Homeनागपूर न्यूजस्वराज्य मिळाले सुराज्य निर्माण करायची खरी गरज: नितीन गडकरी

स्वराज्य मिळाले सुराज्य निर्माण करायची खरी गरज: नितीन गडकरी

फॉरच्यून फाऊंडेशन ‘यूथ एम्पावरमेंट समिटचे’ उद् घाटन

नागपूर,ता. १३ मार्च: विदर्भातील अनेक युवकांना फॉरच्यून फाऊंडेशनच्या उपक्रमातून गेल्या सात वर्षांपासून रोजगार उपलब्ध होत आहे,फाऊंडेशनची ही अतिशय यशस्वी वाटचालच आहे.सुरवातीला ही संकल्पना प्रा.अनिल सोले यांनी सांगितली तेव्हा एवढा मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळेल अशी मला खात्री नव्हती.मात्र या उपक्रमामुळे तरुण पिढीला नवीन दिशा मिळाली.फॉरच्यून फाऊंडेशन हे उत्तम आणि चांगलं काम करीत आहे.देशात सर्वात मोठी समस्या ही गरीबी,भूकमरी आणि बेराेजगारीची आहे. युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने फॉरच्यून फाऊंडेशनची स्थापना झाली. युवकांना रोजगार मिळाला तर या तिन्ही समस्या सूटू शकतात.देशाला स्वराज्य मिळालं मात्र आता सुराज्य निर्माण करण्याची खरी गरज असल्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिपादीत केली.

ते फॉरच्यून फाऊंडेशनच्या यूथ एम्पावरमेंट समिटच्या ऑन-लाईन उद् घाटनाप्रसंगी बोलत होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले देशातील सर्वात मोठी समस्या आहेत गरीबी,भूकमरी आणि बेरोजगारी.गरीबीला जात,पात,धर्म,पंथ,भाषा,प्रांत नसतो. युवकांना रोजगार मिळाला तर बेरोजगारी,गरीबी दूर होईल आणि सर्वांना सन्मानाने जगता येईल.आज आपण महात्मा गांधीचं सगळ्यांचं स्मरण करतोय,स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करणार आहोत.पण हे स्वातंत्र्य मिळालं आहे याचं रुपांतर आता सुराज्य व रामराज्यात करायचे असल्याचे गडकरी हे म्हणाले.गांधीजींनी सुराज्याला ‘रामराज्य‘ म्हणाले होते आदर्श राज्याची त्यांनी कल्पना केली होती,आता आपण त्याला शिवशाही म्हणतो.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत.ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये राजा,पूत्र,पिता व पती कसा असावा या सर्व बाबतीतचा आदर्श मांडला ते प्रभू रामचंद्र आपले सर्वांचे दैवत आहे.महात्मा गांधीनीच म्हटले होतंे आम्हाला रामराज्य निर्माण करायचं आहे. त्यामुळेच आता आपल्यालाच हे रामराज्य आणि आदर्श सुराज्य तयार करायचे आहे.

हे सुराज्य गाव.गरीब, मजूर आणि शेतक-यांचे कल्याण करणारे असेल,गरीब माणसाला न्याय मिळवून देणारे असेल,प्रत्येकाला रोटी कपडा आणि मकान देणारे राहील.ख-या अर्थाने हे काम करायचे असेल तर तरुणाईला एक दृष्टिकोण एक मार्गदर्शन द्यावं लागणार आहे,हे काम खूप मोठे आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जर आपण चांगलं काम केलं तर देशात रामराज्य प्रस्थापित होईल.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी आता मनपात रामराज्य प्रस्थापित करण्याचं ठरवलंय तर भ्रष्टाचारमुक्त,लोकांना त्रास न होणारं प्रशासन,स्वच्छ नागपूर,सुंदर नागपूर,प्रदुषणमुक्त नागपूराची संकल्पना राबवावी लागेल.त्या नागपूरमधून इतिहास,संस्कृतीचं जतन करुन दुसरीकडे आर्थिक विकासाचा प्रयत्न करणे म्हणजे रामराज्य प्रस्थापित करण्यासारखेच असल्याचे गडकरी हे म्हणाले.

