

नागपूर,ता.७ जानेवारी: मी जेव्हा १९९७ मध्ये पहील्यांदा नगरसेवक झालो तेव्हा ते वर्ष स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीचे वर्ष होते. आज मी महापौर पदी शपथ घेतली तर काय योगायोग आहे! आता स्वातंत्र्याची हिरक जयंती सुरु आहे.त्यामुळे महापौर पदी काम करीत असताना माझे प्रत्येक कार्य मी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षीय हिरक जयंतीला वाहणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. ते महापौर कक्ष्ात आयोजित पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की मी सौभाग्यशाली आहे की मला एका वर्षापूर्वीच मी महापौर होणार असल्याचे माहिती होते.मी एकमेव महापौर असा आहे की ज्याचे दीड वर्षाआधीपासून महापौर पदासाठी अभिनंदन केले जात होते.आजच माझ्या मुलाने देखील म्हटले की ‘मी एक वर्ष वेटींग महापौर तर एक वर्ष खरोखरच महापौर झालो आहे‘.मी एकमेव असा महापौर आहे की ज्याला महापौर झाल्यानंतर काय करायचे याचे नियोजन करण्यासाठी तेरा महीन्यांचा कालावधी मिळाला,अशी मिश्किली देखील त्यांनी केली.
मागचे संपूर्ण वर्ष हे करोनामुळे आरोग्याच्या दृष्टिने अतिशय संवेदनशील गेले.मी स्वत:एकेकाळी आरोग्य समितीचा सभापती राहीलो असल्याने याविषयावर मी सविस्तर अहवाल तयार केला होता.सर्व वृत्तपत्रांनी तो जवळ-जवळ आठ दिवस प्रसिद्ध केला.त्यावेळी मी विरोधी पक्ष्ात होतो आता मात्र मी निर्णय घेणा-याच्या भूमिकेत असल्याचे ते म्हणाले.
गरिबांसाठी असणा-या मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ही विदारक स्थिती आहे की अश्या केंद्रांमध्ये कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर महिन्याकाठी पावणे दोन लाख रुपये खर्च होतात तर औषधांसाठी फक्त २२७० रु.उपलब्ध होतात!
प
रिणामी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी मी शहरात ७५ नवे ‘वंदे मातरम जन स्वाथ्य’आरोग्य केंद्रांची स्थापना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.नागपूर शहर हे ज्या प्रमाणे विकसित होत आहे त्यामानाने आउटर भागात पुरेशा अद्याप स्वाथ्य सेवा नागरिकांना उपलब्ध नाही.एनयूचएचचा तोच जुना ढांचा अद्याप कार्यरत आहे.यात बदल करुन या योजनेअंतर्गत इमारत,पाणी व विज ही मनपातर्फे पुरविण्यात येईल तर ही सर्व स्वाथ्य केंद्रे ही शहरातील स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चालविली जाईल.किमान पाच वर्षांसाठी त्यांना ती चालवावी लागेल.याबाबत लवकरच अहवाल तयार केला जाईल.विशेष म्हणजे या सर्व स्वास्थ केंद्रांची नावे ही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या नावावार न ठेवता ज्यांनी देशासाठी बलिदान केले अश्या परमवीर चक्र,अशोक चक्र प्राप्त करणा-या वीर सैनिकांच्या नावाने ठेवली जाईल,जेणेकरुन त्या त्या भागात या सैनिकांच्या प्रति सन्मानाची भावना निर्माण होऊन त्या भागातील तरुणांच्या मनात सैन्यात जाण्याची प्रेरणा निर्माण होऊ शकेल.
ज्याप्रमाणे ’सुपर-३०’ही आनंदकूमारने अजरामर केली त्याच धर्तीवर सुपर ७५ चालू करणार.यात २५ मुले ही अभियांत्रिक़ी तर २५ मुले ही वैद्यकीय तसेच २५ मुले ही एनडीएसाठी निवडली जाईल.मनपाच्या शाळेतील ८ व्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांचे परिक्ष्ेद्वारे यासाठी चयन केले जाईल.
