Homeराजकारणशाळा सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय: उपमुख्यमंत्री अजित पवार

शाळा सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय: उपमुख्यमंत्री अजित पवार

उपसभापती नीलम गो-हे यांच्या प्रश्‍नाला दिले उत्तर

पुणे,ता. १२ ऑक्टोबर: कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊनच राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की काही काळ अजुन थांबायची गरज आहे यावर लवकरच निर्णय करणार असल्याचे उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सांगितले

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली होती. या बैठकीला महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.यावेळी पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळात असल्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील शाळा या १५ ऑक्टोबर नाही तर दिवाळीनंतर सुरू होणार आहे असे ना.पवार यांनी ना.गोऱ्हे यांच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले

चाचण्या कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होत असल्याबाबत चर्चा होत असताना शासनाच्या वतीने ‘ट्रेस द वायरस’ च्या मोहिमेतून रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केल्याने आणि याबाबत काळजी घेतल्याने प्रसारण थांबले असू शकते. पुणे, महाराष्ट्र तसेच भारतातील रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत असल्याने याचे देखील परिणाम कोरोना रुग्ण कमी होताना देखील दिसत आहे.

येवलेवाडी पिसोळी ग्रामपंचायत ता.हवेली येथे कुष्ठरोगी रुग्णांची वसाहत आहे. या ठिकाणी लॉकडाऊन मुळे खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या ठिकाणी ‘शिवभोजन थाळी’ योजना सुरू करण्याची सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली होती. या योजना सुरु केल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी सहकार्य केल्याबद्दल आ.नीलम गो-हे यांनी आभार मानले.

शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रातील कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे,मुंबईचे पालकमंत्री ना.आदित्य ठाकरे यांचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले.

.
श्रद्धे बरोबर सबुरी देखील ठेवावी-

कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत . दर्शन घेताना अनेक पध्द्ती आहेत त्यापद्धती मध्ये देवाला हळदकुंकू लावणे, घंटानाद करणे, फुले वाहने, देवाच्या पायावर डोक्यावर ठेवणे अशा अनेक गोष्टी देवाचे दर्शन करणात भाविक करत असतात यातूनच भाविकांना दर्शनाचे समाधान मिळत असते. अशा ठिकाणी दर्शनाच्या वेळी भाविकांना संसर्ग वाढला फार प्रश्न तयार होऊ शकतात. श्रध्दे बरोबर सबुरी भाविकांनी ठेवावी अशी विनंती ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली. मंदिरे सुरू करण्यासाठी जो वेळ मिळत आहे याकाळात मंदिर समितीने मंदीरातील दुरुस्त प्रक्रिया करणे असेल,निर्माल्य व्यवस्थापन, अशा छोट्या मोठ्या दुरुस्त्या करणे, शौचालय बांधणे, पाण्याच्या व्यवस्था करणे अशी कामे केल्यास याचा फायदा भाविकांना होणार असल्याचे आवाहन ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले.

Latest बातम्या