्याकडील फाईल आम्हाला बघू देणार नाही,असाही खुलासा त्यांनी केला.

परिवहन समितीचा निर्णय हा मनपा आयुक्तांना बंधनकारक असतो,आयुक्तांना या कंपनीवर काय प्रेम आलं याचा उहापोह समितीच्या प्रस्तावात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी वित्त व लेखा अधिकारी यांना फोन करण्यापूर्वी परिवहन समितीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे बाल्या बोरकर यांनी सांगितले.आयुक्तांनी १५ डिसेंबर २०२० रोजी डिम्स कंपनीला १ कोटी ९२ लाख ९६ हजार ९२२ रुपयांचे भूगतान केले तर याच महिन्यात १५ जानेवारी २०२१ रोजी १ कोटी ९४ लाख ८४ हजार ५६२ रुपयांचे भूगतान केल्याचे त्यांनी सांगितले.हा सर्व पैसा डिम्सच्या पुढील बिलमधून वसूल करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला.

आयुक्तांनी जास्त बसेस रस्त्यावर आणावी,गर्दीमुळे करोनाचा धोका वाढला-
सध्या शाळा व महाविद्यालये सुरु झाली असल्यामुळे
आयुक्तांनी मर्यादित बसेस रसत्यावर न आणता संपूर्ण बसेस आता रस्त्यावर आणाव्यात अशी मागणी आज पत्र परिषदेदरम्यान बाल्या बाेरकर यांनी केली.मर्यादित बसेसमुळे आपली बसमध्ये होणारी गर्दी बघता शहरात करोनाचा पुन्हा वेगाने प्रादुर्भाव झाल्यास याला कारणीभूत सर्वस्वी हे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.राहतील असा इशारा त्यांनी दिला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या