
ना कार्यकर्ते समाधानी ना पत्रकार
डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२८ ऑगस्ट: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नागपूर दौरा याची मागील बरेच दिवसांपासून प्रचार-प्रसार माध्यमातून चर्चा होती.आगामी महानगरपालिकेच्या निवडणूका बघून सुळे यांचे आगमन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फूंकणार असल्याचा दावा ही केला जात होता मात्र गणेशपेठ येथील पक्ष्ाच्या कार्यालयात शहर व ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेले सुळे यांचे मार्गदर्शन हे अनेकांना पचनी पडले नाही तर अनेकांच्या समजण्यापलीकडचेही ठरले,असाच सूर त्यांच्या हलक्याफूलक्या शब्दातील मागर्दशनानंतर कानी पडला,याशिवाय शहराध्यक्ष् दुनेश्वर पेठे यांच्या घरी हिवरीनगरमध्ये घेण्यात आलेल्या सुळे यांच्या पत्र-परिषदेत अनेक राष्ट्रवादीचे नेतेच गैरहजर राहीले तर गंगा-जमुनासारख्या सध्या नागपूरात धगधगत असणा-या प्रश्नावरही त्यांनी गोलमोलच उत्तर दिल्याने पत्रकारांचेही समाधान झाले नसल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात उमटली.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘सब कुछ दुनेश्वर पेठे’याचेच दर्शन घडले.दोन वेळा आमदार पद भूषवणारे माजी आमदार दिनानाथ पडोळे यांचे स्थान मंचावर नसून समोर श्रोत्यांमध्ये होते!याशिवाय माजी शहराध्यक्ष्ांना देखील सन्मानाने मंचावर आतापर्यंत जागा असायची,भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रम किवा उपक्रमात माजी आमदार सुधाकर कोहळे यांना आजही मंचावर बरोबरीचं स्थान मिळतं,मात्र राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष्ांची त-हाच निराळी असल्याने माजी शहराध्यक्ष् अनिल अहीरकर तसेच दिलीप पनकुले यांना मंचावर स्थानच नव्हते,परिणामी एवढं सन्मानीय पद हे देखील श्रोत्यांच्या श्रेणीत गणल्या गेलं,मंचावर फक्त मा.आ. सुबोध मोहिते,खासदार सुप्रिया सुळे,दुनेश्वर पेठे व शब्बीर विद्रोही यांना स्थान मिळाले.
आतापर्यंत उपराजधानीत राष्ट्रवादी पक्ष्ाच्या सर्व कार्यक्रमात माजी शहराध्यक्ष्,उपाध्यक्ष्,माजी महासचिवांना देखील सन्मानाने स्थान असायचे मात्र ‘सब कुछ पेठे’यांच्या कार्यकाळात ही सर्व सन्मानीय पदे,पदे न राहता फक्त ‘ भंगार खुर्च्या’झाल्यात,यावर बरेच ‘मंथण’कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर रंगले..
यावर ‘कहर‘म्हणजे पेठे यांनी गेल्या दोनच महिन्यात शहरात राष्ट्रवादी ‘आता नागपूर शहरात पक्ष् वाढताेय,गेल्या दोनच महिन्यात शहरात पक्ष् वाढला’यासारखी त्यांच्या भाषणातील विधाने तर अनेकांना ‘घायाळ’करुन गेली!‘आयतावर रायतं’अशी मराठीत एक म्हण आहे,आतापर्यंत पक्ष्ाच्या माजी शहराध्यक्ष्ांनी,उपाध्यक्ष्,पदाधिका-यांनी पक्ष् वाढीसाठी घेतलेले प्रयत्न,परिश्रम एकाच वाक्यात पेठे यांनी ‘नगण्य’ ठरवले.अनेक प्रभागात माजी शहराध्यक्ष्ांच्या परिश्रमातून आयती कार्यकारिणीच पेठे यांना ‘चांदीच्या चमच्यात’ मिळाली असूनही नामोल्लेखातून त्यांच्या परिश्रमाला सुळे यांच्यासमोर बाद करण्यात आल्याची ठेच अनेकांना ह्दयाचा लचका तोडून गेली.पक्ष् एका रात्रीत वाढत नसतो,त्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या असतात,असे असतानही दुनेश्वर पेठे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नसल्याची खंत कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनपर मेळाव्यानंतर व्यक्त झाली.
