Homeनागपूर न्यूजविदर्भाचा माणूस हा दाता,घेणारा माणूस नाही:नाना पटोले

विदर्भाचा माणूस हा दाता,घेणारा माणूस नाही:नाना पटोले

नागपुरात विधिमंडळाच्या कायमस्वरुपी कक्षाचे उद् घाटन

सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी

नागपूर, दि. ४ डिसेंबर : विदर्भाचा माणूस हा दाता आहे.तो घेणारा माणूस नाही,विदर्भाच्या माणसाने पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भात कधीही भेद केला नाही,महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवण्यात विदर्भाच्या आमदारांचेच जास्त योगदान होते,विदर्भच नव्हे तर राज्यातील ज्या ज्या भागांनी जी काही मागणी केली ती त्या भागाला सहर्ष देण्याची भूमिका राज्य सरकारने वठवावी,असे विधान,विधान सभेचे अध्यक्ष् नाना पटोले यांनी केले. ते आज सोमवार दि. ४ जानेवरी रोजी नागपूर विधान भवनात विधीमंडळाच्या कायमस्वरुपी कक्ष्ाच्या उद् घाटनाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्षांसह उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब, क्रीडामंत्री सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे(ऑनलाईन) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की,विधान भवनात कायमस्वरुपी कार्यरत विधिमंडळ कक्षामुळे विदर्भाच्या आकांक्षांना न्याय मिळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दुसरा ऐतिहासिक क्षण असल्याचे भावपूर्ण उद् गार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे काढले.लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना सभागृहात सहजासहजी प्रवेश मिळत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता येत आहे. लोकशाही अधिकाधिक जनताभिमुख करण्याची ही प्रक्रिया असून आता यापुढे विधानमंडळातील ग्रंथालयही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरपाठोपाठ पुणे येथेही विधिमंडळाचा अशाच पद्धतीचा कक्ष सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी केली.अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना केली होती,हे विशेष! अनुशेष दूर करण्यासह विदर्भातील सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी हा कक्ष सहाय्यभूत ठरेल,असे ते म्हणाले.

देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे.महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशा पद्धतीच्या उपाययोजना ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.पुढील काळात कोरोनासारख्या महामारीच्या आकस्मिक परिस्थितीमध्ये सामूहिक सहभागासाठी अशा पद्धतीच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र विधिमंडळ कायम प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही नाना पटोले यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र हे लोकशाहीला माणनारे राज्य असून विधिमंडळाचे अधिवेशन न होणे ही भूषणावह बाब नसल्याची व्यथा त्यांनी आपल्या भाषणात मांडली.करोनाचा कितीही प्रकाेप असला तरी अधिवेशन हे महत्वाचे असते.अधिवेशन हे व्यवस्थित चालेल यासाठी आपण भविष्यात नक्की प्रयत्न करु,यासोबतच उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणात ज्या सूचना केल्या त्याचे देखील पालन करण्याची ग्वाही नाना पटोले यांनी दिली.उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर विधिमंडळाच्या या कक्ष्ात कार्यरत अधिकारी वर्ग हा आपली सेवा संपूर्णपणे देणाराच राहील,असे त्यांनी सांगितले.

देशात केंद्रिकरणाचे वातावरण महाराष्ट्रात प्रशासनाचे विकेंद्रीकरण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. नागपूर करारामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे ही अपरिहार्यता आहे. मात्र आता स्थापन झालेल्या कक्षामुळे वर्षभर काम सुरू राहणार आहे. त्यामुळे अधिवेशन अपरिहार्य असले तरी त्यामागची औपचारिकता राहणार नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल कालावधीतही महाराष्ट्र थांबला नाही,या उद् घाटन सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कधी थांबणार ही नाही, हा संदेश दिला गेला आहे. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. देशात सत्तेचे केंद्रीकरण होणत असताना महाराष्ट्रात प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचे हे उदाहरण असल्याचे सांगून आपल्या अल्पश्‍या भाषणातही मुख्यमंत्री यांनी अप्रत्यक्ष्पणे मोदी सरकारला जोरदार टोला हाणला.