भाषण देऊन काम होत नसतात,प्रत्यक्ष् कृती झाली पाहीजे. नुसते बोलण्यावर नव्हे तर कृतीवरच विश्‍वास ठेवला जात असतो.फॉरच्यून फाऊंडेशनने विशेषत:रोजगार देण्याच्या बाबतीत अतिशय उत्तम काम केले आहे.मी पण नेहमी विचार करतो नागपूरच्या लोकांनी मला निवडून दिले या लोकांसाठी मी काय केले?याचा अभ्यास मी केला.मिहानमध्ये ५६ हजार ८०० लाेकांना रोजगार मिळाले.मेट्रोमध्ये १० हजार रोजगार दिले.सिम्बॉयसिस,एम्स,मॅनेजमेट इन्सिट्यूट कॉलेज,लॉ विद्यापीठ नागपूरात आणले,या सर्व प्रयत्नातून आपण नागपूर शहराच्या व विदर्भाच्या मूलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला.आज आपण ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना मांडली ती संकल्पना आता अंतिम टप्प्यात आहे.या ३६०० कोटींच्या ब्रॉडगेज मेट्रोमुळे देखील विदर्भात कमीत कमी ३० हजार तरुणांना काम मिळणार आहे.याशिवाय ही ब्रॉडगेज मेट्रो ज्या शहरांशी जोडल्या जाणार,त्या प्रत्येक स्टेशनवर अनेक रोजगार निर्माण होणार आहेत.गाडीतच रेस्टॉरेंट आहे.दोन डब्बे मालगाडीचे असतील.प्रत्येक प्रकल्पातून रोजगार निर्मितीचा विचार केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

याप्रसंगी गडकरी यांनी मिहानमध्ये आलेल्या द सॉल्ट कंपनी,राफेल तसेच बोईंग विमानांचे उत्पादन इ.चे ही विस्तृत विवेचन केले.

सोले यांनी ‘फ्यूचर फॉरच्यून फाऊंडेशन’कडे आता लक्ष् द्यावे-

खादी ग्रामोद्योगमध्ये देखील सोले यांनी खोलात जाऊन अभ्यास करावा व यातून देखील रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा सल्ला गडकरी यांनी याप्रसंगी दिला. मला प्रत्येक खेड्यात दोन उद्योग सुरु करायचे आहे.पाचगावात चिंध्यापासून गालिचे तयार केले जात आहे. ४० हजार रुपयात एक महिला आपल्या घरी हा उद्योग सुरु करु शकते.४०० ते ५०० रुपयात हा गालिचा मिळतोय.बेला,देवाडा,धापेवाडा,उमरेड जवळील गाव इ.सहा ठिकाणी संस्था स्थापन करुन ३० महिलांना मार्गदर्शन यासाठी करणार आहोत.याशिवाय शेणापासून ऑईल पेंट तयार केला तो देखील एवढा उत्तम आहे वरुन बाजातील पेंटपेक्ष्ा ५० टक्के स्वस्त आहे याला ही उत्तम प्रतिसाद ग्राहक आणि उद्योगांकडून मिळतोय. खेडय्ातून ५०० रु.चे शेण जरी विकलं तर महीन्याला हजारो रुपये शेतक-यांना मिळतील.याशिवाय गो मूत्रातून अम्यूनो एसिड तयार केले तर कोणत्याही शेतक-याला आत्महत्या करावी लागणार नाही.प्रत्येक ग्रामीण घरात दोन उद्योग तरी सुरु झाले पाहिजे,असा माझा प्रयत्न आहे.

स्फूर्ती योजनेतून आम्ही ज्याप्रमाणे क्लस्टर तयार केले मात्र प्रत्येकाला त्यात सहभाग घ्यावा लागेल.बोटांनी मलम लाऊन यश मिळणार नाही.आता आपल्याला सोलरचा चरखा प्रत्येक झोपडपट्टीतील घरात पोहोचवायचा आहे. त्यातून सुंदर साड्या तयार होत आहेत.त्यावरील ऑरगेनिक रंग अतिशय उठून दिसतात.हे सोलर चरखे आता घरोघरी दिसले पाहिजे.

अनिल सोले यासारख्यांनी पुढे आले पाहीजे.कुंभार समाजाला ही आपण एक पॉट व्हिल दिले.आपल्या इथे लाकडातही खूप काम करण्यासारखं आहे. स्वयंरोजगार म्हणून कृषि आणि ग्रामीण क्ष्ेत्रात कसे काम करता येईल हे बघावे,पर्यटन क्ष्ेत्रातही अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.येणा-या काळात अश्‍या लोकांना प्रोत्साहित करणे,त्यांचे मार्केटिग करण्यासाठी सहाय्य करणे त्या लोकांना विविध योजनांच्या खाली मदत केली तर फॉरच्यून फाऊंडेशनचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल.त्यामुळे सोले यांनी आता ’फ्यूचर फॉरच्यून फाऊंडेशनकडे’ ृृलक्ष् द्यावे असा सल्ला गडकरी यांनी दिला.

