Homeनागपूर न्यूजसरत्या आठवड्यात.... दोन्ही मुंढेंनी गाजला महाराष्ट्र

सरत्या आठवड्यात…. दोन्ही मुंढेंनी गाजला महाराष्ट्र

(रविवार विशेष)

नीतीमत्तेतील चूक आणि चारित्र्याचाही कस

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ जानेवारी: सरता संपूर्ण आठवडा हा महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या खळबळजनक आरोपामुळे गाजला.यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.सामाजिक माध्यमात यावर बरेच चर्वितचवर्णन ही झाले,सरतेशेवटी अनेकांचे मत हेच पडले,धनंजय मुंडे यांनी केलेली ही नीतीमत्तेची चूकच आहे,तर ज्या रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर बलात्कारसारखा गंभीर आरोप लावला त्या मुंडे यांच्या दुस-या पत्नीच्याच सख्ख्या भगिनी असून आपल्याच बहीणीच्या घरात डाका टाकण्याचा एखाद्या महिलेचा हा अशलाघ्य प्रकारही अनेकांना रुचला नाही.चारित्र्य असलेली कोणतीही भारतीय स्त्री ही आपल्याच बहीणीच्या नव-यासोबत आपसी सहमतीने शय्यासोबत करणार नाही,केलाच तर त्याला बलात्काराच्या चौकटीच बसविण्यापेक्ष्ा विश्‍वासघाताच्या भावनेत बसविणे जास्त योग्य झालं असतं. मात्र जी स्त्री आपल्या बहीणीचाच विश्‍वासघात करते तिला तरी विश्‍वासघाताचा आरोप करण्याची नीतीमत्ता उरते का?

स्वत:सोबतच आपल्याच सख्ख्या मोठ्या बहीणीचा संसार चव्हाट्यावर आणणारी ही स्त्री अतिशय देखणी असून मूळात एक गायिका असल्याचे सांगितल्या जात आहे.पश्‍चिम उपनगरातील डी.एन.नगर सहायक पोलीस आयुक्तांकडे तिचा जवाबही नोदवण्यात आला.धनंजय मुंडे यांनी आपला व्हिडीयो बनवून शारीरिक संबंध स्थापित केेले,त्याबाबत आपण बहीणीला सांगण्याचा प्रयत्न ही केला,मात्र धनंजय मुंडे यांनी दवाब टाकून दिशाभूल केल्याचे रेणू शर्माने पोलिसांना सांगितले.याच रेणू शर्मावर भाजप नेते कृष्णा हेगडे तसेच मनसेचे मनीष धुरी यांनी अतिशय गंभीर आरोप केले.कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मावर आरोप करताना २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करीत होती असं सांगितलं.

अश्‍या या रेणू शर्मानी जेव्हा अन्याय झाला तेव्हाच ही बाब जगासमोर का नाही आणली?हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहतो.‘बलात्कार’हा अतिशय संवेदनशील शब्द असून अलीकडच्या काळात ‘अनेकदा’आपसी सहमतीने केलेल्या सहवास सुखाला देखील ‘बलात्कार’च्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याची जणू प्रथाच सुरु झाली आहे.दूर्देवाने असेच म्हणावे लागेल.निर्भयाची घटना असो किवा हाथरस येथील केलेली हत्या,कठुवा येथील घटना असो किवा उन्नाव येथे माणूसकीला वेशीवर टांगण्याची घटना ,या सर्व घटनेत ख-या अर्थाने बलात्कारच झाला होता,मात्र सज्ञान स्त्री-पुरुष आपसी सहमतीने अनेकवेळा सहवास सुख घेतात यानंतर नात्यात वितुष्ट येताच नात्यातील पुरुषावर सरळ बलात्काराचा गुन्हा दाखल होतो,अनेक प्रकरणात न्यायालयाने देखील यावर ताशेरे ओढले आहे.‘बलात्कार’ही एक घटना असते,सहवास सुखाची श्रृखंला नव्हे…..! एकाच परिस्थितीत वारंवार सारखीच घटना घडतेय ते ही आपसी सहमतीने त्या घटनेला किवा नात्याला बलात्काराच्या गुन्ह्यात कसे बंदिस्त करता येईल?

