
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मूळात राजकीय पक्ष्ांसाठी नाहीच:श्रीहरी अणे यांचे विधान
नागपूर,ता.२७ नोव्हेंबर: विदर्भवादी उमेदवार नितीन रोंघे यांनी भारतीय जनता पक्ष्ाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी तसेच आघाडीचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांना सरळ-सरळ दोन प्रश्ने विचारुन त्यांच्याकडून मतदानापूर्वी विदर्भाच्या जनतेसाठी, उत्तराची अपेक्ष्ा केली आहे. आज दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत त्यांनी संदीप जोशी यांच्यावर प्रहार करताना १२ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी गेली ५० वर्षे नागपूर पदवीधर मतदार संघ भाजपचा गड राहीला असल्याची दर्पोक्ती व्यक्त केली, या गोष्टीसाठी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो मात्र त्यांच्याच वकत्वयामुळे उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी,असे आवाहन रोंघे यांनी आज केले.
जोशी यांनी केलेल्या दर्पोक्तीप्रमाणे नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड राहीला हे जरी कटू सत्य असले तरी त्यांनीच आता पन्नास वर्षांत त्यांच्या पक्ष्ातील उमेदवारांनी विदर्भातील पदवीधरांसाठी केलेल्या फक्त पाच गोष्टी सांगाव्यात,असे आवाहन रोंघेनी केले.
याशिवाय करोनाच्या महामारीत नागपूर शहरात जेव्हा एप्रिल,मे महिन्यात शहरातील सर्वसामान्य जनता,आरोग्य कर्मचारी,पोलीस,मनपाचे कर्मचारी,तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे सर्व कोविड योद्धे करोनाविरुद्ध लढत होते तेव्हा शहराचे महापौर हे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लढत असल्याचे विदानक चित्र जनतेने पाहीले.एवढेच नव्हे तर देशाच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत एका आयएएस अधिका-या विरुद्धची ही लढाई पाेहोचली,मुंढे यांच्या काळात करोनाबाधित मृत्यचा आकडा ४३५ होता तर त्यांची बदली होताच आज हा आकडा जवळपास साढे तीन हजारावर पोहोचला आहे.ज्या आएएस अधिका-याने आपल्या जीवाची पर्वा न करता या शहराला कोविडपासून वावण्यासाठी जीवाचे रान केले त्यांच्या विरोधात अश्या जीवघेण्या महामारीच्या काळात महापौर तसेच भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी केलेली कृती योग्य होती का?असा मार्मिक प्रश्न रोंघे यांनी याप्रसंगी केला.
आज संदीप जोशी यांना विदर्भ आणि विदर्भावरील आघाडी सरकार करीत असलेल्या अन्याय आठवत आहे.ते त्यांच्या विदर्भ प्रचार दौ-यात विदर्भातील अनुशेषाचा प्रश्न उपस्थित करीत आहेत मात्र माझा त्यांना हाच प्रश्न आहे की ते आणि त्यांचा पक्ष् स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करतात का?की फक्त कोणतीही निवडणूक आली तेव्हाच त्यांना विदर्भ आठवतो!कारण नागपूर सोबतच औरंगाबाद व पुणे विभाग पदवीधर मतदासंघाची देखील निवडणूक होत असून भाजपची भूमिका स्वतंत्र विदर्भाबाबत तेथील मतदारांना देखील कळायला हवी,याबात भाजपने आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी,असे आवाहन ही रोंघे यांनी यावेळी केले.
सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र शासन गृह विभागातर्फे जवळपास १२ हजार ५०० पोलीस शिपाईच्या तसेच एमएससीबीतर्फे जवळपास ३ हजार ५०० सरकारी जागा भरण्यात येणार आहे.आधीच विदर्भाचा रोजगारामध्येही प्रचंड अनुशेष आहे.परिणामी या जागा भरत असताना नागपूर करार कलम ८ व घटनेतील कलम ३७१(२)नुसार आधी विदर्भातील तरुणांना रोजगार देऊन नंतर उर्वरित महाराष्ट्रातील युवकांना नोकरी द्यावी ही आम्हा विदर्भवाद्यांची भूमिका आहे,याबाबत भाजपचे तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचे काय मत आहे?
वंजारी यांना विचारले दोन प्रश्न-
काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी संवाद पत्रिकेद्वारे त्यांच्या शिक्ष् ण क्ष्ेत्रातील योगदानाबाबत अगदी भरभरुन लिहले की ते सलग १५ वर्षे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेटचे सदस्य राहीले आहेत.परिणामी त्यांनीच आता पदवीधर मतदारांना सांगावे की,इतकी वर्षे नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून आपली कारर्कीद गाजवताना नागपूर विद्यापीठाचं मानांकन इतकं लाजिरवाणं का?हे विद्यापीठ पहील्या १५० मानाकंनात देखील नाही!हीच का वंजारी यांची १५ वर्षांची उपलब्धी?