हे महोत्सवासारखे करण्यासारखं काम नाही,हे प्रदीर्घ काळ चालणारे काम असून सर्वांच्या प्रयत्नातून लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून या उपक्रमाला शुभेच्छा प्रदान केल्या.याप्रसंगी बोलताना सातत्याने गेली सहा वर्ष फॉरच्यून फाऊंडेशनने गेल्या सहा वर्षांपासून ’युथ एम्पावरमेंट समिट’ घेतले व आपल्या विदर्भाच्या युवकांना रोजगार प्रदान करण्याचा संधी उपलब्ध करुन दिल्या. प्रा.सोले यांनी हा अतिशय अभिनव उपक्रम राबवला असल्याचे ते म्हणाले.प्रत्येक वेळी नवनवीन संकल्पनांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विदर्भातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला.फॉरच्यून फाऊंडेशनचा यूथ एम्पावर समिट हा असा एक इंटरफेस तयार झाला आहे,उद्योग,व्यापार,रोजगार निमिर्ती करणारे असतील व रोजगारांची ज्यांना गरज आहे या सर्वांना एकत्रित जोडण्याचे काम हा इंटरफेस करतो.गेल्या वर्षी विविध वित्तीय संस्थांना जोडण्याचं काम देखील सोले यांनी केले.विविध शासकीय व खासगी योजना या माध्यमातून आपल्या युवकांना अतिशय चांगले मार्गदर्शन हे समिट करीत आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत अभियान‘ हे देशामध्ये सुरु झाले.या अभियानाच्या माध्यमातून २० लाख कोटींची गुंतवणूक करुन या देशातील लोकांना ज्याप्रकारे उर्जा देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला त्यातून अनेक रोजगार निर्माण होणार आहे.तोच प्रयत्न यूथ एम्पावर समिटच्या माध्यमातून होताना दिसतोय,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.पुढे ही कोविडमुळे खचून न जाता ही संधी आहे असे समजून आलेल्या संधींचा फायदा घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.सोले यांनी हा अभिनव उपक्रम सुरु करुन विदर्भाच्या विद्यार्थ्यांकरिता एक नवीन दालन उघड केलंय,रोजगाराचं एक नवीन साधन त्यांनी उपलब्ध करुन दिलंय या संपूर्ण उपक्रमांच्या मागे आम्ही संपूर्ण पाठीशी उभे आहोत असे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की लागोपाठ सातव्या वर्षी फॉरच्यून फाऊंडेशनचे हे समिट सुरु आहे.अनिल सोले हे महापौर होते त्यानंतर ते आमदार बनले.ते संपूर्ण कार्यकाळात नवीन संकल्पांच्या आणि कल्पक योजनांच्या विविध उपक्रम राबवित आले आहेत.योग्य व्यक्तिला योग्य काम करण्याची संधी मिळणे किवा योग्य कामासाठी योग्य व्यक्ति मिळणे हीच सर्वात मोठी संधी असते.मुंबई,पुणे,औरंगाबादेत फार मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत मात विदर्भात औद्योगिरकरणाचे प्रमाण अतिशय कमी,त्यामुळेच माझ्या विदर्भाच्या तरुणाईला रोजगार मिळावा यासाठीच सोले यांनी सतत काम केलंय.पहील्याच वर्षी त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादामुळे त्यांना आणखी उर्जा मिळाली.हजारो युवकांन विविध उद्योगांमध्ये राेजगार मिळाला.अनेकांनी स्वयंरोजगार सुरु करुन इतरांना रोजगार प्रदान केला.केंद्रिय मंत्री नेहमी सांगतात नोकरी मागणारे नाही,नोकरी देणारे बना,सोले यांनी हे काम खूप उत्तमरित्या साधले.मी देखील नागपूर महानगरपालिकेत मां जिजाऊ यांच्या नावाने प्रकल्प सुरु करतोय.या प्रकल्पात महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या प्रमाणे गडकरी हे बहूआयामी आणि उपक्रमशील नेतृत्व मानले जातात त्याप्रमाणे सोले यांच्या सहकार्याने हा जिजाऊ प्रकल्प आम्ही मनपात राबविणार असल्याचे महापौर हे म्हणाले.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार सुधाकर देशमुख म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात‘या त्यांच्या उद् बोधनात सोले यांनी महापौर असताना नागपूरात राबविलेला ‘पोर्णिमा दिवस‘चा खास उल्लेख केला असल्याची आठवण सांगितली.सोले हे कल्पक व्यक्तिमत्व असून आपली कल्पना सिद्धीस नेण्याचे कसब त्यांच्यात पूरेपूर असल्याचे देशमुख यांनी सांगितले.सातत्याने काम करणे सोपे नाही मात्र सोले यांनी विविध उद्योग,वित्तीय संस्था,बॅका,विद्यार्थी एकाच छता खाली अाणण्याचं कठीण काम केलं व दरवर्षी करीत आहेत एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी त्यात एअरलाईन्स व एअर इंडियाचीही भर घातली.वैदर्भिय तरुणांना करोनाच्या काळातही रोजगार देण्याचे ध्येय त्यांनी सोडले नसल्याचे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले.

आभार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष् सहारे यांनी मानले.

Latest बातम्या