विदर्भाचे प्रश्न केवळ हिवाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित न राहता त्यांना सदैव न्याय मिळावा हा यामागील उद्देश आहे. गेल्या हिवाळ्यात पहील्यांदा नागपूरात अधिवेशनानिमित्त आलो.उपराजधानी ही देशाचे मध्यवर्ती ठिाकण आहे. नागपूरचे विधान भवन ही अतिशय देखणी वास्तू आहे.या वास्तूला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभली आहे.विदर्भ आपल्या हृदयात असून या नव्या उपलब्धतेमुळे हे नाते आणखी घट्ट झाले.भविष्यात विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.

करोनामुळे नागपूर कराराप्रमाणे होणारे हिवाळी अधिवशेन हे रद्द झाले हे नक्कीच क्लेषकारक आहे.या अधिवेशनामुळे विदर्भातील जनतेच्या व्यथा,वेदना,प्रश्‍नांची जाणीव होते.नागपूरातील या वास्तूमध्ये फक्त विदर्भच नव्हेे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आशा आकांक्ष्ांची पूर्तता होते. नागपूरातील पहील्याच अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकक-यांच्या कर्ज मुक्तीचा धाडसी निर्णय घेण्यात आला,असे ते म्हणाले.आजही ज्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती,त्याची पूर्तता झाल्याने या लोकापर्णाचा अभिमान वाटतो.तंत्रज्ञानाच्या अत्याधूनिक प्रमाणीमुळे कोणी कुठूनही सहभागी होऊ शकत आहे.जग जवळ आले पण माणसे दूर जात नाही ना?या प्रणालीमुळे तुम्ही नेहमी माझ्या ह्दयात राहाल,आता मुंबई-नागपूर तसेही खूप जवळ आल्याचे ते म्हणाले.

चांगल्या अधिका-यांना येथे पाठवा-अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंबई येथून शुभेच्छा संदेश देताना नवीन कक्ष शासन आणि विदर्भातील जनता यामधील दुवा म्हणून काम करेल, असे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विधानमंडळाची उच्च परंपरा असून त्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. या नव्या कक्षातून सामान्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.विदर्भाचा देखील विकास झाला पाहिजे याबाबत दूमत नाही.विदर्भाच्या सर्वसामान्य जनतेलाही विकासाचा लाभ मिळाला पाहीजे.

मात्र आता या कक्ष्ात चांगले अधिकारी पाठवा जे स्वेछेने विदर्भात काम करण्यास तयार आहेत.बळजबरीने या कक्ष्ात अधिकारी नेमल्यास प्रभावी काम होणार नाही.महाराष्ट्र राज्याला देशात वगेळी प्रतिष्ठा आहे.संसदीय कामकाजाचा आदर्श देशात नव्हे तर जगात महाराष्ट्र राज्याने प्रस्थापित केला.हा आदर्श घेऊन पुढे जाण्याचे काम करायचे आहे.देशात संसद व राज्यांचे विधीमंडळ हे सर्वोच्च लोकशाहीचे स्तंभ आहेत.हे स्तंभ डळमळीत करण्याचे काम कोणी करीत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडले पाहिजे,अश्‍या शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा दिला.महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचे,प्रतिष्ठा राखण्याचे काम या कक्ष्ाद्वारे होईल अशी मला अपेक्ष्ा आहे.आ.प्रकाश गजभिये यांनी यासाठी विशेष मागणी केली होती.नानांच्या प्रयत्नाने ती पूर्णत्वास आली याचा आनंद वाटतो.