वंजारी यांनी आपल्या संवाद पत्रिकेत लिहले आहे की ते पक्ष्ाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत मग २००५ साली त्यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या दिवंगत वडीलांच्या जागेवर उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी लगेच बंडखोरी करीत काँग्रेसच्याच उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली,हीच का वंजारी यांची पक्ष्ाप्रति निष्ठा?असा जळजळीत सवाल रोंघे यांनी वंजारी यांना केला.
याशिवाय वंजारी यांची देखील दर्पोक्ती या संवाद पत्रिकेतील एका वाक्याने उघड झाली ती म्हणजे ‘ते त्यांच्या शिक्ष् ण संस्थेचा संपूर्ण कारभार एकहाती सांभाळतात‘याचा अर्थ त्यांचा देशातील लोकशाही मूल्यावर विश्वासच नाही असाच होत नाही का?ते स्वत: स्वत:च्या संस्थेतच लोकशाही पाळत नाही,ते विधान परिषदेचे अामदार झाल्यावर आपल्या मतदारांचे किवा सहका-यांचे मत विचारात न घेता स्वत:च्या मनमर्जीनेच एकहाती कारभार चालवणार का?याचे उत्तर त्यांनी आताच सुशिक्ष्ति मतदारांना द्यावे.
राेंघे यांनी अश्याप्रकारे तुल्यबळ लढत असणा-या दोन्ही उमेदवारांना जळजळीत प्रश्ने विचारुन मी अपक्ष् उमेदवार असून माझा एक ही कार्यकर्ता नाही,सर्व विदर्भवादी एकजूट होऊन फक्त सहकारी म्हणून राबत असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूकीसाठी सर्वाधिक गरजेची असणारी आर्थिक जुळवणूक ही देखील सहका-यांनी आपापसातील देणगीतून केली असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेत निवडून गेल्यावर माझी पहीली प्राथमिकता ही २५ हजार रु.महिना देणा-या एक लाख नोक-या विदर्भात निर्माण करण्यास राहील.नागपूरसह गाेंदिया,वर्धा चंद्रपूर व गडचिरोलीत सर्वाधिक प्रदुषण आहे.चंद्रपूर हे तर आता ‘कँसरपूर‘म्हणून ओळखले जात आहे,विद्युत निर्मितीचे एवढे विष तेथील पर्यावरणात मिसळले,तेथील नागरिक हे एपी-ॲलर्जी ड्रॉप घेऊन जगत असल्याचे भयाण वास्तव रोंघे यांनी याप्रसंगी मांडले.परिणामी प्रदुषणाच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष् देणार असल्याचे ते म्हणाले.
विदर्भातून सुशिक्ष्तिांचे मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रात पलायन सुरु आहे याचे कारण विदर्भात उद्योग धंदेच नाही. नागपूरच्या मिहानसह विदर्भातील इतर भागात मी आमदार म्हणून नव्हे तर ‘सेल्समन’म्हणून उद्योगपतींचे उंबरठे झिजवणार व मोठ्या प्रमाणात विदर्भात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.
