Homeनागपूर न्यूजस्मार्ट सिटीत पाच महिन्यांनी नागरिकांची सांडपाण्याच्या दुर्गंधीपासून अर्धी सुटका!

स्मार्ट सिटीत पाच महिन्यांनी नागरिकांची सांडपाण्याच्या दुर्गंधीपासून अर्धी सुटका!


मनपाचा असाही सुस्त कारभार

नागपूर,ता. २ ऑक्टोबर: महानगरपालिकेने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात मोठा गाजावाजा करुन नागरिकांच्या तक्रारीसाठी ॲप लॉन्च केला,यावर सोनेगाव येथील ममता सोसायटीतील प्लॉट क्र. ५८ आणि ५९ या रिकाम्या प्लॉट्समध्ये पावसाचे पाणी तसेच सिवरेजचे सांडपाणी जमा होऊत अत्यंत दूर्गंधी सुटली,परिणामी येथील सोसायटीतील नागरिकांचे जिने दूर्भर झाले,गेल्या पाच महिन्यांपासून येथील नागरिकांनी सातत्याने या ॲपवर तक्रारी नोंदवल्या याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील तक्रार असल्याने महापौर संदीप जोशी तसेच या प्रभागातील चारही नगरसेवकांकडे सातत्याने तक्रारी नोंदवल्या मात्र मनपाच्या सुस्त प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून या भागातील नागरिकांना घरातच दारे-खिडक्या लावून बंदिस्त होण्यास अक्ष् रश: बाध्य केले,आज गांधी जयंतीच्या दिवशी मनपा प्रशासनाला जाग आली असून आज या प्लाटॅवर जेसीबी पाठवण्यात आली व अर्धे काम उरकले!

परिणामी,मनपाने जरी आज पाच महिन्यांनंतर येथील नागरिकांच्या त्रासाची दखल घेतली असली तरी गेल्या पाच महिन्यांपासून येथील नागरिकांचं जगणं हे अत्यंत तापदायक परिस्थितीत गेलं,यामुळे आज मनपातर्फे कामाला सुरवात झाली असली तरी येथील नागरिक मनपाच्या एकदंरित भोंगळ कारभारावर व्हॉट्स ॲपवर चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत.या भागात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य आहे,मधुमेहाचे रुग्ण आहेत, लहान नातवंडे आहेत,गेल्या पाच महिन्यांपासून दूर्गंधीने त्रस्त आणि बेजार झालेल्या येथील नागरिकांनी केवळ मनपाच्या सुस्त कारभारामुळे जो भयंकर त्रास सहन केला आहे,तो त्रास विसरायला तयार नाहीत.

हा भाग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक क्ष्ेत्र दक्षिण-पश्‍चिममध्ये येतो,महापौर संदीप जोशी यांचा हा प्रभाग आहे तरी देखील सांडपाणी जमा होऊन सुटलेल्या दुर्गंधीच्या त्रासातून मनपाला पाच महिन्यांचा कालावधी लागला,याबाबत येथील नागरिक चांगलेच संतप्त आहेत.मनपातर्फे ना त्या रिकाम्या प्लॉट मधील सतत वाहणारे सांडपाणी थांबविण्याची तसदी घेण्यात आली ना त्या ठिकाणचा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्लॉट धारकावर मनपातर्फे कोणतीही दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली नाही,परिणामी त्या तीव्र व घाणेरड्या दूर्गंधीतच गेल्या पाच महिन्यांपासून येथील नागरिकांना घरातील दारे-खिडक्या लावून जगावे लागले.या दूर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास न्यायालयात धाव घेतली जाईल,असा देखील इशारा मनपाच्या ॲपवर येथील नागरिकांनी दिला तरीदेखील महापौरांच्या प्रभागातच मनपाचे अधिकारी हे सुस्तच राहीले.

येथील नागरिक हे असहाय होऊन अापल्या घरात वारंवार औषधींची फव्वारणी करीत राहीले मात्र तरी देखील त्या दुर्गर्धीपासून नागरिकांना सुटका मिळाली नाही.या परिसरातील विहीरांचे पाणी देखील यामुळे गढूळ झाले. रात्रभर घाणेरड्या वासामुळे या परिसरातील नागरिक हे रात्र-रात्रभर झोपू शकले नाहीत.परिणामी येथील एका नागरिकाने तर येथील नगरसेवकांना तसेच मनपाच्या अधिका-यांना मनपाच्या ॲपवर खुले आवाहन दिले ‘माझ्या घरी छोटे बाळ आहे,बाहेर करोना पसरलेला आहे, काल रात्रभर त्या घाण वासामुळे माझी झोप झालेली नाही, माझ्याकडून सगळे जवाबदार कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सादर माझ्या घरी राहण्याचे निमंत्रण आहे, चांगला पाहूणचार करीन,एक दिवस राहून आणि तो घाण वास सहन करुन दाखवावे,ही विनंती!’

एवढ्या जीवघेण्या लढाईनंतर एकदाचे मनपाचे कर्मचारी आज गांधी जयंतीच्या दिवशी एक जेसीबी घेऊन अखेर या ठिकाणी पोहोचले. परिणामी येथील नागरिकांनी व्हॉट्स ॲप ग्रूपवर ‘श्री महात्मा गांधीजी आणि श्री लाल बहादुर शास्त्रीजींच्या जन्मदिवसाची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.या वर्षी हे हमखास आठवण राहील कारण मागच्या ५ महिन्यापासून आम्ही सांड पाण्याचा जो त्रास सहन करत होतो,तो आज ५० टक्के दूर करण्यात आला आहे,या कामासाठी मीनाक्ष्ी तेलगोटे, माया हाडे, माननीय महापौर,गजानन कापसे, लहूकुमार, मनपाचे राजू चव्हाण, आनंद लामसांगे आणि सहकारी सगळे कर्मचा-यांचे हार्दिक धन्यवाद करतो, आणि ५० टक्के शिल्लक राहिलेले कार्यही लवकर पूर्णत्वास येईल आणि आम्हा नागरिकांच्या आरोग्याला १०० टक्के धोक्यापासून रक्ष् ण होईल ही अपेक्ष्ा करतो….!’

असे मॅसेज फॉरवर्ड झाले. थोडक्यात स्मार्ट सिटी,स्वच्छ सिटीचा टेंभा मिरविणा-या महराष्ट्राच्या उपराजधानीत नागरिकांची मात्र अशी दारुण दशा आहे.

Latest बातम्या