त्यांना १२ पर्यंत शिक्ष् ण घेतानाच नि:शुल्क तज्ज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन केले जाईल.त्यांना प्रशिक्ष् ण देणारी मंडळी हे देखील निवृत्त अधिकारी असतील.ज्याप्रमाणे माजी महापौर नंदा जिचकार यांच्या कार्यकाळात दूर्गानगर येथील मनपा शाळेत एक महिना सैन्याचे प्रशिक्ष् ण देण्यात आले व फक्त या एका महिन्याच्या प्रशिक्ष् णामुळे या शाळेतील तीन मुलींना पुढे सैन्यात नोकरी मिळाली त्याप्रमाणे जर एका महिन्याच्या प्रशिक्ष् णातून तीन मुलींना सैन्यात जाण्याची संधी मिळू शकते तर वर्षभर असे प्रशिक्ष् ण मनपा शाळेत दिल्यास किती विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो,असे त्यांनी सांगितले.
याशिवाय आरबीजीजी विद्यालय सदर येथे ‘पोलीस डे केअर सेंटर’उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बिजली नगर भागात आजूबाजूला आदिवासींची वस्ती आहे.या केंद्राचा त्या भागातील मुलांना फायदा होईल.आदिवासी मुले मूळातच लढवैय्ये असतात.याचा पुढे राष्ट्राला फायदा होईल.
हॉकर्स हा विषय कायमच वादग्रस्त आहे.स्मार्ट सिटीला शोभेल असे स्मार्ट हॉकर्स झोन निर्माण होणे गरजेचे अाहे.नाममात्र शुल्क आकारुन मॅन्यूली ऐवजी ई-प्रक्रियेद्वारे यावर भरीव काम केले जाईल.
मनपा हद्दीत गरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत उदा.राजीव गांधी योजना,महात्मा फूले योजना,पंतप्रधन जनस्वाथ्य योजना मात्र जनतेला या योजनांची माहती नसते.याबाबत अनेक अडचणी त्यांना येतात.या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी मनपात एका विशेष कक्ष्ाची निर्मिती केली जाईल.
हॉकर्स यांना शासनाकडून १० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्याची योजना आहे.या कर्ज वाटपासाठी नोडल एजंसीही मनपाच आहे.ही योजना राबविण्यासाठी मनपात अद्याप अधिकारी,कर्मचारी नियुक्त नाही.त्यामुळे हॉकर्स हे या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.ही माहिती देण्यासाठी देखील मनपात विशेष कक्ष्ाची स्थापना केली जाईल.
मनपामध्ये अनेक माजी सैनिक हे आपल्या कामासाठी येत असतात मात्र दूर्देवाने त्यांच्यासोबत कसा व्यवहार होतो हे सर्वविदीत आहे.त्यांच्यासाठी देखील या पुढे मनपा मुख्यालयात एक विशेष कक्ष्ाची स्थापना करण्यात येईल.विशेष म्हणजे या कक्ष्ात माजी सैनिकच सेवा देतील.
मनपाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी जाहीरातींबाबतच्या धोरणामध्ये व्यापक बदल करण्यात येईल.याशिवाय अतिरिक्त उत्पन्नासाठी दूकानासमोरील नामफलकांच्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळवण्यात येईल.सध्या २० चौ.मी.च्या फलकांना मान्यता आहे.यापेक्ष्ा मोठ्या नामफलकांवर आता अधिभार लावला जाईल.
मनपाचे पाणी हे सर्वात आरोग्यदायी मानले जाते.मनपा आता या पाण्याचे मिनरल वॉटर लॉन्च करणार आहे. हे पाणी प्रति लिटर ५ रुपये ग्राहकांना पडेल.याचा फायदा मनपाचे उत्पन्न वाढण्यात होऊ शकेल.इतर खासगी कंपन्या हेच पाणी प्रति लिटर २० रु.दराने विक्री करीत असते.मनपाच्या पाण्याचा स्वाद हा चांगला असून आम्ही भारतीय रेल्वेमध्ये देखील स्पर्धेत उतरु.यामुळे मनपाला वर्षाला २५ ते ३० कोटींचे उत्पन्न मिळू शकेल.