पुण्यात देखील विधीमंडळाचे कायमस्वरुपी कक्ष् असावे: आ.नीलम गो-हे
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी देखील यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित केले. आजचा सोहळा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी केलेल्या ऐतिहासिक भावनिक ऐक्याच्या वक्तव्याची आठवण करून देणारा असल्याचे सांगितले. गेल्या अठरा वर्षांपासून विदर्भात येण्याचा योग येत आहे.अनेक चळवळीनिमित्त विदर्भाच्या जनतेचे प्रश्‍न सुटावे ही तगमग स्वस्थ बसू देत नव्हती.याचे कारण विदर्भाच्या जनतेशी निर्माण झालेली आत्मीयताच आहे. नागपूरसोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठी काय करता येईल?या प्रश्‍नाप्रति भावनिक बंध वाटतो.

हिंदूह्रयय सम्राट बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आम्हाला कायम एक सूचना असायची,नागपूरातील हिवाळी अधिवेशनातील प्रश्‍नांचा पाठपुरावा हा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाला पाहिजे.नागपूरच्या या वास्तूत महिला आरक्ष् णाचा प्रश्‍न असो,विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव असो,एलफिस्टन रोडला प्रभादेवी नाव देण्याचा ठराव असो,सेझबाबतचा निर्णय असो,याच सभागृहात असे अनेक महत्वपूर्ण निर्णय पारित झालेत.शेतक-यांच्या प्रश्‍नावरील निर्णयाशिवाय नागपूरचे अधिवेशन कधीच पार पडले नाही.शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा आत्मा आहे.

आता विदर्भात हक्काचं विधीमंडळ कक्ष् निर्माण झाल्याने समित्यांच्या बैठका ही होणार,तालूका,जिल्हास्तरावर प्रश्‍नांच्या पाठपुरावा करण्यासाठी हे कक्ष् असणे अत्यंत महत्वाचे होते.यात नाना पटोले तसेच निंबाळकरांची तातडीने सहकार्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते.संसदीय कार्याचे प्रशि क्ष् ण केंद्र म्हणून हे कक्ष् उभे राहील,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.अशाच प्रकारचे एक केंद्र पुणे येथे उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

मुंबईचे सिद्धीविनायक,नागपूरचा टेकडीचा गणपती,मुंबईची चैत्यभूमी,नागपूरची दीक्ष्ा भूमीचा वारसा भारतीय संविधानाला या कक्ष्ाच्या माध्यमातून आणखी मजबूती प्रद्रान करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली

पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले, नागपूरसारख्या परिवर्तनाच्या भूमीमध्ये ही नवी ऐतिहासिक घटना आहे. मुंबईचे हेलपाटे टाळण्यासाठी विदर्भातील जनतेला उपलब्ध झालेली लोकशाहीतील ही मोठी संधी असून विदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गंभीर चिंतन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नागपूरमध्ये ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडी अँड ट्रेनिंगचे केंद्र उभारण्यात यावे. तसेच संसदेप्रमाणे संसदीय कामकाजाबद्दलची अद्ययावत माहिती अपलोड असणारी विधिमंडळाची वेबसाईट तयार करण्यात यावी. तसेच राज्यस्तरीय विभागाची मुख्यालये नागपुरात सुरु करण्यात यावी.

याप्रसंगी नागपूर अधिवेशनातील एक आठवण विशद करताना विदर्भाच्या प्रश्‍नावर सलग पंचेचाळीस मिनिटे भाषण दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.मी काँग्रेस पक्ष्ाचाच आमदार असूनही विदर्भाच्या प्रश्‍नावर बोलणार ते ही पहील्यांदा यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी घरी पोलीस पाठवले होते.दालनात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष् कुपेकर यांनी माझ्या भाषणामुळे सरकारही पडू शकते,अशी जाणीव करुन दिली होती.भाजपचे गोपीनाथ मुंढे तसेच शिवसेनेच नारायण राणे यांनी विदर्भाच्या प्रश्‍नावर पोल मागा म्हणून चिठ्ठया पाठवल्या होत्या.त्या भाषणात ३५ मिनिटे मी आपल्याच सरकारच्या विरोधात तर पाच मिनिटे बाजूने बोललो.डॉ.सतीश चर्तुवेदी यांनी चार तास ऐतिहासिक असे भाषण दिले होते.ऐंशीच्या जवळपास विधीमंडळात हे विदर्भाचे आमदार असायचे.आता विदर्भाचे प्रश्‍न मांडण्यासाठी या कक्ष्ाचा उपयोग होईल.

