Homeनागपूर न्यूजसमर्पित आयोग २८ मे रोजी नागपूरात

समर्पित आयोग २८ मे रोजी नागपूरात

Advertisements
Advertisements

नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ मे रोजी नावनोंदणी करावी

नागपूर,दि. १८ मे २०२२ : नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम घोषित झाला असून २८ मे रोजी आयोग, नागपूर मध्ये येणार आहे. नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत करावी, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेतील सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी ) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदन स्विकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावार कार्यक्रम जाहीर केला आहे.

समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

समर्पित अयोगाचा भेटीचा कार्यक्रम या प्रमाणे आहे-

शनिवार, २८ मे रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजता विभागीय कार्यालय, नागपूर येथे समर्पित आयोग भेट देणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी कळविले आहे.

Latest बातम्या