या सर्व लोकापयोगी योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रशासनासोबत संवादावर भर दिला जाईल.संवादातून अनेक समस्यांचं निराकारण होत असतं.लीज वर दिलेल्या जमिनींबाबत देखील प्रभावी धोरण राबविले जाईल. ‘भय बिन होवे ना प्रित‘अशी म्हण सांगत ज्यांनी मनपाच्या लीजवरील जमिनीवर बांधकाम केले अथवा नाही केले त्यांना देखील अभय योजनेचा प्रभावी लाभ घेता येईल,असे धोरण आखले जाईल.
एकीकडे मनपा प्रशासन हे नगरसेवकांच्या विकासकामांसाठी पैसा नसल्याची सबब पुढे करते मात्र दुसरीकडे डॉ.गंटावार व डॉ.शीलू गंटावार यांच्या एकंदरित कार्यशैली बघता अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसून अश्या भ्रष्ट तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या वैद्यकीय अधिका-यांवर महापौर म्हणून काेणती भूमिका राहील?या प्रश्नाचे उत्तर देताना मुंढे आणि गंटावार हे विषय विसरुन आत पुढे जाणार असल्याचे ‘गूढ व चमत्कारिक’उत्तर त्यांनी दिले.
विशेष म्हणजे डॉ.गंटावार या एकाच वैद्यकीय अधिका-याच्या विरोधात याच महापौरांनी २० जून २०२० च्या सर्वसाधारण सभेत अक्ष्रशह: रण पेटवले होते,तब्बल चार दिवस महापौर दयाशंकर तिवारी यांनी फक्त डॉ.गंटावार तसेच त्यांची पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्या विरोधात सर्व पुराव्यानिशी आक्रमक भाषण दिले होते.तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ प्रभावाने त्यांना निलंबित करण्याचे आदेश ही दिले होते. तेच दयाशंकर तिवारी हे मात्र महापौर पदी रुजू होताच,गंटावार तसेच मुंढे प्रकरण विसरुन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. मुंढे आणि माझे वैयक्तिक वैर असल्याची चर्चा माध्यमांमध्ये भरपूर रंगली मात्र याच मुंढे यांनी माझ्या प्रभागासाठी तब्बल ६७ लाख रुपयांचे प्रावधान मंजूर केल्याची माहीती त्यांनी याप्रसंगी दिली.मी जर मुंढे यांच्यासोबत इतका भांडलो तर ६७ लाख मिळाले,जर प्रेमाने वागलो असतो तर आणखी जास्त मिळाले असते,अशी कोटी देखील महापौरांनी याप्रसंगी केली.
सहा इंग्रजी शाळा याच वर्षी शंभर टक्के सुरु करणार असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.याप्रसंगी मनपाचे प्रशासकीय अधिकारी हे चांगले असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.माझ्या समस्त विषयांवर त्यांनी ४८ तासात समाधान शोधले.मागील करोनाच्या एका वर्षाच्या काळात हेच शिकलो की मनपा प्रशासन हे एकटे संकटांचा सामना करु शकत नाही,२५ लाख नागरिकांना दररोज कम्यूनिटी किचनच्या माध्यमातून दररोज जेवण देणे इ.साठी शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून शक्य झाले त्यामुळेच वरील सर्व योजना या देखील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविल्या जातील जेणेकरुन मनपावर अर्थभार कमी राहील,हा एक संयुक्त उपक्रम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी आणि आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्यामध्ये खूप चांगल ट्यूनिंग राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कारण त्यांच्या मधील एक चांगला प्रशासकीय अधिकारी याच्याशी माझा जवळून परिचय झाला असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.




आमचे चॅनल subscribe करा
