
नागपूर,ता. ९ ऑगस्ट: सुप्रसिद्ध अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे किंबहूना तथाकथित हत्येचे पडसाद आता मुंबई व्हाया पटना ते आता दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारच्या दोन तपास यंत्रणा इडी व सीबीआय देखील या संपूर्ण प्रकरणाची ‘सखोल’ चौकशी करीत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे देखील नाव गोवल्या गेल्याने बघता-बघता हे हाय प्रोफाईल आत्महत्यचे प्रकरण महाविकास आघाडीवरच गंडांतर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नसून याच प्रकरणामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार गडगडणार असल्याचे भाकीत काही राजकीय नेतेच खासगीत वर्तवित आहेत! सध्या संपूर्ण प्रसार माध्यमांवर सुशांतसिंह याच्याच बातम्यांचा भरणा आहे. दररोज नवनवे व्हिडीयोज,व्हॉट्स ॲप चॅट,त्याचे रियासाेबतचे संबंध,कुटुंबियांसोबतचे संबंध,दिशाच्या पार्टीचा व्हिडीयो या बातम्यांनीच देशभर सुशांतच्या फॅन्सच्या मनाचा ताबा घेतला आहे.त्यांनाही महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेली राजकीय भूमिका,सीबीआय चौकशीला दिलेला नकार, सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेतलेली धाव,या बाबी खटकत आहेत.
सुशांतसिंह राजपूतची खासगी सचिव दिशा सानियाल हिचा ८ जून रोजी ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्याच पार्टीचा व्हिडीयो हा माध्यमांमध्ये व्हायरल झाला असून या व्हिडीयोमध्ये ती खूश दिसत होती.पार्टीचा आनंद घेताना दिसत होती.मग अचानक असे काय घडले की तिने एका तासात आत्महत्या केली?या प्रश्नाचे धूके हे मुख्यमंत्री बंगल्यापर्यंत पसरले आणि पुढे मंुबई पोलिसांचीही भूमिका ही संशयाच्या भोव-यात आली. सुशांतसिंहच्या वडीलांनी के.के. सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन अनेक गंभीर आरोप केले.पुढे हे प्रकरण बिहार सरकारच्या मागणीमुळे केंद्राद्वारे सीबीआयकडे सोपविण्यात आले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सरकार मात्र येत्या एका महिन्यात कोसळणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे!सीबीआयने हा संपूर्ण तपास तातडीने आपल्या हातात घेऊन पाच लोकांच्या विरोधात आरोप दाखल केले आहे.तपासाची दिशा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे वळताच महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार हे निश्चित. आदित्य ठाकरे यांनी अद्याप या संपूर्ण प्रकरणावर कोणताही खुलासा केला नाही.त्या दिवशी सूरज पांचोली यांच्या पार्टीत आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते,याच पार्टीत दिशासोबत बलात्काराची घटना घडली व तिला चौदाव्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आल्याची चर्चा मााध्यमात उमटली आहे.
मृत्यूपूर्वी तिने सुशांतसिंहला घडलेली घटना सांगितली व गुन्हेगारांची नावे ही सांगितली.तिच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह हा खूप अस्वस्थ होता. तो गप्प बसणार नाही याची खात्री असल्यामुळेच त्याचा देखील गळा आवळण्यात आल्याची चर्चा माध्यमात आहे.. या सर्व गोष्टींचा तपास आता केंद्राच्या अधीन असणारी तपास यंत्रणा सीबीआय करीत असली तरी या तपासातून जो काही निकर्ष निघणार तो राज्यातील सरकारवर गंडांतर आणणाराच असेल,असे सांगितले जात आहे.
या तपासात आदित्य ठाकरे यांच्यावर दोषारोपण निश्चित झाल्यास एक तर उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्ष्ासोबत तडजोड स्वीकारावी लागेल,अथवा राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्र्यांचे पद सोपवावे लागणार आहे आणि या दोन्ही गोष्टी शिवसेनेसाठी मारक ठरणार आहेत.सध्या राष्ट्रवादीकडून या सर्व बाबींवर खंडना करणारे कोणतेच बयाण आले नसल्याने देखील या मागे मोठे राजकारण दडल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने शेवटी शिवसेनेचीच कोंडी होणार असून हे प्रकरण राज्यात मोठे राजकीय वादळ आणणार हे मात्र निश्चित.
शिवसेने नेते संजय राऊत यांनी मात्र यात उडी घेत पाटणा पोलिसांच्या खाकी वर्दीमागे राजकीय वस्त्रे असल्याचा आरोप केला आहे.मध्यप्रदेश व राजस्थान नंतर आता महाराष्ट्रासाख्या मोठ्या राज्याकडे भाजपचे डोळे लागले असून सुशांतसिंहची आत्महत्या व यानंतर घडलेले राजकारण यामुळे त्यांना आयतीच संधी मिळाली आहे.
दोन जीव ऐन तारुण्यात जगातून निघून गेलेत किंबहूना जगातून नाहीसे करण्यात आले.या सर्व राजकारणात दिशा सालियान व सुशांतसिंहच्या कुटुंबियांना खरा न्याय मिळणार आहे का?हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.

आमचे चॅनल subscribe करा