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात देखील एक स्त्री पुढे येऊन तिच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करीत आहे,शेवटी अन्याय हा अन्यायच असतो,भारतीय समाजात स्त्रीला एक वेगळे आणि आदरयुक्त स्थान प्राप्त आहे.परिणामी रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी ही निष्पक्ष् पणे झालीच पाहिजे,यात वाद नाही.आता न्यायलयातच त्यांना न्याय मिळू शकतो.

या घटनेकडे विरोधी राजकीय पक्ष्ांचा या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोण तद्दन राजकीयच असून ‘हमाम में सब नंगे’वाली कहावत या ही प्रकरणात लागू होते. ‘आपलं ठेवावं झाकून..दुस-याचं पहावं वाकून’अशी अस्सल व-हाडीतील म्हण आहे,ती या ही प्रकरणात अनेक विरोधकांवर चपखळ बसते.अनेकांचे विवाहबाह्य संबध असतात,आहेत मात्र ज्यांचं बिंग फूटलं नाही ते स्वच्छ चारित्र्याचे म्हणूनच मिरवणार,ज्यांचं बिंग फूटलं ते लागलीच चारित्र्यहीन ठरतात.उद्याच नागपूरात देखील भारतीय जनता पक्ष्ाच्या महिला मोर्चातर्फे धनंजय मुंडे यांच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन होणार आहे.विशेष म्हणजे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरातील काही महिलांनी त्यांच्या समारे कपडे फाडले व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप एका वार्ताहाराला दिलेल्या मुलाखतीत केला होता,या विरोधात भाजपच्या महिला मोर्च्यांने पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला मात्र याचे पुढे काय झाले?मुंढेंचा विरोध हा त्यांची बदली होताच संपला का?नागपूरकर महिलांची बदनामी करणा-या त्या आरोपाचं पुढे काय झालं?यालाच म्हणतात ‘निखळ राजकारण!’आता धनंजय मुंडेंच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन करण्याचा नक्कीच पक्ष् म्हणून त्यांना संवैधानिक अधिकार आहे मात्र,फक्त राजकारणासाठी राजकारण ते ही अश्‍या संवेदशनशील विषयावर योग्य नसल्याची अनेकांची धारणा आहे.

धनंजय मुंडे प्रकरणात देखील भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधीला चारित्र्य हे असलंच पाहिजे,अशीच सर्वसामान्यांची ‘भाबडी’ धारणा असते आणि आहे.व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग करायचा असेल तर खुशाल करावा मात्र मग समाजाचं नेतृत्व करु नये.विवाहबार्ह्य संबधाबाबत निकाल देताना सर्वाच्च न्यायालयाने देखील असे सबंध हा कायदेशीर गुन्हा होऊ शकत नाही मात्र हा नैतिक गुन्हा निश्‍चितच ठरतो असे सांगून आपसी सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे हे नैतिक दृष्टया योग्य नसल्याचे म्हटले होते.

मुंडे प्रकरणात सर्वाधिक रंग भरला तो म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वेळोवेळी बदलत गेलेल्या भूमिकांमुळे.दररोज वृत्तपत्राचे मथळे त्यांच्याच प्रतिक्रियेवरील असायचे.सरतेशेवटी सध्या तरी मुंडे यांचे मंत्रीपद वाचले असले तरी शरद पवार यांचा पडद्या मागील हातखंडा बघता आपली लाडकी लेक खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रातील राजकारणात निर्विवादपणे प्रस्थापित करण्यासाठी पुतणे व सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या जवळील माणसांवर कुरघोडी करण्यासाठीच त्यांनी ही भूमिका घेतली असल्याची खासगीत चर्चा आहे! मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास पक्ष्ा च्या नावाला बट्टा लागतो,असे करणे हितकारक नसून आतल्या आत अजित पवार यांच्या समर्थकांची विकेट पाडायची,पडु ही देणार नाही,मरु ही देणार नाही,अशी स्थिती करायची,मलिन झालेल्या प्रतिमेच्या लोकप्रतिनिधीला जनताच घरी बसवते,ही महाराष्ट्राची खासियतच आहे.त्यामुळे शरद पवार यांना याहून काही वेगळं करण्याची गरजच नव्हती असा देखील सूर सोशल मिडीयावर चांगलाच उमटलेला आढळतोय.