एवढंच नव्हे तर पक्ष् सोडून गेले व पक्ष्ात पुन्हा आलेत त्यांनाच भाषणाची संधी मिळाली मात्र जे पक्ष्ाचे निष्ठावंत आहेत त्यांना पेठे यांच्या ‘सब कुछ पेठे‘उपक्रमात डावलण्यात आल्याचे शल्य अनेकांनी खासगीत बोलून दाखवले.
हे ही नसे थोडके,म्हणून शहरातील बहूचर्चित,बदनाम बुकींचा भरणा पक्ष्ात करण्यात येत असल्याची तक्रार देखील पक्ष्ाच्या निरीक्ष् कांकडे मेळाव्यात करण्यात आली,पक्ष्ात अश्या लोकांचा भरणा झाल्यास मतदारांमध्ये पक्ष्ा विषयी वेगळा संदेश जाईल,अशी साशंकता अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
‘सब कुछ पेठे‘या उपक्रमातील पुढील टप्पा होता हा सुळे यांच्या नियोजित पत्र परिषदेचा.नागपूर शहरात सहसा कोणत्याही पक्ष्ाचे खासदार,आमदार,मंत्री,राज्यांचे मुख्यमंत्री आले असता शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘प्रेस क्लब’ येथे त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली जाते,फार फार तर पक्ष्ंाच्या कार्यालयात ते पत्रकारांसोबत वार्तालाप करतात मात्र पेठे यांच्या ‘खासगी‘(पक्ष्ीय नव्हे)उपक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्र परिषद पेठे यांच्या हिवरीनगर म्हणजे नागपूरच्या एका कोप-यात असणा-या घरी आयोजित करण्यात आली होती,याबाबत देखील पत्रकार वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पेठे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्र परिषद आयोजित न करता, त्यांच्या घरी पत्रकार परिषद आयोजित करुन पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांना नेमका कोणता ‘संदेश’देण्याचा प्रयत्न केला?यावर ही बराच ‘खल रंगला’व खलबते’ झाली.फक्त स्वत:च्या ‘अभिषिक्त वर्चस्वाची’ जाणीव करुन देण्याच्या उद्देशाने पेठे यांनी हा ‘अनाठायी अट्टहास’ केला असल्याचा संताप खासगीत व्यक्त होत आहे.
‘
दुष्काळात तेरावा महिना‘म्हणीप्रमाणे पत्रकार व माध्यमकर्मी हे शहराच्या एका कोप-यात असणा-या पेठे यांच्या घरी पत्र परिषदेला पोहोचले मात्र या परिषदेतून ‘ नागपूरच्या संदर्भात राजकीय आणि बौद्धिक खाद्य’ अनेक माध्यमकर्मींना न मिळाल्यामुळे काही पत्रकार व माध्यमकर्मी ‘चरफडतच’माघारी परतले.
करोनामुळे प्रत्येकच पक्ष्ात संघटनात्मक बदल घडले,संघटना काहीश्या माघारी पडल्या,आता करोनाचा प्रार्दुभाव थोडा कमी झाल्याने संघटनेला बळकटी देण्यासाठीच हा दौरा नियोजित केला असल्याचे सुळे यांनी सांगितले मात्र संघटनेला बळकटी देण्यासाठी त्यांचा हा एकमेव दौरा पुरेसा ठरणार नसून शहराध्यक्ष् यांना देखील ‘सब कुछ पेठे‘मनोवृत्तीतून बाहेर पडून जुने,ज्येष्ठ,नवीन यांच्या सोबतीने ‘प्रबळ‘ भाजपसमोर निवडणूकीचा सामना करावा लागणार आहे,तेव्हाच ‘मोठ्या’नेत्यांची ही ‘गोड सुरवात’ यशस्वी झाली,असे म्हणता येईल.
गंगा-जमुना प्रश्नावर बोलताना,मी एका पक्ष्ाची बाजू ऐकली आहे,दुसरी बाजू ऐकून घेतल्यावरच यासंदर्भात काही बोलता येईल,असे सांगून सुळे यांनी धगधगणा-या प्रश्नावर वेळ मारुन नेली.परिणामी,खासदार सुप्रिया सुळे यांचा नागपूर दौरा हा राजकीय नसून ‘अनौपचारिक‘दौराच ठरला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

आमचे चॅनल subscribe करा