मुंबईचे हेलपाटे टळणार आणि मुंबईपेक्ष्ाही हे कक्ष् अधिक वेगाने काम करेल,असे कौतूकास्पद काम घडेल अशी ग्वाही त्यांनी दिली.आता कळेल विदर्भाचे नेते विदर्भासाठी काय किमया करु शकतात असे सांगून दिवंगत आमदार गोविंदराव वंजारी यांची अधिवेशनातील भाषणे ऐकण्यासाठी जनता ही प्रेक्ष क दीर्घामध्ये येऊन बसायची असे सांगून आता त्यांचेच पूत्र ॲड.अभिजित वंजारी हे विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेत.त्यांच्यामार्फत देखील विदर्भाचे प्रश्‍न मांडले जातील,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विदर्भाचे हक्कोच हिवाळी अधिवेशन हे करोनामुळे रद्द झाले असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरात घेण्याची मागणी यावेळी पुन्हा त्यांनी केली.

संसदीय कामकाज मंत्री ॲड. परब यांनी विदर्भातील लोकप्रतिनिधींना संसदीय लोकशाहीमध्ये लढण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून प्रभावी आयुध मिळाले असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या काळात हिवाळी अधिवेशन घेता आले नाही. मात्र या ठिकाणी सुरु केलेल्या या कक्षाच्यामार्फत अशा अपवादात्मक परिस्थितीत प्रादेशिक सहभागासह अधिवेशन घेतले जाऊ शकते, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे, असे स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नव्या उपक्रमाला शुभेच्छा देताना या माध्यमातून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली. श्री. केदार यांनी नागपूर करारानंतरची ही सर्वात मोठी घटना असल्याचे सांगून या कक्षाच्या माध्यमातून माजी आमदारांना देखील न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मानले. लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या केंद्राच्या निर्मितीनंतर अनेक विधिमंडळ समितीच्या बैठका नागपुरात होणार आहेत. या जोडीला महिन्यातून एकदा तरी विधानसभा अध्यक्ष विधानपरिषद सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी आढावा बैठकी घ्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.यावेळी विधि मंडळाच्या सभागृहात यायला निवडणूकीच्या माध्यमातून बराच वेळ लागतो मात्र आज सर्वसामान्य जनतेला सहज विधी मंडळ सभागृहात येण्याचा नंबर लागला अशी मिश्‍किली देखील त्यांनी या दरम्यान केली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

तत्पूर्वी विधानभवन येथील राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षामध्ये नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कक्षाचे उद घाटन अध्यक्ष नाना पटोले यांनी दीप प्रज्वलनाने केले. नव्या कक्षामध्ये दोन उपसचिव, दोन अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, दोन सहाय्यक कक्ष अधिकारी, चार लिपिक-टंकलेखक आणि चार शिपाई असा अधिकारी कर्मचारी वर्ग असेल. यापुढील काळात येथे विधिमंडळ समित्यांच्या बैठकाही आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे या विभागातील दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना अधिवेशनापूर्वी प्रश्न, लक्षवेधी आदी सूचना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विविध प्रशिक्षणाची देखील याठिकाणी संधी उपलब्ध केली जाणार आहे. माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे प्रत्येक मान्यवरांनी त्यांचा आपल्या भाषणात नामोल्लेख केला.

प्रारंभी विधीमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रास्ताविक तर स्वागत उपसचिव विलास आठवले यांनी केले.
या सोहळ्याला आमदार ना. गो. गाणार, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, ॲड. आशिष जयस्वाल यांचेसह महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य तसेच माजी आमदार जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, यादवराव देवगडे, गेव्ह आवारी, दिनानाथ पडोळे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगर आयुक्त शितल उगले-तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest बातम्या