सामान्य माणसाने असे केले तर तो लगेच समाजाच्या नजरेत ‘व्याभिचार’ठरतो मात्र लोकप्रतिनिधीचे असे वागणे ही हल्ली ‘हाय प्रोफाईल लाईफ स्टाईल’ठरतेय.अभिनेते,क्रिकेटर,राजकारणी हे खरे तर समाजासाठी ‘रोल मॉडलच’असतात,त्यामुळे खासगी आयुष्य जगताना त्यांना नीतीमत्तेची चाड ठेवणे हे अपरिहार्यच आहे मात्र असे घडत नाही.आमदार किवा खासदार झालो याचा अर्थ प्रत्येक सुंदर,देखणी तरुणी ही भोगलीच पाहिजे,असा त्याचा अर्थ होत नाही.सार्वजनिक जिवनात आलो याचा अर्थ आदर्श जिवनच जगता आले पाहिजे.

मुुंडे यांच्या या प्रकरणात तर लग्नाची पत्नी असताना दूसरी पत्नी किरण शर्मा यांच्याकडूनही त्यांना दोन अपत्ये असल्याची जाहीर कबूलीच मुंडे यांनी सोशल मिडीयावर दिली,आणि त्यांच्या या सत्य वचनावर अनेकांनी त्यांची पाठ थोपटली!मात्र त्याच किरण शर्माची धाकटी बहीण ही उघडपणे समोर येऊन राज्यातील सामाजिक न्यायमंत्री यांच्यावरच धाडसाने बलात्काराचा आरोप करते तेव्हा पुरोगामी महाराष्ट्रात मंत्री,संत्री,आमदारांची नीतीमत्ता किती खालच्या स्तराला पोहोचली ,याची प्रचिती गेल्या संपूर्ण आठवड्यात राज्यातील जनतेला येण्यावाचून राहीली नाही.

उच्च विद्याभूषित माणसे ही कोणाच्याही खासगी आयुष्याचा सन्मानच करतात,मात्र घरचीच मंडळी खासगी आयुष्य असं चव्हाट्यावर आणत असेल तर नीतीमत्ता आणि चारित्र्याची चर्चा तर होणारच!

दुसरे मुंढे यांना ही कळली खरी नोकरशाही!
सरत्या आठवड्यात आणखी एका मुंढेची बरीच चर्चा रंगली ती म्हणजे माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तब्बल आठ महीन्यांनंतर मानवाधिकार आयोगाच्या साचिवपदावरील नियुक्तीबाबत!वाघाला दात नसेल तर असा वाघ कोणत्या कामाचा?अशी अवस्था मुंढे यांची झाली आहे.नोकरशाही ही शेवटी पॉलिटिकल सिस्टमचं एख खेळणं झाली असल्याची या घटनेवरुन तरी प्रचिती येते.मुंढे यांच्या या पोस्टींगवरुन एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झाली ती म्हणजे पॉलिटीकल सिस्टीमच्या जवळ राहीलाे अगदी बारामतीच्या जवळ राहीलो तरी अशी पोस्टींग वाट्याला येते आणि पॉलिटिकल सिस्टिमला मॅनेज न करणा-याच्या वाट्याला देखील असेच भोग येतात! राजकीय नेत्यांच्या गूड बूकमध्ये असणेही तुकाराम मुंढे यांना कसे भोवले?हे त्यांच्या पोस्टींगवरुन दिसून पडत आहे.

Latest बातम्या