

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या मिश्किल विधानामागील ‘मर्म’
नागपूर,ता. २२ सप्टेंबर २०२२: .विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज सायंकाळी ५ वाजता प्रेस क्लब येथे पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला.याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी विधान भवनातील पत्रकारांच्या आसन व्यवस्थेसंदर्भातील गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले.अधिवेशनात पुणे,मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातून विधी मंडळाच्या दोन्ही सदनातील कामकाजाचे वार्तांकन करण्याकरिता किमान १०० पत्रकार येतात,याशिवाय विदर्भातील विविध जिल्ह्यातून तसेच नागपूरातील पत्रकारांची संख्या ही देखील शंभरच्या जवळपास असते,विधान परिषदेत तर फक्त २० आसन संख्या असून अश्यावेळी वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याकडे मैत्र यांनी विधान सभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.
यावेळी नार्वेकरांनी येत्या १९ डिसेंबर पासनू नागपूरात सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनात, विधान भवन परिसरात पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले व प्रसार-प्रचार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगून या वेळी माध्यमकर्मींना विधान भवन परिसरात वार्तांकनासाठी सर्व सोयी सुविधा पूर्णपणे प्राप्त होतील,असे सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील काही पत्रकारांकडून वैदर्भिय पत्रकारांची हेतूपुरस्सर करण्यात येणारी हेटाळणी,दूर्व्यवहार,उपेक्षा,दादागिरी,वार्तांकनावर पहीला हक्क असल्यासारखी चुकीची वर्तवणूक अश्या अनुभवांकडे नार्वेकर यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘यावेळी तरी वैदर्भिय पत्रकारांना योग्य सुविधा व संधी राहील का?’या कडे लक्ष वेधले असता,पत्रकार हा पत्रकार असतो, पश्चिम महाराष्ट्र किवा वैदर्भिय असा भेद पत्रकारांमध्ये करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले व सर्वांसाठीच मिडीयाला लागणा-या सोयी सुविधा विधान भवन परिसरात राहणार असून, आमचे संपूर्ण सहकार्य राहील,असे आश्वासन देत,असे घडले नाही तर वैदर्भिय पत्रकार चांगला पाहूणचार घेतील,अशी मिश्किली देखील त्यांनी केली.
यातील गमतीचा भाग सोडला तरी दर वेळी महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडणा-या विधी मंडळ अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्राच्या काही पत्रकारांकडून हेतूपुरस्सर वैदर्भिय पत्रकारांची ‘हेटाळणी’ हा चर्चेचा विषय विधान भवन परिसरात दरवेळी रंगतो.विधान सभा अध्यक्षांच्या ‘पाहूणचार’या मिश्किलीनंतर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत वैदर्भिय पत्रकारांना विधी मंडळ परिसरात जी ‘दुय्यम’वागणूक मिळते,त्या चर्चेलाही तोंड फूटले.
विधी मंडळातील दोन्ही सदनात वार्तांकनासाठी पत्रकार गॅलरीत सर्वात पुढे बसण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा ‘जन्मसिद्ध’हक्क असतो,हे त्यांनी ‘गृहीतच’धरले असल्यासारखी त्यांची वर्तवणूक असो किवा वैदर्भिय पत्रकारांना एवढ्या महत्वाच्या राजकीय विषयाचे वार्तांकन करण्याची ‘अक्कलच’नसते,सर्व अक्कल ही नियतीने त्यांच्यात खात्यात जमा केली असल्यासारखी वर्तवणूक असो ,अनेक वैदर्भिय पत्रकारांनी अनुभवली आहे,या चर्चेला देखील त्यामुळे उधाण आले.
पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांची ‘चांगलीच तोंडओळख’माय बाप सरकार,मंत्री व मंत्रालयातील सचिवांसोबत असल्याकारणाने,ते या पत्रकारांना अगदी नावानिशी ओळखतात,त्यामुळे त्यांची चांगलीच बुज राखवल्या जात असते, वैदर्भिय पत्रकारांच्या मनात यामुळे देखील हीन भावना निर्माण होते.राजकीय बीट सांभाळणा-या विदर्भातील काही अनुभवी व ज्येष्ठ पत्रकारांना ,त्यातल्या त्यात महिला पत्रकारांना विधान भवन परिसरातील महत्वाच्या घडामोडीतून हद्दपारच केल्या जात असल्याची भावना देखील यानिमित्ताने व्यक्त झाली.
विधान भवनातील महत्वाच्या‘ मिट द प्रेस’ तसेच पत्रकार परिषदांमधून ज्येष्ठ वैदर्भिय महिला पत्रकारांना निमंत्रित केल्या जात नसल्याचा व हेतुपुरस्सर त्यांना डावलले जात असल्याचा आरोप अनेक महिला पत्रकारांनी यानंतर खासगीत केला.
इंग्रजी,हिंदी व मराठी भाषिक महिला पत्रकारांंमधून इंग्रजी भाषिक महिला पत्रत्रकारांना झुकते माप देण्या मागे काय मानसिकता अाहे?असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
अधिवेशना आधी पत्रकारांसोबतच्या चहापानाच्या कार्यक्रमात वैदर्भिय पत्रकारांचा किंबहूना महिला पत्रकारांचा साधा परिचय देखील विचारला जात नाही,याचे काय कारण आहे?
आज फक्त उपराजधानीत राजकीय बीट सांभाळणा-या शंभरहून अधिक महिला पत्रकार आहेत,त्यांच्याविषयी काही धोरणे नागपूरातील महत्वाच्या पत्रकार संघटना तसेच विधी मंडळ व्यवस्थापन राबविणार आहे का?असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित झाला.

आमचे चॅनल subscribe करा