

नागपूर,ता.१२ सप्टेंबर २०२२:महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाचे मुखपत्र असणारे वृत्तपत्र दैनिक ’सामना’ला आता राज्यातील वाचकांनी गांर्भीयाने घेणे सोडून दिले असल्याची जळजळीत टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.दैनिक सामनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ओढलेल्या ताशे-यांसंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
या संदर्भात बोलताना ते म्हणाले,की सामनासारख्या एखाद्या वृत्तपत्रात कोणाविषयीही काय लिहले जातेय किवा काय लिहल्या जात नाही,यावर बोलणे खरे तर संयुक्तीक होणार नाही.मात्र ‘सामना’मध्ये जर देशाच्या गृहमंत्र्यांविषयी,सहकार मंत्र्याविषयी व आमच्या भाजपचे नेते अमित शहा यांच्याविषयी वैयक्तीक टिका-टिपण्णी केली असल्यास आम्हाला त्या संदर्भात बोलावेच लागेल.
अश्याप्रकारे लिहण्याचा,वैयक्तीक टिका करण्याचा अधिकार कोणालाही नाही.दैनिकांना एखाद्या राजकीय नेत्याच्या धोरणांचे,कामाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार संविधानाने निश्चितच लाेकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला दिला आहे मात्र कोणावरही एखाद्या वृत्पत्राच्या आडून,वैयक्तीक ताशेरे ओढण्याचे काम होत असेल तर त्याचे चिंतन आता या वृत्तपत्राच्या मालकानी व संपादकानीच करण्याची गरज असल्याचे ॲड.मेश्राम म्हणाले.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील भारतीय जनता पक्ष हा पहील्या क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे.सगळ्यात जास्त पदाधिकारी,कार्यकर्ते व नेते असणारा हा पक्ष आहे तरी देखील,आमच्या नेत्यांच्या आर्शिवादामुळे आमच्या ऐवजी शिवसेनेचा महापौर मुंबईत झाला,हे त्यांनी विसरु नये.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे तसेच मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्टपणे घोषित केले आहे, येणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत यंदा भाजपचा महापौर असणार आहे,त्यामुळे येणा-या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपचा परचम लहरवणार असल्याचा भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास असल्याचे सांगून सामनावर परखड ताशेरे त्यांनी ओढले.

आमचे चॅनल subscribe करा