
नागपूर: आज दिवसभर मुंबईत सत्तानाट््य घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपविल्यानंतर मुंबईत फडणवीस यांनी पत्र परिषद घेतली. पत्र परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष्ाचे पक्ष्ाध्यक्ष् व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असता शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमिविर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया विचारली असता, हे खरे आहे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याची प्रतिक्रिया गडकरी यांनी माध्यमांना दिली.
शहा यांनी गडकरी यांना सांगितले,की लोकसभा निवडणूकीत ते मातोश्रीवर युतीची बोलणी करण्यासाठी गेले असता संपूर्ण चर्चा झाल्यानंतर उठता-उठता शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची बोलणी करण्यात आली मात्र ‘फिर देखेंगे’ असा शब्द शहा यांनी वापरला आणि ते निघून गेले. ‘फिर देखेंगे’ असे औपचारिक बोलणे म्हणजे ‘शब्द देणे’नव्हे असे गडकरी म्हणाले. ‘हा विषय आता राहू द्या, विधान सभा निवडणूकीनंतर हा मुद्दा बघू’असे शहा हे औपचारिकपणे म्हणाले होते,असा खुलासा गडकरी यांनी केला. मूळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच हे धोरण होते ज्यांचे संख्याबळ जास्त त्या पक्ष्ाचा मुख्यमंत्री. लोकशाहीत हेच धोरण योग्य ही आहे.महाराष्ट्रात भाजपला १०५ एवढ्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने जर मंत्री पदाबाबत, खाते,मंत्री पदांची संख्या या बाबत मागणी केली तर अजुनही चर्चा होऊ शकते,असे गडकरी म्हणाले. शहा यांच्याशी बोलल्यानंतर ‘विषय निघाला मात्र निर्णय नाही घेतला होता’हा खुलासा त्यांनीच केला असल्यामुळे खोटे बोलण्याचा प्रश्नच उद् भवत नाही. ‘आगे देखेंगे ’म्हणजे ‘वचन’होत नसल्याचे गडकरी म्हणाले.
‘शिवसेनेसाठी सर्व पर्याय खुले आहेत’हे पहील्याच दिवशी शिवसेना अध्यक्ष्ांची प्रतिक्रिया होती याबाबत बोलताना,तरीही अद्याप आम्ही युतीतच असल्याचे गडकरी यांनी सांगितले.युती तुटलेली आहे असे मी म्हणणार नाही. अमित शहा हे युतीचे बोलणे करण्यास राज्यात का आले नाहीत?या प्रश्नाबाबत बोलताना ‘शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष् आहेत,ते केव्हा येतील?जेव्हा चर्चा सुरु होईल, ही चर्चा एका टप्प्यावर पोहोचली असती तर अमित शहा हे नक्कीच राज्यात आले असते.कुठल्याही पक्ष्ाचे अध्यक्ष् हे पहील्याच दिवशी चर्चेत सहभागी होत नसतात असे गडकरी म्हणाले. पहील्याच दिवशी चर्चेत उद्धव ठाकरे हे पक्ष्ाध्यक्ष् म्हणून सहभागी झाले होते का?असा प्रतिप्रश्नही गडकरी यांनी विचारला.

आमचे चॅनल subscribe करा