याशिवाय देशातील ११ टक्के महिला या गर्भाशी निगडीत सरवाईकल तसेच स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतात,याशिवाय महिला या मोठ्या प्रमाणात ऍनिमिक असतात त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही आयरनचा पुरवठा करु,यासाठी समाजातील रोटरी किवा लाॅयन यासारख्या सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊ,असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की १० नोव्हेंबर रोजी मी स्वत:ची अपक्ष् म्हणून उमेदवारी जाहीर केली त्यावेळी अनेक विदर्भवादी ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक न लढविण्याचा सल्ला दिला.गेल्या निवडणूकीत १३ पैकी १२ जागांवर विदर्भवादी उमेदवारांची जमानत जब्त झाली तर एका ठिकाणी ते दुस-या स्थानावर होते.ज्येष्ठांचा आपुलकीचा व जिव्हाळ्याचा सल्ला जरी असला तरी मी कोणत्याही विदर्भवादी पक्ष्ाचा एबी फॉर्म स्वीकारला नाही,माझे आदर्श अमरावती विभागाचे पदवीधर मतदार संघाचे अपक्ष् उमेदवार बी.टी.देशमुख हे आहेत. ते अपक्ष् असल्यानेच विदर्भाच्या प्रश्नावर विधान परिषदेत मुखर होत असे. ते जर कोणत्याही राजकीय पक्ष्ाच्या दावणीला बांधले गेले असते तर त्यांना विधान परिषदेत विदर्भावर होणा-या अन्यायाला वाचाच फोडता आली नसती.१२ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केल्यानंतर विदर्भातील सहा ही जिल्ह्ये तसेच ६४ पैकी ४३ तालुक्यांपर्यंत मी माझी भूमिका मतदारांसमोर मांडली.लोकांचा प्रतिसाद हा उत्साहवर्धक असल्याचे सांगून विदर्भ हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे ते म्हणाले.आमदार म्हणून निवडून आल्यास विधान परिषदेत ‘जय विदर्भ’म्हणूनच शपथ घेणार असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
संदीप जोशी यांच्या खिजगणितातही नसलेला ‘विदर्भ’ अचानक माझ्या उमेदवारीनंतर प्रचारात आला असल्याचा टोला त्यांनी लगावला.अर्थात या निमित्ताने का होईना विदर्भाचा मुद्दा पुन्हा राजकीय अजेंडावर आला,याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.मी त्यांना प्रश्न विचारतोय याचा अर्थ त्यांच्यावर आरोप करीत आहे,असे नाही,लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य असून इतरांच्याही विचारांचा सन्मान राखता आला पाहिजे,असे ते म्हणाले.
पदवीधर मतदारसंघात राजकीय पक्ष्ाची भूमिकाच काय? माजी महाधिवक्ता ॲड.श्रीहरी अणे यांचा प्रश्न
याप्रसंगी झूम या व्हरच्यूअल प्लॅटफॉमद्वारे बोलताना माजी महाधिवक्ता ॲड.श्रीहरी अणे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राजकीय पक्ष्ांना कोणतेही महत्व नाही,असे मत व्यक्त केले. इतर सर्व निवडणूकांमध्ये राजकीय पक्ष्ांना आपली भूमिका मांडून जनतेचे मत मिळवण्याचा अधिकार आहे मात्र संविधानकर्त्यांनी फक्त पदवीधर व शिक्ष् कांच्या प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी या मतदार संघाची रचना केली.मात्र याही निवडूकीत राजकीय पक्ष्ांनी आपलीच पोळी आजवर भाजून घेतली. पदवीधरांकडून ही अपेक्ष्ा मुळीच नसते की त्यांनी राजकीय अजेंडाच्या मागे जावे.राजकीय पक्ष्ांचाच अजेंडा पुढे राबवायचा असेल तर संविधानकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघांची निर्मितीच का केली असती?
अापल्या देशात पूर्वी इतकी अशिक्ष्ि तता नाही मात्र तरी देखील लक्ष् णीय प्रमाणात आंधळेपणाने राजकीय पक्ष्ांचीच या निवडणूकीत रि ओढली जाते.पदवीधर मतदार संघांचा अर्थच असा आहे की ज्या बाबीवर त्याला विश्वास आहे तो अजेंडा पुढे करणे.ही निवडणूक बौद्धिक असते ‘भावनिक ’नाही.पक्ष् विरहीत निवडणूक म्हणजे पदवीधर निवडणूक असते.पदवीधर विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना कोणती भूमिका स्वीकारेल?विदर्भातील सुशिक्ष्ति बेरोजगारी,आदिवासींचे प्रश्न हा पदवीधर उमेदवार विधान परिषदेत मांडेल अशी संविधानकर्त्यांना अपेक्ष्ा होती,ना की राजकीय पक्ष्ांचा अजेंडा या ही मतदार संघात चालवण्यासाठी हा मतदार संघ त्यांनी निर्मित केला.
महाराष्ट्र सरकारची संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता चालत असेल मात्र विदर्भात चालत नसल्याचा झणझणीत टोला त्यांनी हाणला.फक्त अडीच दिवसांचे देखील अधिवेशन महाराष्ट्र सरकार विदर्भात घेऊ इच्छित नाही,करोनाच्या कारणाने जिथे कोर्ट देखील सुरु आहेत मी देखील कोर्टात जातो तेथे विदर्भाच्या हक्काचे अधिवेशनही घेतले जात नसल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वारंवार येणा-या तांत्रिक अडथळ्यांमुळे ॲड.श्रीहरी अणे हे आपले म्हणने पूर्णपणे मांडू शकले नाहीत.
पत्र परिषदेत विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य पार्टी, बळीराजा पार्टी,राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रिय जनविकास पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा